पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगाचा पोशिंदा उपाशीच का ?

इमेज
जगाचा पोशिंदा उपाशीच का ? रात्रभर गडद काळसर आभाळ पसरलेलं असतं, पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असते, वाऱ्याचा रुतून वाहणारा आवाज अंगावर काटा आणतो आणि कुठे तरी दूर कावळा ओरडतो. या साऱ्या पार्श्वभूमीवर एका शेतकऱ्याच्या मनात एकच विचार सतत डोकावत राहतो. "आपणच जगाला पोसतो, पण आपल्यासाठी कोण?" एखाद्या माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक घासामागे एक हात असतो.तो म्हणजे शेतकऱ्याचा. जसा आई आपल्या लेकराला दूध देते, तसाच शेतकरी आपल्या श्रमांनी जगाला अन्न पुरवतो. फरक एवढाच, की लेकराच्या डोळ्यांतील दुःख आईला दिसतं, पण शेतकऱ्याच्या डोळ्यांतील वेदना कोणालाच जाणवत नाहीत. शेती म्हणजे केवळ माती नाही, ती शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आई आहे. त्या मातीत तो नुसते बियाणे नव्हे, तर आशा पेरतो. एका दाण्यात पोटभर अन्न होईल, या विश्वासाने तो आभाळाकडे डोळे लावून बसतो. परंतु आभाळ ही अनेकदा रुसून राहतं, आणि मग डोळे पाणावतात. अखेर, माती आणि घाम एकरूप होतात... अनेकदा रक्त देखील त्यात सामावून जातं. शहरातल्या माणसांसाठी शेती ही केवळ नकाशावर दाखवलेली जमीन असते. त्यांना पिकांचे भाव समजतात, पण त्या भावांसाठी जीव तोडण...

स्व.वैजंताताई शिवदास भोलाणे - गेली माऊली, मागे राहिल्या आठवणी !

इमेज
स्व.वैजंताताई शिवदास भोलाणे - गेली माऊली, मागे राहिल्या आठवणी ! धरणगाव या पवित्र मातीमध्ये, १ जून १९३७ रोजी जन्मलेल्या स्वर्गीय वैजंताताई शिवदास भोलाणे या एक अत्यंत साध्या, शिस्तप्रिय, शांत स्वभावाच्या आणि अंतःकरणाने समृद्ध अशा मातृरूप होत्या. त्या काळात मुलींसाठी शिक्षणाची संधी मर्यादित असताना ही त्यांनी सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून केवळ अक्षर ओळखच नव्हे, तर आयुष्याचे मर्म समजून घेतले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक सुसंस्कृत मृदुता होती. जी त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला सहज अनुभवता येई. त्यांचे माहेर आणि सासर दोन्ही धरणगाव या गावी असल्यामुळे त्या गावाच्या मातीशी घट्टपणे जोडलेल्या होत्या. त्या नात्याला त्यांनी आपल्या कर्तव्यपरायणतेने, संयमाने, प्रेमाने आणि मायेच्या अपार सागराने अधिकच पवित्र करून टाकले. संसाराची सुरुवात आर्थिक चणचणीमध्ये झाली. त्यांचा  पतींची परिस्थिती गरिबीची  होती. परंतु, त्या परिस्थितीकडे त्यांनी कधी ही तक्रारीच्या नजरेने पाहिले नाही. उलट, त्या परिस्थितीत ही त्यांनी प्रत्येक दिवस मायेने, कष्टाने, आणि समाधानी वृत्तीने फुलवला. त्यांच्या सहवासात ...

कर्तृत्वाचा दीपस्तंभ – श्री. नितीन गजानन महाजन

इमेज
कर्तृत्वाचा दीपस्तंभ – श्री. नितीन गजानन महाजन  काही माणसं शांत असतात, पण त्यांचं कार्य मात्र मोठ्यानं बोलतं. ना कधी स्वतःची जाहिरात, ना आत्मप्रशंसा… तरी ही त्यांच्या निष्ठेने, प्रामाणिकतेने आणि सातत्याने केलेल्या कामातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी, उठावदार ओळख निर्माण होते. अशीच एक प्रेरणादायी ओळख म्हणजे – १३२ के.व्ही. उपकेंद्र शिरपूरचे उपकार्यकारी अभियंता, श्री. नितीन गजानन महाजन. महापारेषण कंपनीच्या नाशिक येथे पार पडलेल्या २० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने, त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्यस्तरीय फील्ड अवॉर्ड २०२४-२५ त्यांना प्रदान करण्यात आली. हा पुरस्कार केवळ एक प्रमाणपत्र नव्हे, तर त्यांच्या अखंड सेवाभावाची, झिजणाऱ्या प्रयत्नांची आणि न थकता केलेल्या कार्याची अधिकृत पावती आहे. वीजपुरवठ्यासारखी अत्यंत महत्त्वाची आणि गुंतागुंतीची व्यवस्था हाताळणं हे केवळ तांत्रिक ज्ञानाचं काम नसून, ती एक मोठी सामाजिक जबाबदारी ही असते. लाखो घरांमध्ये प्रकाशाची एकसंधता टिकून राहावी, कोणी ही अंधारात अडकू नये, यासाठी कुणीतरी आपला वेळ, श्रम, झोप आणि आयुष्यही या कार्याला...

धानोरा विद्यालय – स्वच्छतेच्या वाटेवरून यशाकडे वाटचाल

इमेज
धानोरा विद्यालय – स्वच्छतेच्या वाटेवरून यशाकडे वाटचाल धानोरा – एका छोट्याशा गावात वसलेली, पण मोठ्या स्वप्नांनी उजळलेली एक शाळा. शिक्षण ही केवळ पुस्तकी गोष्ट नसून, ती जीवनशैली असते हे आपल्या कार्यातून सिद्ध करणारी प्रेरणादायी कहाणी म्हणजे झि.तो. महाजन माध्यमिक विद्यालय व ना.भा. पाटील ज्युनिअर कॉलेज, धानोरा. दि. २९ जून रोजी जैन हिल्स, जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या भव्य सोहळ्यात धानोरा विद्यालयाने आपल्या कर्तृत्वाचा एक सुवर्णक्षण गाठत राज्यस्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त केला. हा पुरस्कार केवळ एक सन्मान नव्हता, तर शाळेच्या स्वच्छतेबाबत घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि सुसंस्कारित शिक्षणपद्धतीची अधिकृत पोचपावती होती. या गौरवशाली पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी कस्तुरबा सभागृहात विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समिती सदस्य बी.एस. महाजन, योगेश पाटील, प्राचार्य के.एन. जमादार, पंकज महाजन, समन्वयक वासुदेव महाजन, प्रा. मिलिंद बडगुजर, डिगंबर सोनवणे आणि मच्छिंद्र महाजन...

गुणांच्या छायेत गहाळ झालेलं आयुष्य !

इमेज
गुणांच्या छायेत गहाळ झालेलं आयुष्य ! ती फक्त एक मुलगी होती जिवंत, हसरी, मनापासून स्वप्नं जपणारी, आयुष्याला समजून घेण्याचा प्रयत्न करणारी. NEET परीक्षेच्या सराव चाचणीत तिचे अपेक्षे प्रमाणे गुण आले नाहीत... इतकंच. ती नापास झाली नव्हती, तिने हार मानलेली नव्हती, ती अजून ही प्रयत्नशील होती. पण तिचा वडील एक शिक्षक, एक मुख्याध्यापक जो इतर विद्यार्थ्यांना अपयशातून मार्ग दाखवतो, त्याच्याच घरात त्याने आपल्या स्वतःच्या लेकीला समजून न घेता अमानुष शिक्षा केली. ती शिक्षा इतकी क्रूर आणि असह्य होती की, तिचा शेवट तिच्या जीवनावर झाला. आज ही मन सुन्न होतं, अंगावर काटा येतो. एका निष्पाप मुलीने केवळ काही गुण कमी मिळाल्यामुळे प्राण गमावावा, ही केवळ एका कुटुंबातील शोकांतिका नाही; ती आपल्या शिक्षण व्यवस्थेतील, समाजातील आणि पालकत्वातील चुकीच्या समजुतींची भीषण परिणती आहे. जेव्हा आपण यश म्हणजे केवळ गुण, टक्केवारी आणि वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी प्रवेश मानतो, तेव्हा आपण आपल्या मुलांचं बालपण, त्यांची स्वप्नं, आणि त्यांचं आयुष्य हळूहळू हरवत जातो. त्या वडिलांनी एक क्षण विचार केला असता, की ज्या शाळेत ते मु...

हसऱ्या मनाचा दिलदार माणूस – पंकज पाटील !

इमेज
हसऱ्या मनाचा दिलदार माणूस – पंकज पाटील ! माणूस मोठा असतो त्याच्या पदाने, पैशाने नाही… तो मोठा असतो त्याच्या मनाने, त्याच्या स्वभावाने, त्याच्या दिलदारीने… आणि हाच आदर्श उभा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे – पंकज पाटील! कासोदा येथील कारखाना परिसरात लहानपणापासून वाढलेला पंकज, आज अनेकांच्या मनात एक हसरा, प्रेमळ आणि दिलदार माणूस म्हणून ओळखला जातो. त्याचे वडील त्या कारखान्यात काम करत होते. कष्ट, प्रामाणिकपणा आणि सचोटी हेच त्यांच्या घरातील संस्कारांचे मूळ. तेच संस्कार पंकजभाऊंच्या व्यक्तिमत्त्वात आज ही जिवंत आहेत. कारखाना बंद झाला… परिस्थिती बदलली… पंकजने आपला गाव गाठल पण त्याची हसरी मुद्रा, मनातली माणुसकी, आणि साऱ्यांना हासवण्याची ताकद तशीच टिकून राहिली. त्याने कधी ही परिस्थितीवर रडणं शिकलं नाही, तर ती हसत-हसत झेलणं शिकवलं. कोणी दुःखी असेल, चिंतेत असेल तर पंकज पाटील त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, “चिंता करू नको मित्रा, आपण आहोत ना!” अशा या सर्वांचा लाडका, हास्यविनोदात रमणारा, मनमिळावू, आणि लोकांच्या मनात घर करून राहणाऱ्या पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचं निमित्त हे फक्त एक औपचारि...

“विद्येच्या विश्वात कु. आराध्याचा राष्ट्रीय सन्मान”

इमेज
“विद्येच्या विश्वात कु. आराध्याचा राष्ट्रीय सन्मान” विद्येचे गगन गाठण्यासाठी जिद्द, कष्ट आणि योग्य संस्कारांची साथ मिळाली तर लहानग्यांची झेप राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणे सहज शक्य होते, हेच पुन्हा एकदा सिध्द झाले आहे! अशाच एका प्रेरणादायी यशोगाथेचे साक्षीदार आपण सध्या एरंडोल न्यू इंग्लिश मेडियम स्कूल मधून झाले आहे. या शाळेतील अत्यंत हुशार, जिद्दी आणि गुणी विद्यार्थिनी कु. आराध्या कृष्णा महाजन हिने राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या प्रतिष्ठित सर्वोदय अवॉर्ड स्कॉलरशिप परीक्षा 2024/25 मध्ये आपली चमकदार छाप उमटवली आहे. या लेकीने राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक पटकावत केवळ आपल्या शाळेचंच नव्हे तर कुटुंबाचे आणि गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळवले आहे. कालिकत, केरळ येथे आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत कु. आराध्याने आपल्या मेहनत, जिद्द आणि अखंड प्रयत्नांच्या जोरावर मेरिटमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या घवघवीत यशाचा सन्मान म्हणून तिला प्रमाणपत्र, गोल्ड मेडल आणि रोख रक्कम अशा सन्मानाचा बहुमान प्रदान करण्यात आला आहे. या लेकीचं हे मोठं यश साजरं करताना शाळेचे आदरणीय प्रिन्सिपल श्...

चांदोबाच्या घराचा जादुई मेळावा !

इमेज
चांदोबाच्या घराचा जादुई मेळावा ! विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, वाघनगर जळगाव येथे नुकताच ‘गोष्टी कवितेचा’ सुंदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमामुळे शाळेचे वातावरण जणू लहानग्यांच्या हास्याने आणि कवितेच्या जादूनेच भरून गेले होते. इयत्ता पहिलीच्या बालभारतीतील कवी विलास मोरे लिखित ‘चांदोबाच घर’ या कवितेला शाळेच्या संगीत शिक्षिकेने जिव्हाळ्याचा स्वर आणि मधुर तालाचा साज चढवून जणू नवचैतन्य दिले. लहानग्यांच्या गोड आवाजात साकारलेली ही कविता ऐकून उपस्थितांच्या चेहऱ्यांवरील हास्य खुलून आलेच, शिवाय त्यांच्या काळजाच्या कोपऱ्यात लहानपणाच्या रम्य आठवणींचा गोड हुंगार ही जागवून गेला. विद्यार्थ्यांच्या लहानशा सुमधुर आवाजात सादर झालेली ही कविता जणू चंद्राच्या अलवार प्रकाशासारखीच साऱ्या वातावरणात विसरून गेली. शाळेचे मुख्याध्यापक, समस्त शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आनंददायी क्षणाचे साक्षीदार झाले. लहानग्यां प्रति आपुलकीने भरलेले प्रत्येक डोळे, त्यांच्या स्वरांतून साकारलेली कविता, त्यांच्या सहजरंगात जपलेली निर्मळता जणू...

“समतेचं, आपुलकीचं आणि संयमाचं जिवंत मंदिर - अ‍ॅडवोकेट विजय संतोष चौधरी”

इमेज
“समतेचं, आपुलकीचं आणि संयमाचं जिवंत मंदिर - अ‍ॅडवोकेट विजय संतोष चौधरी”  काही माणसं त्यांच्या साधेपणानेच लक्ष वेधून घेतात. त्यांच्या सहवासात आपुलकीचं हास्य, संयमाचा साज आणि दिलदारीचं वलय कायम राहातं. अशाच थोर व्यक्तिमत्त्वाचा संदर्भ घेताना आपोआपच समोर येतं ते नाव – पाळधीचे अ‍ॅडवोकेट विजय संतोष चौधरी! कायद्याच्या मंदिरात आपली भूमिका संयमाने निभावताना, जिथे न्यायाचा आदर्श घडवून ठेवला आहे, तिथेच व्यक्तिगत आयुष्यातही त्यांनी आपुलकीचं सुंदर जाळं विणलं आहे. मोठ्या पदावर असूनही प्रत्येकाला "भाऊ" म्हणून सन्मानाने संबोधणारे, साधेपणाचा साज लेवून राहणारे हे व्यक्तिमत्त्व म्हणजेच समतेचं जिवंत प्रतीक आहे. दीनदुबळ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे, प्रत्येकाच्या दुःखाचा हिस्सा होणारे अ‍ॅडवोकेट विजय संतोष चौधरी म्हणजे सहानुभूतीचं, संयमाचं आणि आपुलकीचं जिवंत मंदिर आहे. त्यांच्या सहवासात प्रत्येकाला आपुलकीचं आणि आधाराचं स्थान आहे, म्हणूनच ते आपल्यासाठी केवळ एक नाव नाहीत, तर आदराचा, विश्वासाचा आणि स्नेहाचा आदर्श आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्...

साधेपणाचा आदर्श, जिद्दीचा महामेरू – दाढीवाले गुरुजी

इमेज
साधेपणाचा आदर्श, जिद्दीचा महामेरू – दाढीवाले गुरुजी काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात जी आपला साधेपणा, जिद्द आणि कष्टाच्या जोरावरच इतिहास घडवून जातात. अशाच महान शिक्षकाचा, आदर्श गुरूंचा आणि सायकलस्वार शिक्षकाचा वारसा आहे दाढीवाले गुरुजी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाणारे स्व.धनराज गुलाबराव सोनवणे ऊर्फ नानासाहेब. २७ जानेवारी १९४७ रोजी जळगाव तालुक्यातील रायपूर कंडारी या साध्या सरळ गावात जन्म घेतलेल्या नानासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया कष्ट, साधेपणा, जिद्द आणि स्वाभिमान या मूल्यातूनच घडला. सहा भावंडांच्या कुटुंबात, आईवडील आणि आजींच्या सहवासात घडलेले त्यांचे बालपणच त्यांना साधेपणाचा आदर्श घडवून गेले. महात्मा गांधींचे अनुयायी श्री. मणीभाई देसाई यांच्या शेती फार्मवर काम करणारे त्यांचे वडील गुलाबराव सोनवणे ऊर्फ जिभाऊ यांच्या सहवासातच त्यांच्या मनात जनसंपर्क, कष्ट आणि जाणीव या संस्कारांची बीजे रुजली. लहानपणापासूनच जिद्दीने घडलेल्या नानासाहेबांनी पहाटेच चिंचोली ते जळगाव दूध पोहोचविण्याचे काम करून आपले शिक्षण पूर्ण केले. या जिद्दीतूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडवून दिला त्यांच्या ...

“बहुआयामी व्यक्तिमत्त्वास शुभेच्छा”

इमेज
“बहुआयामी व्यक्तिमत्त्वास शुभेच्छा” काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात जी आपोआपच आपली गुरू म्हणूनच नव्हे तर आधारस्तंभ म्हणून स्मरणात राहतात… आदरणीय गुरुवर्य, कवी, पत्रकार, लेखक, गायक, वक्ते अशा विविध भूमिका निभावणारे आदरणीय नानासाहेब प्रा. श्री. बी. एन. चौधरी सर म्हणजेच अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा साक्षात्कार आहे. विद्येचं मंदिर जपणारे गुरुवर्य, लेखणीतून संस्कारांचा सुगंध साऱ्या समाजात पसरणारे लेखक, काव्याच्या सुमधुर ओळींमधून आपुलकीचं गाणं गुंफणारे कवी, आपल्या आवाजानं श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेणारे गायक आणि आपल्या तेजस्वी वाणीने समोरच्याच्या मनात सकारात्मक ऊर्जा चेतवणारे वक्ते… या साऱ्या भूमिका निभावताना सरांचं व्यक्तिमत्त्व जणू साक्षात स्फूर्तिदायी प्रकाशकिरणच आहे. सरांच्या सहवासात राहूनच कळतं की साधेपणातच किती मोठं तेज आहे… संयमाच्या कक्षेतच कसा सखोल आदर आहे… आणि सर्जनशीलतेतच कसा जगण्याचा सुंदर अर्थ आहे. त्यांचा सान्निध्याचा स्पर्श म्हणजे जणू स्फूर्तीचं एक झरंच आहे, जे आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचा मार्ग समृद्ध करत राहतं.  आदरणीय नानासाहेब, आपल्या वाढदिवसानिमित्त आम्हा...

संयमाचा सुगंध, आपुलकीचं लेणं – डॉ. दादासाहेब किरण दत्तात्रय सूर्यवंशी

इमेज
  संयमाचा सुगंध, आपुलकीचं लेणं – डॉ. दादासाहेब किरण दत्तात्रय सूर्यवंशी  काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी आपली छाप केवळ शब्दांतून नव्हे तर आपल्या साधेपणातून, संयमातून आणि सुसंस्कारांतूनच इतरांच्या मनात कायमचं स्थान मिळवतात. अशाच थोर, सोज्वळ, संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा आज विशेष दिवस आहे. डॉ. दादासाहेब किरण दत्तात्रय सूर्यवंशी! शेंदुर्णी मधील सूर्यकिरण हॉस्पिटलचे संचालक म्हणून त्यांनी रुग्णसेवेला आपलं जीवन समर्पित केलं आहे. त्यांच्या सहवासातच जणू आधाराचा दिलासा आहे… त्यांच्या बोलण्यातच जणू आपुलकीचं लेणं आहे… त्यांच्या स्पर्शातच जणू विश्वासाचा जिव्हाळा आहे. जेव्हा रुग्ण त्यांच्या दवाखान्यातून घरी जातो, तेव्हा औषधासोबतच त्यांच्या सहृदयी व्यक्तिमत्त्वाचा सुगंध ही आपल्या सोबत घेऊन जातो. माजी सदस्य म्हणून पंचायत समिती जामनेर मधून त्यांनी संयम, सुसंस्कार आणि सचोटीचं ज्वलंत दर्शन घडवलं आहे. जिथे जिथे त्यांनी आपली भूमिका निभावली आहे, तिथे तिथे विश्वासाचा पाया रचला आहे. शेंदुर्णी फळ विक्री संस्थेमार्फत शेतकऱ्यांच्या हिताचा मार्ग शोधत सहकाराचा आदर्श जपला आहे. त्यांच्य...

आपला पहिला हिरो – आपलाच बाप !

इमेज
आपला पहिला हिरो – आपलाच बाप ! काही हिरो चित्रपटांत दिसतात, तर काही खेळाच्या मैदानात… पण एक हिरो आहे जो आपल्यासोबतच राहतो, आपल्याला घडवतो, आपलं भविष्य घडवण्यासाठी आपल्या प्रत्येक श्वासाचा उपयोग करतो. तो आहे आपलाच ‘बाप’! तो मोठमोठे संवाद कधीच मारत नाही… तो कधीच आपल्यासमोर आपली वेदना मांडत नाही… तो कधीच आपली कष्टं दाखवत नाही… पण तोच आहे जो आपल्याला आधार देण्यासाठी आपलं अख्खं जग खर्च करतो. बाप म्हणजे आपलं पहिलं शाळा आहे… तोच आपला पहिला शिक्षक आहे… तोच आपला पहिला रक्षक आहे… तोच आपला पहिला मित्र आहे! तो आहे म्हणूनच आपल्याला घसरून पडल्यावर पुन्हा उठायला ताकद मिळते, तो आहे म्हणूनच आपल्याला लहानपणापासूनच मोठी स्वप्नं पाहण्याची सवय लागते, तो आहे म्हणूनच आपल्याला जग जिंकण्यासाठी हिंमत मिळते. तो कदाचित आपल्याला मिठीत घेऊन रोज ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असं सांगत नसेल… पण आपल्या प्रत्येक घासात, आपल्या प्रत्येक श्वासात त्याचीच काळजी दडलेली आहे. तो आहे म्हणूनच आपलं जग आहे… तो आहे म्हणूनच आपलं अस्तित्व आहे… तो आहे म्हणूनच आपलं भविष्य आहे! म्हणूनच लक्षात ठेवा, आपला रिअल हिरो हा चित्रपटात नसतो...

“गरीबीला हरवून जिद्दीनं घडवलेलं विश्व - नितीन लक्ष्मण चौधरी”

इमेज
“गरीबीला हरवून जिद्दीनं घडवलेलं विश्व - नितीन लक्ष्मण चौधरी” काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात, जी अगदी शून्यातूनच आपलं विश्व घडवतात… जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आपली वेगळीच ओळख निर्माण करतात. अशाच जिद्दी व्यक्तिमत्त्वाचं नाव आहे. नितीन लक्ष्मण चौधरी. एरंडोल या छोट्याशा गावात, अगदी साध्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करीत, तर कुटुंबाचा गाडा कसा-बसा रेटला जात असे. गरीबीचं वातावरण, कष्टाचा रोपलेला घाम आणि दिवसेंदिवसचं संघर्षमय जगणं अशा परिस्थितीतच लहानग्या नितीनचं बालपण सरत गेलं. लहानपणापासूनच त्यांच्या मनात एकच गोष्ट घोळत राहिली “जर आपल्याला कुटुंबाला अडचणींमधून बाहेर पडायचं असेल तर कष्टाशिवाय पर्यायच नाही”. याच जाणीवेनंच अवघ्या आठव्या वर्षीच ते कुटुंबाचा आधार होण्यासाठी पुढे सरसावले. लहान वयातच डॉ. सतीश पाटील यांच्याकडे रोज दोन रुपये मेहनतानं कमवायला सुरुवात केली. कष्टाच्या या शाळेतच आपलं शिक्षण घडवलं, आपलं शालेय जीवन आठवी पर्यंत तिथेच काम करून पूर्ण केलं. जिद्द एवढीच… दहावी पर्यंतच शिक्षण घेत, मोठा मुलगा म्हणून कुटुंबाचा आधारस्तंभ होण्य...

"शिस्तीतली माया – पोलिसातील माणूस"

इमेज
"शिस्तीतली माया – पोलिसातील माणूस" काही माणसं अशी असतात, जी फक्त वर्दीत दिसत नाहीत, तर वर्दीच्या मागचं माणूसपण ही जगतात. त्यांचा कठोरपणा हा कायद्याच्या रक्षणासाठी असतो, पण मन मात्र लोण्यासारखं कोमल आणि हळवं असतं. अशाच एका संवेदनशील, कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि माणुसकीनं परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं नाव म्हणजे सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार श्री. लालसिंग उदयसिंग पाटील. पिंप्राळा या छोट्याशा खेड्यात एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिलांनी शेतीच्या कष्टातून संसाराचा गाडा ओढला. परिस्थिती सामान्य होती, पण मनात मोठी स्वप्नं होती. लहानपणापासूनच आई-वडिलांचे कष्ट पाहून त्यांना उमजलं “घराची परिस्थिती बदलायची असेल, तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही.” शाळेत नियमितपणे जाणं, अभ्यास करणं आणि त्याच वेळी शेतात कष्ट करणं या सगळ्यात त्यांनी योग्य समतोल राखला. उन्हातान्हात, पावसात ही शिक्षणाचं ध्येय डगमगू दिलं नाही. शिक्षणासोबतच त्यांच्या मनात एक ध्येय रुजलं होतं.“पोलीस व्हायचं.” वर्दी घालून लोकांची सेवा करायची, अन्यायाविरुद्ध उभं राहायचं, आणि समाजाला सुरक्षित ठेवायचं ही त्यां...

“जनतेच्या मनातलं नाव – दादासाहेब करण पवार”

इमेज
“जनतेच्या मनातलं नाव – दादासाहेब करण पवार” एखाद्या माणसाचा चेहरा पाहिला, की त्याच्या मनाचं प्रतिबिंब उमजतं…एखादं व्यक्तिमत्त्व भेटलं, की त्यातून माणुसकीचा सुगंध दरवळतो…आणि एखाद्या नेत्यानं उभं राहिलं, की मागे अख्खी तरुणाई उभी राहते! पारोळा नगरीत असंच एक नाव, ज्याच्या उच्चाराने जनतेच्या हृदयात आपुलकीचा स्पर्श होतो. ते म्हणजे दादासाहेब श्री. करण बाळासाहेब पवार. एक अनुभवी नेतृत्व, एक दिलदार व्यक्तिमत्त्व, आणि एक असा नेता ज्याचं अस्तित्व म्हणजे "कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास." दादासाहेब पवार हे केवळ पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष नसून, ते आज ही जनतेच्या मनात नगराध्यक्षासारखे नाही तर कुटुंबातील मोठ्या भावासारखे जपले जातात. त्यांनी पद असो वा नसो, माणूसपण जपले आणि नेतृत्व म्हणजे अधिकार नाही तर जबाबदारी हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिलं. त्यांचा स्वभाव अत्यंत संयमी, पण निर्णय मात्र नेहमी स्पष्ट आणि जनहितासाठी असतो. कित्येक तरुणांना त्यांनी दिशा दाखवली, अनेकांना संधी दिली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून पुढे चालण्याची हिंमत दिली. त्यांची माणसांशी बांधिलकी ही केवळ राजकी...

"गरिबीच्या धुरातून उगम पावलेला आशेचा उजेड - अ‍ॅड. विजय संतोष चौधरी"

इमेज
"गरिबीच्या धुरातून उगम पावलेला आशेचा उजेड - अ‍ॅड. विजय संतोष चौधरी" पाळधीसारख्या एका छोट्याशा गावात, मातीच्या घरात आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत एका बालकाचा जन्म झाला. त्या मुलाचं नाव होतं विजय संतोष चौधरी. 'विजय' हे त्यांचं केवळ नाव नव्हतं, तर त्यांनी आपल्या आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीवर मिळवलेला खरा विजयच होता. त्यांचे वडील रोजंदारीवर मजुरी करणारे होते. रोजच्या दोन वेळच्या जेवणाची ही चिंता असलेल्या या घरात शिक्षण केवळ स्वप्नवत होतं. मात्र लहानपणापासूनच विजयने आपल्या मनाशी एक गोष्ट ठाम ठरवली होती. "घरची परिस्थिती बदलायची असेल, आयुष्य घडवायचं असेल, तर काम करून शिक्षणाशिवाय दुसरा कोणता ही पर्याय नाही." आई-वडिलांची रोजची धडपड, घाम आणि त्याग त्यांनी अगदी जवळून अनुभवले. त्याच सोबत समाजात पदोपदी जाणवणारा अन्याय आणि विषमता यामुळे त्यांच्या मनात लहानपणापासूनच सामाजिक जाण निर्माण झाली. शिक्षण घेत असतानाच ते पाळधी येथील दलित मित्र व्ही.आर. पाटील यांच्या ‘राकेश स्टोन क्रेशर’ या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करत होते. हे केवळ एक नोकरीचं माध्यम नव्हतं, तर त...

आई-वडिलांची शिदोरी – आयुष्याची खरी समृद्धी

इमेज
आई-वडिलांची शिदोरी – आयुष्याची खरी समृद्धी वडिलांचे कष्ट आणि आईचे संस्कार हीच दोन अत्यंत शक्तिशाली मूर्ती आहेत, ज्या प्रत्येक माणसाचे आयुष्य घडवतात. कोणत्या ही व्यक्तीच्या आयुष्याचा पाया जर मजबूत असेल, तर त्यामागे असतो वडिलांचा घाम आणि आईच्या अंतःकरणातून मिळालेला स्नेह, माया आणि उदात्त शिकवण. वडील हे आपल्या आयुष्याचे आधारस्तंभ असतात. ते कधी ही थकत नाहीत, माघार घेत नाहीत. किती ही कठीण प्रसंग आले तरी, स्वतःचं दुःख मनात दडवून, आपल्या उज्ज्वल भविष्याची चिंता करतात. त्यांच्या डोळ्यांत अनेक अपूर्ण स्वप्नं दडलेली असतात, पण त्यांची असफलता किंवा वेदना ते आपल्या चेहऱ्यावर कधी ही उमटू देत नाहीत. त्यांच्या जगण्याचा एकमेव ध्यास आपली मुलं आपल्यापेक्षा अधिक सुखी आणि यशस्वी व्हावीत. आई ही केवळ स्त्री नसून, ती संपूर्ण घराचा आत्मा असते. तिच्या गोष्टींमधून, तिच्या वागणुकीतून आणि उपदेशांतून आपल्याला जीवनाचे खरे मूल्य समजते. आई आपल्याला स्वाभिमान, प्रामाणिकपणा, नम्रता आणि माणुसकी यांचे बाळकडू देते. लहानपणी रात्री झोपताना तिने सांगितलेल्या गोष्टी, तिने वाढलेले प्रेमाचे घास, तिच्या मिठीतून मिळणार...

"सायकलवरून माणुसकीची वाट चालणारा हिरा- भागचंद भगा चौधरी"

इमेज
"सायकलवरून माणुसकीची वाट चालणारा हिरा- भागचंद भगा चौधरी" श्री. भागचंद भगा चौधरी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अंबळगाव या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे वडील श्री. भगा विष्णू चौधरी हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाच भागचंद चौधरी केवळ दोन वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा कठीण काळात त्यांच्या मोठ्या भावांनी पुढे येऊन घराची सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र, गावात रोजगाराच्या संधी अभावाने संपूर्ण कुटुंबाने मिळेल त्या कामाच्या शोधात धुळे शहरात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. धुळे येथे आल्यावर त्यांचे मोठे बंधू मंगा चौधरी व रामदास चौधरी यांनी हमालीचे काम स्वीकारले. अत्यंत मेहनती, संयमी आणि समर्पित स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्याने लोकांची मने जिंकली. त्यांच्या भावाची नेतृत्वगुणांची दखल घेत त्यांची "हमारी मापाडी संघटनेचे अध्यक्ष" म्हणून निवड झाली. ही निवड म्हणजे त्यांच्या कामातील प्रामाणिक...

“शांत, संयमी व दिलदार व्यक्तिमत्त्व - ‘आबासाहेब’ राजधर महाजन”

इमेज
“शांत, संयमी व दिलदार व्यक्तिमत्त्व - ‘आबासाहेब’ राजधर महाजन” काही माणसांचं अस्तित्वच आपल्या आयुष्यात एक वेगळी उब, एक शांत झुळूक घेऊन येतं. त्यांच्या स्वभावातील गोडवा, विचारांची खोल दृष्टी, माणुसकीची असलेली जाण आणि नातेसंबंधांची जपणूक हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख असते. अशाच गुणांनी सजलेले, मनमिळावू आणि प्रगल्भ विचारांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे राजधर महाजन आपल्यासाठी प्रेमानं आणि आदरानं ओळखले जाणारे आबासाहेब. राजधर आबासाहेब यांचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी आणि चिंतनशील आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे ते सदैव सखोल विचार करत निर्णय घेतात. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या समस्या मांडताना त्यांनी सत्य, न्याय आणि लोकहित यांचा नेहमीच आग्रह धरला. शब्दांची ताकद समाजपरिवर्तनासाठी कशी वापरायची, हे त्यांनी आपल्या कार्यातून सातत्याने दाखवून दिलं. ते केवळ एक पत्रकार नाहीत, तर समाजाच्या विविध थरांशी समरस होऊन कार्य करणारे खरे हक्काचा माणूस आहेत. अनेक सामाजिक संघटनांत त्यांनी सक्रियपणे काम करताना संघर्ष, समजूत आणि सेवाभाव यांचा सुरेख मेळ साधला आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून, संय...

"बा, तथागता!" - बोलीच्या स्पर्शानं पुन्हा जन्मलेली कविता

इमेज
"बा, तथागता!" - बोलीच्या स्पर्शानं पुन्हा जन्मलेली कविता साहित्य हे केवळ शब्दांचं नव्हे, तर आत्म्याचं आणि संस्कृतीचं प्रतिबिंब असतं. आणि जेव्हा एका कवीच्या अंतरंगातून जन्मलेली कविता सव्वा दोनशे पानांची गगनभेदी प्रतिभा घेऊन येते, तेव्हा ती केवळ साहित्यकृती राहत नाही.ती समाजाच्या शुद्ध आत्म्याची साक्ष बनते. “बा, तथागता!” ही कविता म्हणजे डॉ. म.सु. पगारे यांच्या हृदयातून साकारलेली एक शाश्वत अनुभूती आहे. बुद्धाच्या करुणेचा, आईच्या वात्सल्याचा आणि जीवनाच्या खोल अर्थाचा एकत्रित संगम. ही कविता केवळ बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित नाही, तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ही माणूस, त्याचं अस्तित्व, त्याचे संघर्ष आणि त्याचं उध्वस्त होत चाललेलं माणूसपण याचा अत्यंत संवेदनशील व जिवंत विचार करते. आणि या कवितेला जेव्हा खान्देशच्या मातीचा, शब्दांचा आणि भावनांचा स्पर्श होतो, तेव्हा ती नव्याने फुलते नव्याने उमलते. हे शक्य झालं सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांच्या अहिराणी अनुवादामुळे. त्यांच्या भाषांतरातून केवळ ओळींचा नाही, तर भावनांचा, गंधाचा, नात्यांचा आणि संस्कृतीच्या लयींचा अनुवाद ...

"अखेरचा सलाम जयगुरु व्यायाम शाळेच्या उस्तादांना"

इमेज
"अखेरचा सलाम जयगुरु व्यायाम शाळेच्या उस्तादांना" आज एरंडोलच्या कुस्तीप्रेमी मातीत गहिरं मूक शोक पसरले आहे. ही तीच माती, जिने असंख्य मर्दानी पैलवान घडवले, शौर्य, कर्तृत्व आणि परंपरेचं संगोपन केलं. पण आज तीच माती अश्रूंनी ओलावलेली आहे. कारण तिचा एक कर्तृत्ववान पुत्र, एक अखंड तपश्चर्या करणारा पैलवान, आणि एक निष्ठावान उस्ताद स्वर्गीय पांडुरंग महाले हे आज आपल्यातून निघून गेले आहेत. त्यांच्या निधनामुळे केवळ एक व्यक्ती हरवलेली नाही, तर एरंडोलच्या कुस्ती क्षेत्रातील एक अख्खं युगच समाप्त झालं आहे. त्यांनी घडवलेली शिस्त, रुजवलेली संस्कारांची बीजं आणि जोपासलेली मातीशी निष्ठा हे सर्व आज काळाच्या कुशीत विसावलं आहे. पांडुरंग महाले हे केवळ शारीरिक दृष्ट्या बळकट नव्हते, तर त्यांच्या डोळ्यांत तेज, हृदयात प्रामाणिकपणा आणि विचारांत स्पष्टता होती. कुस्ती हे त्यांच्या दृष्टीने केवळ एक खेळ नव्हते ती होती आराधना. माती ही त्यांच्यासाठी दैवत होती. तिच्या कुशीत त्यांनी केवळ घाम सांडला नाही, तर आयुष्य अर्पण केलं. जयगुरु व्यायामशाळेचे उस्ताद या नात्याने त्यांनी शेकडो तरुणांना घडवलं. त्यांचं ...

"माणुसकीच्या वाटेवर चालणारा मशीहा - डॉ. गजानन पाटील"

इमेज
"माणुसकीच्या वाटेवर चालणारा मशीहा - डॉ. गजानन पाटील" समाजात काही व्यक्ती अशा असतात की, त्यांचं कार्य केवळ व्यवसायापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते एक सामाजिक चैतन्य ठरतं. त्यांच्या हातून जे घडतं, त्यातून केवळ उपचार नव्हे, तर संपूर्ण जीवनच पुन्हा उभं राहतं. अशा रुग्णांना नव्याने जगण्याची उमेद आणि आशा मिळते. अशाच समाजशील सेवाभावाने प्रेरित होऊन आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आपली विशिष्ट ओळख निर्माण करणाऱ्या डॉक्टरांचं नाव म्हणजे डॉ.गजानन पाटील. जळगाव येथील केवळ हॉस्पिटलचे संचालक आणि गायनाकॉलॉजी व इंडोस्कोपी या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ म्हणून डॉ. पाटील यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. मात्र त्यांच्या कार्याचं खरे मोल त्यांच्या मनात असलेल्या माणुसकीच्या ओलाव्यात आहे. डॉ. पाटील यांनी आजवर हजारो महिलांना गंभीर आरोग्यसंकटातून बाहेर काढून नवजीवन दिलं आहे. त्यांच्या उपचारांमध्ये केवळ आधुनिक तंत्रज्ञान आणि औषधोपचार नव्हते, तर समर्पण, सहवेदना आणि आत्मीयता यांचा अमूल्य स्पर्श होता. आज जेव्हा वैद्यकीय सेवा व्यावसायिक चौकटीत अडकलेली जाणवते, तेव्हा डॉ. गजानन पाटील यांचं का...

“मातीतून उगवलेलं तेजस्वी जीवन”- स्व.हिम्मतराव जुलाल सूर्यवंशी

इमेज
“मातीतून उगवलेलं तेजस्वी जीवन”- स्व.हिम्मतराव जुलाल सूर्यवंशी  जगात काही माणसं अशी असतात की त्यांची ओळख त्यांच्या नावावरून नव्हे, तर त्यांच्या अस्तित्वाच्या गहिर्‍या, शांत आणि प्रेमळ स्पर्शातून होते. त्यांना स्वतःबद्दल बोलण्याची गरज भासत नाही.त्यांच्या साधेपणात, त्यांच्या कृतीत आणि त्यांच्या निस्वार्थ प्रेमातच ते अजरामर होतात. स्वर्गीय हिम्मतराव जुलाल सूर्यवंशी हे असेच एक तेजस्वी आणि पवित्र व्यक्तिमत्त्व. मूडी प्रा. व पांझरा परिसरातच नव्हे, तर अनेकांच्या हृदयात “पितामह” म्हणून आज ही ते श्रद्धेने स्मरणात आहेत. त्यांचा घराची परिस्थिती हलाखीची होती, पण मन मात्र विशाल होतं. लहानपणापासूनच त्यांनी शेतातील मातीचा गंध आणि आई-वडिलांच्या कष्टांचे व्रण मनात साठवले. त्या वेळीच त्यांनी जाणलं.शिक्षणच गरिबीचा अंधार दूर करू शकतं. त्यामुळे एका हातात नांगर आणि दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन त्यांनी जुनी सातवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. हे शिक्षण, जरी मर्यादित होतं, तरी त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी ज्ञानाची मशाल ठरली. त्यांची खरी ओळख मात्र शालेय सर्टिफिकेट मध्ये नव्हती, ती होती त्यांच्या कृत...

"एक उजळलेली वाट – प्रीतीलाल पवार"

इमेज
"एक उजळलेली वाट – प्रीतीलाल पवार" काही माणसं फक्त स्वतःचं आयुष्य जगत नाहीत, तर त्यांच्या जीवनातून एक विचार, एक प्रेरणा सतत जागी राहते. संघर्ष, चिकाटी आणि समाजकार्याच्या मूल्यासोबत ज्यांनी आपला जीवनप्रवास घडवला, अशा आदरणीय उपप्राचार्य प्रीतीलाल निंबा पवार यांचं कार्य आणि व्यक्तिमत्त्व हे सर्वांसाठी आदर्शवत आहे. सन २०१८ मध्ये ते जिल्हा परिषद विद्यानिकेतन आणि कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथून उपप्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले. मात्र, त्यांच्या सेवानिवृत्तीचा अर्थ "विश्रांती" असा नव्हता. कारण त्यांनी सुरू केलेला संघर्षाचा, जिद्दीचा आणि समाजासाठी झिजण्याचा प्रवास अजून ही तितक्याच जोमाने सुरू आहे. प्रीतीलाल पवार हे मूळचे बहादरपूर (ता. पारोळा) येथील असून, सारवे (ता. धरणगाव) हे त्यांचे वास्तव्याचे व कर्मभूमीचे ठिकाण. सारवे गावातून शासकीय सेवेत भरती होणारे ते त्या काळातील एकमेव व्यक्ति होते, ही गोष्टच त्यांच्या कर्तृत्वाची महत्त्वाची साक्ष देणारी आहे. त्यांची बालपणीची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. घरात वीज नव्हती, झोपडीचं निवासस्थान होतं, आणि गरिबी हेच रोजचं वास...

सुदामभाऊ महाजन – एक शांत, संयमी दीपस्तंभ...

इमेज
  सुदामभाऊ महाजन – एक शांत, संयमी दीपस्तंभ...  धरणगाव हे नाव जरी उच्चारलं, तरी काही निवडक, पण हृदयाशी जुळलेली माणसं आठवतात. त्या सन्माननीय व्यक्तींपैकी एक नाव म्हणजे सुदाम भाऊ महाजन. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ औपचारिक शुभेच्छा नव्हे, तर अंतःकरणातून येणारा आदर, सन्मान आणि कृतज्ञतेच्या भावनांनी मन भरून येतं. त्यांचा शांत, संयमी स्वभाव, विचारपूर्वक कृती आणि प्रत्येक कामात असलेलं मन:पूर्वक समर्पण हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे द्योतक आहे.आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थाने व्यापलेल्या युगात, जिथे थोडंसे सामर्थ्य ही गर्वाच्या आवरणात झाकलं जातं, तिथे सुदाम भाऊंनी नम्रता, प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थ वृत्ती यांचा उत्तम संगम साधत आपली जबाबदारी लीलया पार पाडली आहे. धरणगाव येथील होमगार्ड कार्यालयाचे प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी शिस्त, जबाबदारी आणि सेवाभाव यांचं एक अनुकरणीय उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व केवळ एका अधिकाऱ्याचं नव्हे, तर एक सुसंस्कृत माणूस, एक हितचिंतक, एक योग्य मार्गदर्शक आणि संकटात खंबीर आधार देणारा आधारस्तंभ अशी त्यांची ओळख आ...

पंडित माधवराव साळी : शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा दीपस्तंभ

इमेज
पंडित माधवराव साळी : शिक्षण, संस्कार आणि समर्पणाचा दीपस्तंभ शिक्षक म्हणजे केवळ वर्गात धडे देणारा नसतो... तो आयुष्याचे खरे धडे शिकवतो. तो ज्ञान देतो, संस्कार रुजवतो, विचारांची दिशा देतो आणि मन घडवतो. अशा शिक्षकांचे अस्तित्व समाजासाठी भाग्याचं असतं. पंडित माधवराव साळी हे असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व संयम, संघर्ष, समर्पण आणि सेवाभाव यांचं मूर्तिमंत प्रतीक. त्यांचा जन्म एरंडोल या छोट्याशा गावात एका साध्या, परंतु कष्टकरी विणकर कुटुंबात झाला. घरात आर्थिक सुबत्ता नव्हती, पण त्यांच्या डोळ्यांत मोठी स्वप्नं होती. लहान वयातच त्यांनी आपल्या आई-वडिलांचे कष्ट जवळून पाहिले. आणि तेव्हाच त्यांच्या मनात एक निश्चय पक्का झाला "या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे!" अन् मग सुरू झाला एक अविरत प्रवास… घरकाम, शिक्षकांच्या घरी पाणी भरणं, आणि त्याच वेळी अभ्यास. लहानपणापासूनच त्यांना शिक्षक होण्याची तीव्र इच्छा होती. त्यांच्या ओठांवर नेहमी एकच वाक्य असायचं "एक शिक्षक, एक संपूर्ण पिढी घडवू शकतो!" त्यांची डी.एड. प्रशिक्षणासाठी जळगाव येथे मेरिटवर निवड झ...

सेवाभावाचे अढळ प्रतीक – अरुण श्रावण सोनवणे

इमेज
सेवाभावाचे अढळ प्रतीक – अरुण श्रावण सोनवणे  जळगाव तालुक्यातील नांद्रा या छोट्याशा गावात एका साध्या, मध्यमवर्गीय कुटुंबात अरुण श्रावण सोनवणे यांचा जन्म झाला. त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच जणू कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची ज्योत त्यांच्या अंतर्मनात प्रज्वलित झाली होती. त्यांचे वडील पोलीस खात्यात (एस.आय.) म्हणून कार्यरत होते. घरातील शिस्त, सेवा आणि सच्चाई या मूळ मूल्यांचं बाळकडू त्यांना बालपणीच लाभलं. बालपणापासून अरुणजींच्या मनात लोकसेवेबद्दल विशेष आकर्षण होतं. विशेषतः आरोग्य क्षेत्रा विषयी त्यांचं आत्मीय नातं निर्माण झालं होतं. लोकांच्या दुःखात सहभागी होणं, गरजूंसाठी काहीतरी करणं, त्यांना आधार देणं हे त्यांच्या स्वभावात खोलवर रुजलेलं होतं. घरची परिस्थिती अत्यंत साधी तरी ही त्यांनी कधी ही त्याचा बाऊ केला नाही. उलट परिस्थितीवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवायचं, ही जिद्द त्यांनी लहान वयातच मनाशी बांधली होती. शिक्षणाची महत्त्वाची जाणीव त्यांना फार लवकर झाली. "घरात प्रगती घडवायची असेल, तर शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही," हा दृढ विश्वास त्यांनी मनात कायम ठेव...

आदर्श नेतृत्वाचा उत्सव – राजेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
आदर्श नेतृत्वाचा उत्सव – राजेंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थोड्याच व्यक्ती असतात ज्या केवळ आपल्या पदामुळे नव्हे, तर विचारांच्या ठामपणामुळे, कृतीच्या प्रामाणिकपणामुळे आणि जनतेसाठी असलेल्या निस्सीम बांधिलकीमुळे आपलं वेगळं स्थान निर्माण करतात. अशाच थोर व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे आदरणीय राजेंद्र पाटील. स्पष्टवक्तेपणा, उत्तम संघटनशक्ती, आधुनिकतेशी जोडलेली शेतीविषयक दृष्टी आणि लोककल्याणाचा वसा घेणारे नेतृत्व यामुळे ते सामान्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करतात. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाचा मागोवा घेताना त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि माणुसकीच्या दृष्टिकोनाचा गौरव करणे हे आमच्यासाठी भाग्याचं आहे. राजेंद्र पाटील यांचे नेतृत्व हे नेहमीच स्पष्ट, ठाम आणि सत्यप्रिय राहिले आहे. कुठल्या ही परिस्थितीत अडचणींना सामोरे जात त्यांनी नेहमी नीतिमूल्यांचा आधार घेतला. कोणता ही निर्णय घेताना त्यांनी केवळ पक्षाची नव्हे तर जनतेची आणि समाजाची भल्याचीच दृष्टी ठेवली. संघटनशक्ती ही त्यांची खास जमेची बाजू आहे. ...

शिवसेनेच्या सावलीत उमललेला वाघ

इमेज
शिवसेनेच्या सावलीत उमललेला वाघ "एकच नेता, एकच झेंडा, एकच पक्ष आणि एकच मैदान" ही घोषणा केवळ शब्दांची रचना नव्हे, तर ती आहे एका विचारधारेची, निष्ठेची आणि संघर्षातून निर्माण झालेल्या कार्यकर्त्याच्या जीवनाचे प्रतीक. ही कहाणी आहे गुलाबराव वाघ या जिद्दी, कणखर आणि तळमळीच्या शिवसैनिकाची, ज्यांनी १९८४ साली अवघ्या ११वीत शिकत असताना विद्यार्थी सेनेची स्थापना करून आपले संपूर्ण आयुष्य शिवसेनेच्या विचारांना वाहिले. त्या काळात इतक्या लहान वयात भगव्या झेंड्याखाली उभं राहण्याचं आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे झटण्याचं धाडस फार थोड्या माणसांमध्ये दिसून येत होतं. गुलाबराव वाघ हे त्यातलेच एक. कार्यालय प्रमुख या अत्यंत सामान्य पदावरून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्या छोट्याशा पायरीवरून शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, एस.टी. कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेना सहसंपर्कप्रमुख अशी पदांची शिडी चढत, अखेर त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्यापदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास पूर्ण केला. ही फक्त पदोन्नती नव्हे, तर त्यांच्या चार दशके चाललेल्या निष्ठावान, संयमी आणि कार्...