जिद्दीची ज्योत : सौ.ज्योती खैडकर यांची प्रेरणादायी जीवनकहाणी
जिद्दीची ज्योत : सौ.ज्योती खैडकर यांची प्रेरणादायी जीवनकहाणी कुंभार समाजातून आलेल्या सौ. ज्योती खैडकर यांचा गरिबीपासून आत्मनिर्भरतेकडे झालेला प्रवास एक जिद्द, संघर्ष आणि यशाची उजळलेली वाटचाल. "जन्म नशिबावर ठरतो," असं म्हटलं जातं. मात्र काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने नशिबाला ही वाकवतात. सौ. ज्योती खैडकर यांची ही कहाणी म्हणजे अशाच एका धैर्यवान, जिद्दी आणि आत्मविश्वासू स्त्रीची प्रेरणादायी जीवनगाथा ज्यांनी स्वतःच्या प्रवासात संघर्षाची ठिणगी जपून यशाचा दिवा प्रज्वलित केला. महाराष्ट्रातील रावेर या छोट्याशा गावात, कुंभार समाजात सौ.खैडकर यांचा जन्म झाला. वडील वीटभट्टीवर मजुरी करणारे. घरात पाच बहिणी, एक भाऊ आणि सतत जाणवणारी आर्थिक तंगी. त्याकाळी मुलगी जन्माला येणं दु:ख मानलं जात होतं. मात्र सौ. खैडकर यांचे डोळे मात्र वेगळ्याच स्वप्नांनी उजळलेले होते. शिक्षण घेऊन स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं. घरात अन्नाचे ही हाल असताना त्या अभ्यासात मागे राहिल्यात नाहीत. दिवसभर छोटेमोठे काम करून, रात्रीचा वेळ अभ्यासाला देत त्यांनी दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या बहिणींना शि...