पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाळू डम्पर अजून किती लोकांचा बळी घेणार.....?

इमेज
वाळू डम्पर अजून किती लोकांचा बळी घेणार.....? एक शांत खेडेगाव. सकाळचे आठ वाजत आलेले. एका चिमुकल्या मुलाने शाळेची पिशवी पाठीवर घेतली आहे. तोंडात पोळीचा शेवटचा घास आहे आणि आईच्या "जपून जा रे" या काळजीने ओथंबलेल्या शब्दांना तो डोळ्यांनीच उत्तर देतो. गावातील रस्ता ओळखीचा, माणसंही परिचयाचीच. पण या रस्त्यावरून अचानक धावून येतो एक भरधाव वाळू डम्पर — धूळ उडवत, भीषण आवाज करत, कोणत्याही वाहतूक नियमांना न जुमानता, जणू काही माणसांना चिरडणेच त्याचं उद्दिष्ट आहे. क्षणात सगळं थांबून जातं. एक मोठा आवाज, एक धक्का, आणि एका घराचे जगणेच संपते.आईच्या तोंडून निघालेला "जपून जा" हा वाक्यांश तिच्या आठवणींमध्ये अखेरचा ठरतो.आणि त्या मुलाचे पाय जे परत यायचेच होते. ते आता केवळ आठवणीतच उरतात. हे चित्र आता नित्याचं झालं आहे. रोज कुठल्या ना कुठल्या गावात, शहरात, रस्त्यावर, अशाच दुर्घटना घडतात. फरक असतो तो फक्त मृताच्या नावात. मृत्यू मात्र सारखाच असतो. वेदनादायी, निर्दयी आणि आयुष्यभराचं दुःख देणारा. वाळू डम्परचं प्रकरण केवळ वाहतुकीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही.हा प्रश्न आहे. माणुसकीचा.हा ...

जग जाळणाऱ्यांना किंमत नसते…...!

इमेज
जग जाळणाऱ्यांना किंमत नसते…...! आजचं जग प्रगतीच्या शिखरावर आहे. तंत्रज्ञानानं माणसाला चंद्रावर पोहोचवलं, तर पैशाच्या जोरावर आकाश गाठलं. पण या साऱ्याचं गडगडाट असताना माणुसकीची आणि नात्यांची किंमत हळूहळू कमी होत चालली आहे. कधी काळी भावना समजून घेणाऱ्या नात्यांची आपण सन्मान केला करायचो. जीव ओवाळून एकमेकांसाठी उभे राहणारे लोक होते, ज्यांच्या नात्यांचा पाया प्रेम, आदर आणि समजूतदार पणावर उभा होता. पण आज? नातेसंबंध सुद्धा फायद्याच्या गणितात मोजले जात आहेत. उपयोगी असेल तर जवळचा, नसेल तर दूरचा. संवेदनाशीलता बाजूला ठेऊन फक्त व्यवहार उरला आहे. या महागाईच्या बाजारात माणसाची किंमत मात्र फारच स्वस्त झाली आहे. प्रेम, संयम, सहनशीलता आणि क्षमा या गुणांची किंमत वाढली नाही, कारण लोक आता त्याकडे पाहतच नाहीत. आणि अशा सगळ्यात एक गोष्ट अजून ही अत्यंत स्वस्त आहे. माचिस. एक रुपयाला मिळणारी, पण संपूर्ण आयुष्य जाळून टाकणारी. एका घरासाठी, एका नात्यासाठी, एका स्वप्नासाठी माणूस आयुष्यभर मेहनत करतो. रोज आपली भावना जपतो, राग आवरतो, मनातील अनेक खंत गिळतो  फक्त ते नातं टिकवण्यासाठी. पण या नाजूक नात्याला...

एका शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास डॉ. विजय शास्त्री...!

इमेज
एका शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास डॉ. विजय शास्त्री...! आजच्या या खास दिवशी, डॉ. विजय शास्त्री यांचे जीवन आणि कार्य मनाच्या कोपऱ्यातून उलगडून पाहताना एकच भावना येते. आदर, प्रेरणा आणि कृतज्ञता. फार्मसी शिक्षण क्षेत्रात त्यांनी जे योगदान दिले आहे, ते केवळ एक शिक्षक म्हणून नाही तर एक मार्गदर्शक, आदर्श आणि प्रेरणास्त्रोत म्हणून ही अतुलनीय आहे. १९९३ मध्ये बी. फार्मसीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, १९९५ मध्ये एम. फार्मसी पर्यंत पोहोचला, पण त्यांचा शिकण्याचा, शिकवण्याचा आणि समाजसेवेचा उत्साह कधीही कमी झाला नाही. विविध फार्मसी महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, पीजी गाईड आणि पीएचडी गाईड म्हणून त्यांनी निपुणतेने जबाबदाऱ्या पार पाडल्या. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (UGC) आणि इतर मान्यताप्राप्त संस्थांकडून त्यांना मान्यता मिळणे हे त्यांची कष्ट आणि गुणवत्ता याचे प्रमाणपत्र आहे. फार्मसीशिवाय त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही असामान्य कार्य केले आहे. PCI, MSBTE, DBATU, KBCNMU यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये इन्स्पेक्टर म्हणून त्यां...

बाजारात नाही पत, आणि माझं नाव गणपत.....!

इमेज
बाजारात नाही पत, आणि माझं नाव गणपत.....! हे वाक्य प्रथम ऐकताना हसू येतं, पण त्या मागचं वास्तव आणि वेदना खोलवर जाऊन स्पर्शून जातात. आज आपल्या समाजात असे किती तरी ‘गणपत’ आहेत ज्यांची ना कुणी दखल घेतो, ना कुणी विचारतो, ना घरात स्थान, ना गावात मान. असल्या व्यक्ती स्वतःला मोठं समजतात, आणि इतरांसमोरही तसंच भासवतात जणू काही त्यांच्या शिवाय जगाचं चाक फिरतच नाही.त्यांचा वावर पाहिला तर ते पहिल्यांदा प्रभावी वाटतात.छाती पुढे करून बोलणं, अंगभर राजकीय रंग चढवलेला, आणि नेहमी कोणाच्या तरी मोठ्या नावाचा आधार घेत स्वतःची ‘महत्त्वाची’ ओळख मिरवणं. “माझी पोहोच आहे”, “माझे अधिकारी ओळखीचे आहेत”, “मी सांगितलं तर लगेच होतं”. हे संवाद त्यांच्यासाठी रोजचेच.या सर्व माध्यमांतून ते स्वतःभोवती एक खोट्या प्रतिष्ठेचं आभासी जग उभं करतात. पण जेव्हा त्यांच्या मनाच्या गाभ्यात डोकावून पाहिलं, तेव्हा लक्षात येतं की, त्यांची ‘ओळख’ ही फक्त बाहेरून गोंडस आहे.आतून मात्र पूर्णपणे रिकामी.जे बोललं जातं, ते केवळ दाखवण्यासाठी; आणि जे दाखवलं जातं, ते स्वतःचं खरेपण लपवण्यासाठी. खरं सांगायचं तर, अशा लोकांना कोणत्याही पक्षा...

वज्रमूठ जीवन यशस्वी करण्याचा मंत्र....!

इमेज
वज्रमूठ जीवन यशस्वी करण्याचा मंत्र....! माणसाचं जीवन हे अखंड चालणारा एक प्रवास आहे. या प्रवासात असंख्य वळणं, काही विश्रांतीचे क्षण, तर काही चढ-उतार असतात. या प्रवासात जो स्वतःला हरवू देत नाही, संकटांपुढे झुकत नाही, तोच खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतो. आणि या यशाचा खरा मार्ग सापडतो तेव्हाच, जेव्हा आपल्या आयुष्यात पाच अनमोल गोष्टींचं अस्तित्व दृढ होतं. जशा पाच बोटं मिळून एक हात पूर्ण करतात, तशाच या पाच गोष्टी मिळून आयुष्याला दिशा देतात, बळ देतात आणि यशाच्या वाटेवर पुढं नेतात. उत्तम मित्र म्हणजे केवळ हास्य-विनोदात रमणारा साथी नाही, तर असा आत्म्याचा सखा असतो जो तुमच्या दु:खालाही स्वतःच्या हृदयाशी कवटाळतो. सगळे पाठ फिरवतात, तेव्हा तोच पाठीशी उभा राहतो. तो शब्द न बोलता तुमचं दु:ख समजतो आणि तुमच्यात पुन्हा जगण्याची उमेद जागवतो. आयुष्यात एक जरी असा खरा मित्र लाभला, तरी ते आयुष्य समृद्ध मानावं लागेल. योग्य मार्ग म्हणजे जीवनातला खरा प्रकाशदूत. जीवनाच्या काही वळणांवर वाट चुकते, अंधार दाटतो, पण जर आपण आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला, तर दिशा हमखास सापडते. मार्ग कठीण असो की सोपा, तो योग्य असेल...

भविष्याचा शिक्षक: तुटलेला विश्वास....!

इमेज
भविष्याचा शिक्षक: तुटलेला विश्वास....! कोणी आपल्या विश्वासाला तडा दिला, तर रागावण्याऐवजी त्यांचे ही आभार मानावेत. कारण ते आपल्याला शिकवून जातात.की विश्वास ठेवणं किती मौल्यवान आहे, आणि तो कुणावर, किती, आणि कधी ठेवायचा, हे फार विचारपूर्वक ठरवायला हवं. आपण माणूस म्हणून समाजात जगतो, नातेसंबंधात गुंततो, आपलं मन उघडं करतो. कुणावर विश्वास ठेवतो  हे एक नैसर्गिक व अपरिहार्य वर्तन आहे. पण जेव्हा हा विश्वास कुणी मोडतो, तेव्हा हृदयात खोल जखम होते. दुःख होतं, मन खचतं, आणि अनेकदा स्वतःवरच शंका यायला लागते. परंतु त्या वेदनेमध्येही एक अमूल्य शिकवण असते. कारण प्रत्येक तुटलेला विश्वास हे एक मोठं शिकवण देणारं अनुभवपुस्तक असतं. ते आपल्याला जगाचं वास्तव दाखवतं. हे शिकवतं की माणसं नेहमी आपली अपेक्षा पूर्ण करणार नाहीत. काही जण केवळ आपल्या फायद्यासाठी जवळ येतात. काही जण नकळत का होईना, पण आपलं मन दुखवतात. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण विश्वास ठेवणं सोडून द्यावं. विश्वास ठेवावा, पण डोळसपणे. मनापासून, पण मर्यादित आशा ठेवून. जी माणसं आपला विश्वास मोडतात, ती खरं तर आपले जीवनगुरूच असतात. त्यांच्या...

धरणगावच्या आशेचं नवं पर्व वाल्मीकभाऊ पाटील....!

इमेज
धरणगावच्या आशेचं नवं पर्व वाल्मीकभाऊ पाटील....! जग बदलण्याची ताकद काही माणसांमध्ये उपजत असते. त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या कृतींमध्ये आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेमध्ये एक अशी जादू असते, जी काळाच्या कसोटीवर खरी ठरते. धरणगावच्या मातीनेही अशाच एका खऱ्या, प्रामाणिक, आणि ज्वलंत नेतृत्वाला जन्म दिला आहे.वाल्मीकभाऊ पाटील. जगदंबा कन्स्ट्रक्शनचे संचालक, मा.ना. भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब पालकमंत्री जळगाव यांच्या कट्टर समर्थक असलेले वाल्मीकभाऊ, हे केवळ एक राजकीय चेहरा नाहीत, तर धरणगावच्या जनतेचा विश्वास, आशा आणि भविष्य आहेत. त्यांची कार्यशक्ती, धडाडी, आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना आपल्या प्रश्नासारखं मानून त्यासाठी झगडण्याची वृत्ती, त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, संपूर्ण धरणगावकरांच्या मनात एकच भावना आहे. "हा माणूस आपलाच आहे!" त्यांचं नेतृत्व हे उगवत्या सुर्याप्रमाणे आहे. जे शहराच्या कोपऱ्याकोपऱ्याला प्रकाशमान करत आहे. तरुणाईसाठी प्रेरणा, गरिबांसाठी आधार, आणि वृद्धांसाठी विश्वास असलेले वाल्मीकभाऊ, हे धरणगावच्या राजकारणात एक नवा अध्याय...

नशीबापेक्षा मोठी असते जिद्द...!

इमेज
नशीबापेक्षा मोठी असते जिद्द...! लहानशी एक मुंगी... स्वतःच्या पोटासाठी धान्याच्या शोधात निघते. ती भिंतीवर चढू लागते. एक पाऊल वर जाते, मग दुसरं, पण अचानक घसरते. पुन्हा खाली येते. परत चढते. पुन्हा घसरते. हे असं ती किती वेळा करते? शंभर वेळा? हजार वेळा? पण ती थांबत नाही. कारण तिच्या मनात विश्वास आहे.जिद्दीचा, प्रयत्नाचा, आणि यशाचा. तिच्या अंगात माणसासारखं बल नाही. तिच्याकडे कोणी साथ देणारं नसतं. ती एकटीच असते. पण तिचं ध्येय स्पष्ट असतं.अन्न मिळवायचं, जगायचं. त्या उद्दिष्टासाठी ती दरवेळी प्रयत्न करते. कितीही वेळा ती अपयशी झाली, तरी ती कधीही हार मानत नाही. आपल्याही आयुष्यात असे क्षण वारंवार येतात, जेव्हा वाटतं की आता सगळं संपलंय. परीक्षेत नापास झाल्यावर, एखादं स्वप्न अपूर्ण राहिल्यावर, नात्यात तुटवडा आल्यावर किंवा अपयशानं आत्मविश्वास डळमळीत झाल्यावर मन सुन्न होतं. पण अशा वेळेसच आपली खरी कसोटी लागते.आपण मुंगीसारखे पुन्हा प्रयत्न करतो का, की हार मानून थांबतो? खरं सांगायचं तर, हे जीवन म्हणजेच चढणं आणि घसरणं. प्रत्येक अपयश हा यशाकडे नेणारा एक टप्पा आहे. जर आपण चिकाटी ठेवली, तर यश नक्क...

कधी टाळ्या… कधी टोचे….!

इमेज
कधी टाळ्या… कधी टोचे….! लोकं तुमचे कामांचे कौतुक करो किंवा टीका खरं पाहिलं तर, दोन्ही गोष्टी तुमच्याच फायद्याच्या असतात. कारण माणूस हा सतत शिकत असतो, घडत असतो. प्रत्येक अनुभव, प्रत्येक प्रतिक्रिया त्याला काही ना काही शिकवते. एखाद्याने दिलेलं कौतुक हे त्याच्या डोळ्यातून दिसलेली तुमची झलक असते. ज्यात तुमचं कष्ट, तुमचा प्रयत्न आणि तुमचं मनोबल ओळखलं जातं. अशा शब्दांनी मनाला उमेद मिळते, वाटचाल अधिक आत्मविश्वासाने करता येते. पण फक्त कौतुकानेच माणूस प्रगल्भ होत नाही. टीका सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. अनेक वेळा आपण काही चुकत असतो, पण आपल्याला ते जाणवत नाही. तेव्हा एखाद्याची खरीखुरी, जरा टोचणारी पण स्पष्ट टीका आपल्याला आरसा दाखवते. स्वतःच्या उणिवा समजायला लागतात. आणि माणूस उणीव लक्षात घेतल, की सुधारायला सुरुवात करतो. म्हणूनच टीका ही दुखवणारी असली, तरी ती आपल्या भल्याची असते. आपल्याला ज्यांनी ओळख दिली, त्यांनी आपल्यावर प्रेम केलं, त्यांचं कौतुक आपल्याला उभं करतं. पण जे आपल्यावर टीका करतात, ते आपल्याला डोळस बनवतात. ते प्रश्न विचारतात, ज्याची उत्तरं शोधत आपण स्वतःमध्ये डोकावतो. तुकार...

वादळं येतात पण ती जातात ही....!

इमेज
वादळं येतात पण ती जातात ही....! प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वादळं येतात. ही वादळं केवळ हवामानातील नसतात, तर ती मनातसुद्धा उठतात. नात्यांमधील दुरावे, अपयशांची घालमेल, अपेक्षांमधील गोंधळ, आणि कधी स्वतःच्याच अस्तित्त्वावर उठलेले प्रश्न. अशा काळात मन अस्वस्थ होतं, विचारांची गर्दी अधिकच प्रचंड वाटू लागते. मात्र एवढं लक्षात ठेवायला हवं कोणतेही वादळ कायमचं नसतं. ते येतं, आयुष्य हलवून टाकतं, पण शेवटी शांत होतं… आणि मागे ठेवून जातं काही अनुभव, काही शिकवण, आणि थोडंसं अधिक समजूतदार बनलेलं आपण. वादळं जेव्हा मनात उठतात, तेव्हा सर्व काही विस्कळीत झाल्यासारखं वाटतं. नाती तुटतात, विश्वास डळमळतो, आणि स्वतःच्याच निर्णयांवर शंका येते. पण अशा स्थितीतसुद्धा जर आपण संयमाने विचार केला, तर वाट नक्कीच सापडते. कारण वादळानंतरच खरी शांतता असते, आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने नव्याने सुरूवात करता येते. दुःखावर मात करणं, तुटलेल्या गोष्टी सांधणं, आणि आयुष्याकडे पुन्हा प्रेमाने पाहणं हेच खरं धैर्य. मनात राग असतो, कुठे तरी अभिमान असतो, आणि झालेल्या वेदनांची जखम अजूनही ताजी असते. पण ह्या सगळ्या भावना मना...

खान्देशची हिरकणी सौ. शोभाताई पाटील...!

इमेज
खान्देशची हिरकणी सौ. शोभाताई पाटील...! श्रम, प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि अपार धैर्य यांच्या जोडीने उभी राहिलेली एक स्त्री सौ. शोभाताई उर्फ अनिताताई केवलदास पाटील. सदगुरू दूध उत्पादक सोसायटी, धानोरा येथे सचिव पदाची जबाबदारी त्यांनी अखंड २९ वर्षे समर्थपणे पार पाडली आणि आपल्या कार्यातून एक आदर्श निर्माण केला. आज त्यांच्या या प्रदीर्घ सेवेला, निःस्वार्थ समर्पणाला आणि उत्कृष्ट कार्यगुणनैपुण्याला जळगाव दूध फेडरेशन तसेच ना. गिरीशभाऊ महाजन आणि विकास परिवार यांच्याकडून “खान्देश हिरकणी” म्हणून गौरवण्यात आले. हा क्षण केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी अभिमानाचा आहे. शोभाताईंची वाटचाल सहज नव्हती. ग्रामीण भागातील महिला म्हणून अनेक अडचणींना तोंड देत, त्या प्रत्येक आव्हानावर मात करत आल्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केवळ दूध संकलन वा व्यवस्थापनच केले नाही, तर शेकडो शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्य,आत्मसन्मान आणि विश्वास देणारे काम केलं. त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकजूट, पारदर्शकता आणि आत्मनिर्भरतेचं बीज पेरलं. शासनाच्या योजना असोत, नवीन यंत्रणा असोत, वा तांत्र...

माणुसकीच्या भावनेतून साकारलेली श्वान लसीकरण मोहीम....!

इमेज
माणुसकीच्या भावनेतून साकारलेली श्वान लसीकरण मोहीम....! २७ सप्टेंबर २०२५ ही केवळ एक तारीख नव्हे, तर माणुसकीच्या प्रेमाची आणि समाजाच्या सुरक्षित आरोग्यदृष्टीची साक्ष देणारा दिवस ठरला. सेवा पंधरवाडा आणि जागतिक रेबीज दिनाच्या औचित्याने तालुका पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग, धरणगाव येथे एक अत्यंत महत्त्वाची आणि हृदयाला भिडणारी श्वान दंश प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम केवळ सरकारी योजना नव्हती. ही होती  प्रेम, दया आणि जबाबदारीची मूर्त प्रतिमा. लसीकरण मोहिमेद्वारे अनेक पाळीव तसेच भटक्या (stray) श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली. ही एक अशी कृती होती जिच्यामध्ये केवळ माणसांच्या आरोग्याचेच संरक्षण नव्हते, तर त्या मूक प्राण्यांच्या आयुष्याला दिलेली एक आश्वासक दिशा होती. या अभियानात शहरातील स्वयंसेवक श्वानप्रेमींनी आपले योगदान देऊन मोहिमेला खऱ्या अर्थाने सामाजिक आधार दिला. श्वानप्रेमी श्रीमती अश्विनी पाटील मॅडम यांचे या मोहिमेसाठी योगदान अतुलनीय होते. त्यांच्या सहृदयतेमुळे आणि मनापासून केलेल्या सेवेमुळे भटक्या श्वानांचाही लसीकरणात समावेश होऊ शकला. यावेळी श्री....

जिथं माणुसकी तिथं रविदादा पाटील....!

इमेज
जिथं माणुसकी तिथं रविदादा पाटील....! आजचा दिवस दोनगावसह संपूर्ण परिसरासाठी अत्यंत विशेष आहे. कारण आज जन्मदिवस आहे त्या व्यक्तिमत्त्वाचा, ज्यांनी केवळ पदं भूषवली नाहीत, तर समाजाच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. शांत स्वभाव, संयमी वृत्ती, चेहऱ्यावर कायम असणारं आत्मीय स्मित, आणि अंत:करणात समाजासाठी निखळ प्रेम असलेले, आपल्या सर्वांचे लाडके मा. जि.प. सदस्य आणि मार्केट कमिटीचे प्रभावशाली संचालक, श्रीयुत रविदादा पाटील (दोनगावकर) यांचा आज वाढदिवस. रविदादा हे नाव उच्चारलं की, डोळ्यासमोर उभं राहतं ते एक सोज्वळ, सुसंस्कृत, मनाने प्रामाणिक आणि कृतीने निष्ठावान व्यक्तिमत्त्व. एक असा माणूस, जो केवळ एक नेता नाही, तर गावागावातील माणसांचा विश्वासू सखा आहे. आनंदाचे क्षण असोत, की कठीण प्रसंग दादा नेहमी आपल्या लोकांसोबत उभे असतात. त्यांच्या उपस्थितीत एक वेगळीच उब आहे, त्यांच्या शब्दांत दिलासा आहे, आणि त्यांच्या कृतीत माणुसकीचं सजीव रूप. त्यांनी कधीही सत्तेचा बडेजाव केला नाही, की मोठमोठ्या घोषणा दिल्या नाहीत. त्यांनी जे केलं, ते कृतीतून दाखवून दिलं. दिवस-रात्र, उन्हापावसात, सणवारात समाजासाठी ...

राग, गर्व आणि लोभ हे सुखशांतीचे खरे शत्रू...!

इमेज
राग, गर्व आणि लोभ हे सुखशांतीचे खरे शत्रू...! माणसाचं आयुष्य हे एक प्रवास आहे, ज्यात सुख-दुःख, हसू-आसू, चढ-उतार हे सगळं अपरिहार्य आहे. पण या प्रवासात काही गोष्टी अशा असतात, ज्या आपल्याला सतत मागे खेचतात, आपल्याला आपल्या माणसांपासून दूर नेतात आणि आपल्यातली शांतता हिरावून घेतात. अशाच तीन गोष्टी म्हणजे  राग, अहंकार आणि लोभ. राग हा एक क्षणिक भावना असतो, पण त्याचे परिणाम कायमस्वरूपी असतात. जेव्हा राग डोकं गमावतो, तेव्हा बुद्धीही आपली साथ सोडते. आणि मग त्या रागाच्या भरात आपण असे काही बोलून जातो, जे शब्द ऐकणाऱ्याच्या मनात खोलवर जखमा करून जातात. आपण नंतर कितीही पश्चाताप केला, तरी ते शब्द परत घेता येत नाहीत. त्यामुळे नाती मोडतात, विश्वास हरवतो आणि हृदयातली जवळीक संपते. शांतपणे विचार केला असता, जी परिस्थिती सहज हाताळता आली असती, ती रागामुळे गोंधळात जाते. अहंकार हा माणसाच्या प्रगतीतला मोठा अडथळा आहे. माणूस जसा जसा ज्ञान मिळवत जातो, तसतशी त्याचं आकलन, त्याची समज वाढावी अशी अपेक्षा असते. पण अनेकदा विद्वान व्यक्ती आपल्या ज्ञानाचा गर्व बाळगायला लागतो. जेव्हा माणूस "माझ्यासारखा दुसरा ...

पित्याविना पालकत्वाचा आधार : त्रिवेदी दांपत्याची सामाजिक बांधिलकी...!

इमेज
पित्याविना पालकत्वाचा आधार : त्रिवेदी दांपत्याची सामाजिक बांधिलकी...! आयुष्य जेव्हा प्रत्येक वळणावर परीक्षा घेतं, तेव्हा काही जिद्दी माणसं त्या परीक्षांना हिमतीने सामोरं जातात. चिकाटी, मेहनत आणि स्वप्नांवर ठाम विश्वास ठेवत त्या ध्येयाच्या दिशेने सातत्यानं वाटचाल करत राहतात. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे एरंडोल येथील कुमारी तेजश्री किशोर बिराडे हिची वडिलांच्या निधनानंतर कठीण परिस्थितीशी सामना करत, आईच्या कष्टांची शिदोरी घेत NEET सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण करणारी ही मुलगी आता थेट मुंबईच्या ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घेणार आहे. या यशामागे आहे संघर्ष, त्याग आणि शिक्षणावरील नितांत श्रद्धा. तेजश्रीची आई आशा किशोर बिराडे या एक धैर्यशील स्त्री आहेत. त्या दररोज आठ-दहा घरांमध्ये धुणी-भांडी, झाडू-पोछा व घरकाम करून आपल्या तीन अपत्यांचा सांभाळ करत आहेत. पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाचा भार एकहाती वाहताना, त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. आणि याच कष्टाचे फळ म्हणजे तेजश्रीचे हे यश! मात्र या यशाला खरी दिशा मिळाली ती तेव्हा, जेव्हा एरंडोल ...

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस विविध उपक्रमांनी साजरा..

इमेज
शास्त्री फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिवस विविध उपक्रमांनी साजरा.. २५ सप्टेंबर हा दिवस शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ या संस्थेसाठी केवळ एक औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर तो सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक जबाबदारी आणि विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या विविध उपक्रमांनी समृद्ध असा अनुभव होता. जागतिक फार्मासिस्ट दिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आलेले हे उपक्रम केवळ एकदिवसीय आयोजन न राहता फार्मासिस्ट या आरोग्यसेवकाच्या कार्याला नव्याने अधोरेखित करणारी आणि समाजाशी नाते दृढ करणारी एक सजीव चळवळ ठरली. कार्यक्रमाची सुरुवात एरंडोल शहरातील तिरंगा चौक येथून भव्य रॅलीने झाली. विद्यार्थ्यांच्या हातातील फलक, ओठांवरील घोषणा आणि चेहऱ्यावर दिसणारी सामाजिक जाणिव यामुळे ही रॅली केवळ एक मिरवणूक न राहता, जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली. आर.टी. काबरा हायस्कूल, मरीमाता चौक, बुधवार दरवाजा, अमळनेर दरवाजा मार्गे पुन्हा तिरंगा चौकात परत आलेली ही रॅली शहरवासीयांच्या मनात ठसा उमटवून गेली. पथनाट्याच्या माध्यमातून औषधोपचारातील योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आ...

सेवा पंधरवाडा एक जिव्हाळ्याचा कार्यकम....!

इमेज
सेवा पंधरवाडा एक जिव्हाळ्याचा कार्यकम....! आज 26 सप्टेंबर 2025, एक साधारण शिबिर नव्हे, तर एक धडपड, एक संजीवनी, एक जीवनाची नवी संजीवनी घेऊन बोरगाव बु.खु. येथील प्रत्येक पशुपालकाच्या दारात उभे राहिले. "सेवा पंधरवाडा" निमित्ताने आयोजित केलेले FMD VII लसीकरण आणि कार्यमोहिम शिबिर एक व्यापक पाऊल उचलत, एका अशी संजीवनी शिबिर बनले ज्याने फक्त शरीराला नव्हे, तर आत्म्याला उमेद दिली. लाळ खुरकत लसीकरणाच्या माध्यमातून अनेक जनावरांचा जीवन रक्षणाचा मार्ग खुला झाला. तसेच गर्भतपासणी, वंध्यत्व तपासणी, कृत्रिम रेतन, जंत व गोचीड निर्मूलन यासारख्या विविध कार्यांच्या माध्यमातून प्रत्येक पशुपालकाच्या जीवनातील कडवटता आणि चिंतेला जवळून तोंड दिले गेले. हे फक्त उपचार नव्हते, तर विश्वासाचं आणि साहसाचं एक पाऊल होतं, जे त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवून आणणारं होतं. पण याच सर्व प्रयत्नांना एक दिशा मिळाली ती केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांबद्दल दिलेल्या माहितीमुळे, लंपी चर्मरोगाच्या प्रतिबंधाच्या उपाययोजना, झूणोटिक आजार, आणि श्वानदंशाबाबत जागरूकता निर्माण करून. पशुपालकांना विचारांची नवी दृष्टी...

प्रवक्ता ॲकडमी एका स्वप्नाचा साकार होणारा भावनिक प्रवास....!

इमेज
प्रवक्ता ॲकडमी एका स्वप्नाचा साकार होणारा भावनिक प्रवास....! एरंडोल – शहरासह संपूर्ण तालुक्यात शिक्षण क्षेत्रातील आपली ठसठशीत ओळख निर्माण करणाऱ्या प्रवक्ता ॲकडमीच्या AI लॅबचे उद्घाटन आणि इंग्लिश स्पीकिंग स्पर्धेतील बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. अमितदादा पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक डॉ. सुरेशजी पाटील, शेखर पाटील सर आणि शिवसेना शहर संघटक मयुरभाऊ महाजन यांनी आपली उपस्थिती दर्शवली. याशिवाय प्रवक्ता ॲकडमीचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम म्हणजे केवळ एका लॅबचं उद्घाटन नव्हतं, तर तो होता एका माणसाच्या जिद्दीचा, अथक परिश्रमांचा आणि शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्याच्या ध्यासाचा साक्षीदार असलेला क्षण. डॉ. विजय पाटीलसरांनी आजपासून नव्हे, तर अनेक वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं  शिक्षण हे फक्त श्रीमंतांचं नव्हे, तर सर्वसामान्य गोर-गरीब मुलांचं ही हक्काचं असावं. या स्वप्नाची सुरुवात झाली ती रामचंद्र नगर, एरंडोल येथील...

कृष्ण गीता नगर येथे बक्षीस वितरण समारंभ

इमेज
कृष्ण गीता नगर येथे बक्षीस वितरण समारंभ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व ग्रंथ भेट कृष्ण गीता नगरवासीयांचा स्थुत्य उपक्रम : सुनील पवार ( पोलीस निरीक्षक ) धरणगाव प्रतिनिधी -  धरणगाव - शहरातील नगरपालिका हद्दीतील गट नंबर ४७५ कृष्ण गीता नगर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव व  नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील गणेशोत्सव निमित्त कॉलनी मध्ये निबंध, रंगभरण , चित्रकला,  बुद्धिबळ, एक मिनिट, सुंदर हस्ताक्षर, लिंबू चमचा, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले.         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलनीचे सदस्य तथा महात्मा फुले हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून धरणगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार उपस्थित होते. सर्वप्रथम साहेबांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती करण्यात आली. कॉलनी च्या वतीने साहेबांचे राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांचा ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ ...

क्षणभंगुर जीवनातलं शाश्वत सत्य....!

इमेज
क्षणभंगुर जीवनातलं शाश्वत सत्य....! जीवन म्हणजे क्षणभंगुर प्रवाह…ते न थांबणारे आहे, न मागे फिरणारे.आपण मात्र किती वेळा भूतकाळाच्या ओझ्याखाली दबून जातो, किंवा भविष्याच्या काळजीने आतून पोखरले जातो.हे करताना आपण विसरतो की, आपल्याकडे खरी संपत्ती कोणती आहे. ती म्हणजे वर्तमान. भूतकाळात काही सुंदर क्षण होते, काही दु:खद आठवणी होत्या. पण ते सर्व "झालेले" आहे.तिथे काही बदल शक्य नाही. आपण त्यातून शिकू शकतो, पण तिथे अडकून राहिलो, तर मनाला जखमाच होतात.त्याचप्रमाणे, भविष्य अजून आलेलेच नाही. ते आपल्याला माहितही नाही कसं असेल, तरी आपण ते सतत विचार करत बसतो, चिंता करत राहतो.या दोन्ही टोकांवर झुलताना, आपण आपल्या हाती असलेल्या एकमेव खऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आपलं वर्तमान. वर्तमान म्हणजे हा क्षण, ही श्वास, हे आपले आजचे हास्य, आजचा विचार, आजचा निर्णय.हा क्षण आपण आनंदाने, सकारात्मकतेने जपला, तर तो उद्याच्या चांगल्या भूतकाळात रुपांतरित होतो.किंवा याच क्षणात आपण चिंता केली, दुःख साचवलं, राग धरला, तर तो क्षण निघून जातो.पुन्हा न येण्यासाठी. जीवन फारसं गुंतागुंतीचं नाही, आपणच त्याला अव...

ओळखीचा खरा अर्थ....!

इमेज
  ओळखीचा खरा अर्थ....! बूट घासून मिळवलेली ओळख आणि बूट चाटून मिळवलेली ओळख या दोघांमधील फरक केवळ वरवर दिसणारा नसतो. हा फरक असतो मनाचा, मूल्यांचा आणि आत्मिक शांततेचा. एकीकडे अशी ओळख असते जी माणूस आपल्या कष्टाने, प्रामाणिकपणाने, अपार मेहनतीने आणि तडजोड न करता मिळवतो. तर दुसरीकडे अशी ओळख असते, जी माणूस स्वतःच्या आत्मसन्मानाची बोली लावून, वाकून, झुकून, दुसऱ्याच्या मर्जीने आणि चापलुसीच्या बदल्यात मिळवतो. बूट घासणं म्हणजे प्रत्येक दिवशी संघर्ष करणं. वाट अडथळ्यांनी भरलेली असते, पण त्या प्रत्येक अडथळ्याशी दोन हात करत तो माणूस पुढे सरकत असतो. ही ओळख लवकर मिळत नाही. तिला वेळ लागतो, कधी कधी अपमान, नकार आणि उपेक्षा ही झेलावी लागते. पण अशी ओळख मिळाल्यावर ती संपूर्ण आयुष्यभर माणसासोबत राहते. ही ओळख केवळ नावापुरती नसते, ती त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या वागण्यात स्पष्ट जाणवते. ही ओळख कुणाच्या कृपेवर आधारलेली नसते, तर ती स्वतःच्या कर्तृत्वावर उभी केली असते. आज मात्र परिस्थिती थोडी वेगळी आहे. आजच्या काळात बूट चाटून मिळवलेली ओळख ही जास्त प्रमाणात दिसून येते. हा मार्ग सोपा व...

चवदार नमकीन चव, परंपरा आणि नात्यांचा संगम...!

इमेज
चवदार नमकीन चव, परंपरा आणि नात्यांचा संगम...! एरंडोल नगरीत एक नवा दिवस उगवतो आहे. तो फक्त व्यवसायाच्या वाढीचा नाही, तर एका स्वप्नाच्या साकारतेचा, एका परंपरेच्या पुनर्जन्माचा आणि एका कुटुंबाच्या अथक श्रमांना मिळालेल्या मान्यतेचा. ‘चवदार नमकीन’ या नावामागे केवळ खमंग चव नाही, तर वर्षानुवर्षे जपलेली संस्कृती, नात्यांची ऊब आणि घरगुती सुगंधाचा अमोल ठेवा दडलेला आहे. राजू भाऊ साळी यांनी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मेहनतीला देव मानत, चवेला प्रतिष्ठा दिली. घरच्या हातची चव ही फक्त एक कृती नाही, ती एक भावना आहे. जी मायेच्या घासासारखी असते. ती चव केवळ जिभेवर नाही, तर काळजात घर करते. त्या चवेतून आज त्यांच्या स्वप्नाला नवीन रूप दिलं जातंय जिथे जुन्या रेसिपीला नव्या पॅकेजिंगची जोड आहे, आणि मातीच्या ओलाव्याला आधुनिकतेची सजावट लाभते आहे. ही वाटचाल काही सोपी नव्हती. यात अनेक रात्रींचं जागरण आहे, कधी संपूर्ण दिवसभराचा घाम आहे, आणि कुठेतरी मनात खोलवर रुजलेला एक विश्वास आहे.की प्रामाणिकपणानं केलेली कोणतीही गोष्ट कधीच वाया जात नाही. राजू भाऊंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण साळी कुटुंबाने या व...

विश्वासाचं दुसरं नाव – महेश्वर रेड्डी साहेब...!

इमेज
विश्वासाचं दुसरं नाव – महेश्वर रेड्डी साहेब...! कर्तृत्वाची उंची आभाळाएवढी असते, पण काही माणसं ती उंची गाठूनही नेहमी जमिनीवर राहतात.आपल्या माणसांत, आपल्या कार्यात, आपल्या जबाबदारीत. अशीच एक तेजस्वी, पण अत्यंत नम्र अशी प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी साहेब. ज्यांच्या नावातच ‘महेश्वर’ आहे.म्हणजे साक्षात शिवशक्तीचा आशीर्वाद लाभलेले. आणि त्यांच्या कार्यात ही अगदी तशीच एक विलक्षण ताकद आहे. संयमाची, शौर्याची आणि न्यायाची. आज त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी, त्यांच्या कार्याची उजळणी करावी वाटते. कारण अशा व्यक्तीचा दिवस केवळ शुभेच्छांनी साजरा होतो असं नाही, तर त्यांच्या मुळे समाजात निर्माण झालेल्या विश्वासाने तो खराखुरा उत्सव ठरतो. जळगावच्या मातीला शांततेचं, सुरक्षिततेचं आणि कायद्यानुसार न्याय मिळवून देणारं नेतृत्व लाभावं, अशी ज्यांनी इच्छा केली होती, त्या साऱ्यांच्या प्रार्थनांचं उत्तर म्हणजे महेश्वर रेड्डी साहेब. त्यांचं काम केवळ पोलीस खात्यापुरतं मर्यादित नाही, तर एका समाजाभिमुख दृष्टिकोनाने भारलेलं आहे.ते जनतेला भीतीने नव्हे, विश्वासाने व...

प्रयत्न, यश आणि शेजारी....!

इमेज
प्रयत्न, यश आणि शेजारी....! माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. अपूर्ण स्वप्नांचा, सततच्या धडपडीचा आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या न संपणाऱ्या प्रयत्नांचा. प्रत्येकालाच वाटतं की आयुष्यात काहीतरी मोठं करावं, आपलं असं काहीतरी विशेष घडवावं, जे घरच्यांना अभिमानानं सांगता येईल. या वाटचालीत कितीतरी अडथळे येतात, कधी परिस्थिती साथ देत नाही, तर कधी लोक. पण एक गोष्ट मात्र खरी जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलात, तर कधी ना कधी यश तुमच्या पावलांशी नक्कीच येऊन जुळतं. जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा घरात उत्सवाचा माहोल असतो. आई-वडिलांच्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू दिसतात, त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक त्यागाला उत्तर मिळाल्यासारखं वाटतं. तुमच्या छोट्या छोट्या यशामागे त्यांच्या मोठ्या अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या की त्यांना वाटतं, त्यांचा संसार सफल झाला. त्या क्षणी घर ओसंडून वाहतं प्रेमाने, अभिमानाने, आणि तुमच्यावरील निखळ विश्वासाने. पण सगळ्यांना असं यश लवकर मिळतंच असं नाही. काही वेळा प्रयत्न खूप असतो, मनापासून असतो, पण अपेक्षित यश मिळत नाही. आणि हाच तो क्षण असतो जिथे ...

संस्कारांचे शिल्पकार प्रा. पी. डी. पाटील सर....!

इमेज
संस्कारांचे शिल्पकार प्रा. पी. डी. पाटील सर....! सेवा म्हणजे समर्पण, शिक्षण म्हणजे संस्कार, आणि शिक्षक म्हणजे खरा मार्गदर्शक.या तिन्ही गुणांचा समतोल साधलेलं, प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी व्यक्तिमत्त्व म्हणजेच सेवानिवृत्त प्रा. पी. डी. पाटील सर. एरंडोल सारख्या ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे पाटील सर हे केवळ अध्यापक नव्हते, तर शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनाचे शिल्पकार होते. सर्वसामान्य पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत त्यांनी स्वप्नं जागवली. त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करत आत्मविश्वास निर्माण केला. "केवळ अभ्यास शिकवणं हे शिक्षण नाही, तर जीवन शिकवणं हेच खरं शिक्षण आहे," ही शिकवण त्यांनी आपल्या कार्यातून सातत्याने दिली. सरांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रेमळ हास्य, ममत्वाने भरलेली नजर आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणारी समजूतदार दृष्टी."कोणता ही विद्यार्थी मागास नसतो, गरज असते योग्य मार्गदर्शनाची," ही त्यांची ठाम भूमिका होती.आणि ती त्यांनी कृतीतून सतत सिद्ध केली. स्वाध्याय परिवारातून आलेले सर आत्मज्ञान, विचारशीलता आणि शि...

प्रेमाचा अधिकार.....!

इमेज
प्रेमाचा अधिकार.....! नात्यांमध्ये हक्क असावा, असं सगळ्यांनाच वाटतं ना? कोणीतरी असावं, ज्याच्यासाठी आपण विशेष असतो. जो आपल्यावर मनापासून विश्वास ठेवतो, आपल्यासाठी वेळ राखून ठेवतो, आपल्याकडे फक्त ‘आपल्या’ नजरेने पाहतो.असं कुणी तरी असावं, हे स्वप्न सगळ्यांच्या मनात असतंच. पण हक्क सांगायचा असेल ना, तर त्याआधी त्या नात्यात खरं प्रेम असावं लागतं.आपलेपण हळूहळू रुजलेलं असायला हवं.कारण प्रेमाशिवाय सांगितलेला हक्क, तो फक्त एक प्रकारचा आग्रहच होतो .आणि आग्रह म्हणजे ओझं.ते ओझं कुणालाच नकोसं वाटतं, मग नातं टिकणार कसं? कधी कधी आपण कुणावर मनापासून प्रेम करतो, पण नकळत त्याच प्रेमात हक्क मिसळायला लागतो. "मी असं म्हणालो, तरी तिनं तसं का केलं?" "माझं काहीच महत्त्व नाही का त्याच्यासाठी?"हे सगळं विचार येऊ लागतात आणि त्या विचारांमधून अपेक्षा तयार होतात.अपेक्षा वाढल्या की नात्याची नाजूक वीण सैल होऊ लागते. समोरच्या माणसाच्या मनात जर आपल्यासाठी आपलेपणाचं स्थान नसेल,तर आपला हक्क त्याच्यासाठी एक बंधन वाटू लागतं.त्याच वेळी जर आपण प्रेमाच्या जागी अधिकाराची भाषा वापरू लागलो, तर ते प...

वादळांमधून नवा प्रकाश....!

इमेज
वादळांमधून नवा प्रकाश....! आयुष्य म्हणजे वादळांचा एक अखंड प्रवास. प्रत्येक क्षणात काही ना काही अडथळे येतच असतात, आणि कधी कधी ते इतके धाडसाने येतात की आपला सर्व नियंत्रण गहाळ होतो. अशा परिस्थितीत त्या वादळांचा सामना कसा करावा? शांत डोक्याने, संयम ठेवून. कारण ह्या वादळांनीच आपल्या जीवनाला एक नवीन दिशा दिली आहे, असे मानून त्या वादळांच्या मागोमाग जाणे गरजेचे आहे. आयुष्यात आलेले वादळे, दुःख, संघर्ष आणि कधी कधी आपल्याला येणारी असहायता, या सर्व गोष्टी क्षणिक आहेत. हे लक्षात ठेवा, जरी सध्या तुम्ही ज्या कठीण प्रसंगांमध्ये अडकले आहात, त्यात तुम्हाला वाटत असेल की काहीच उभं राहिलं नाही, काहीच चांगलं घडत नाही, तरीही प्रत्येक वादळाच्या शेवटी एक नवा सूर्योदय असतो. एक दिवस तो वादळ मावळेल आणि तुमच्या जीवनात सूर्याची प्रकाशोत्सव सुरू होईल. हे लक्षात ठेवा, हे ही दिवस जातातच. दुःख आणि ताण-तणावाच्या वेळी आपल्याला असं वाटतं की हे दुखणे कधीच संपणार नाही. पण त्याच दुःखातून नवा मार्ग काढण्यासाठी तुम्ही शक्तिशाली बनता. हे विसरू नका, पुढे चालत राहाणं हेच महत्वाचं आहे. जीवनातले वाद, मतभेद, भांडणं आणि ...

जनतेला माणूस निलेशभाऊ पाटील....!

इमेज
जनतेला माणूस निलेशभाऊ पाटील....! आजचा दिवस हा केवळ एक साधा दिवस नाही, तर सामान्य जनतेच्या हृदयात जागा बनवलेल्या एका खऱ्या माणसाचा  निलेशभाऊ पाटील यांचा वाढदिवस आहे. राजकारणात अनेक चेहरे दिसतात, परंतु काही चेहरे असे असतात की ते मनात कोपऱ्यात कोरले जातात, आणि विसरले जात नाहीत. निलेशभाऊ पाटील हे असंच एक नाव, एक चेहरा, एक भावना आहे, जी जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक सामान्य माणसाच्या मनाशी घट्ट जुळलेली आहे. ते केवळ नेते नाहीत, तर जनतेचा प्रतिनिधी आहेत. अगदी शब्दशः. छोट्या गावातील गरीब माणसापासून ते मोठ्या शहरातील उद्योजकांपर्यंत, प्रत्येकाच्या जीवनात त्यांचं वेगळं स्थान आहे. कुणी त्यांना “भाऊ” म्हणतं, कुणी “आपला माणूस”, कुणाला ते मदतीचा हात वाटतात, तर कुणासाठी ते हक्काने आधार देणारा खांदा बनतात. हे नातं केवळ राजकारणाचं नाही, तर माणुसकीचं आहे. कारण भाऊ हे प्रत्येक गोष्टीत आधी माणूस म्हणून पुढे येतात, मग पुढे नेता. त्यांचा दिलदार स्वभाव, समजूतदारपणा, आणि कुठल्या ही पदाचा गर्व न ठेवता सर्वांना समानतेने पाहण्याची वृत्ती यामुळे ते सर्वांना हवहवेसे वाटतात. कितीही मोठं संकट असो, किंवा...

जीवनाचा हिशोब व्याजासह परत मिळत...!

इमेज
जीवनाचा हिशोब व्याजासह परत मिळत...! मानवजीवन म्हणजे एक विलक्षण प्रवास. या प्रवासात आपण नात्यांची वीण बांधतो, अनुभवांचे धडे घेतो, चुका करतो, त्यातून शिकतो आणि पुढे वाटचाल करतो. या साऱ्या प्रवासात आपण अनेक गोष्टींचा हिशोब ठेवत असतो. वेळेचा, पैशाचा, नात्यांचा, व्यवहारांचा... मात्र एक हिशोब मात्र माणसाला पूर्णपणे लक्षात ठेवता येत नाही.तो म्हणजे कर्माचा हिशोब. या जगात तात्काळ काहीच मिळत नाही. परंतु काळाच्या ओघात, योग्य वेळी आणि योग्य प्रकारे, आपल्याला सगळंच परत मिळतं. आणि ते सुद्धा सव्याज, म्हणजेच अधिक व्याजासह. माणसाच्या प्रत्येक कृतीचा, प्रत्येक विचाराचा आणि भावना-आधारित निर्णयाचा निश्चित परिणाम असतो. काही परिणाम लगेच दिसून येतात, काही कालांतराने उलगडतात, तर काही आयुष्याच्या अशा टप्प्यावर उभे ठाकतात, जिथे आपण त्याची अपेक्षाच केलेली नसते. या साऱ्या घडामोडी कोणीतरी पाहत असतं... आणि तो म्हणजे परमेश्वर. कोणाला जाणीवपूर्वक दु:ख दिलं, त्रास दिला, त्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले, त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले. तर हे दुःख फक्त त्या व्यक्तीपुरतं मर्यादित राहत नाही. त्या अश्रूंचं ओ...

मोकळा खिसा ओळखींचा आरसा....!

इमेज
मोकळा खिसा ओळखींचा आरसा....! एकदा कधीतरी... हो, एकदाच नव्हे, तर आयुष्यात अनेकदा मोकळा खिसा घेऊन चारचौघात जाऊन पाहा. कोणती ही तक्रार नसताना, कोणती ही गोष्ट गमावलेली नसता नाही, आपल्यात काही तरी हरवलं असल्यासारखं वाटू लागतं. आणि अशा वेळी, एक वेगळीच जाणीव जागी होते. आपण खरंच कोण आहोत? या मोकळ्या खिशात पैसा नसतो, प्रतिष्ठेचा बडेजाव नसतो, ना मोठेपणाचा अहंकार. उरतो तो फक्त एक साधा, प्रामाणिक "मी". आणि जेव्हा हा "मी" कोणत्या ही झगमगाटा शिवाय, कोणत्या ही नावपत्त्या शिवाय लोकांसमोर उभा राहतो… तेव्हाच सुरू होते खरी ओळख उलगडण्याची वेळ. आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं असतात. कोणी मैत्रीच्या नावाने, कोणी व्यवहाराच्या संबंधातून, तर कोणी रक्ताच्या नात्याने आपल्याशी जोडलेले असतात. पण या पलीकडचा एक क्षण असा असतो, जेव्हा तुमच्याकडे देण्यासाठी काहीच नसतं… आणि तेव्हाच कळतं की कोण तुमच्या सोबत खरंच उभं आहे. जेव्हा खिशात पैसा असतो, तेव्हा अनेक चेहरे स्मितहास्याने तुमच्यासमोर येतात. सतत फोन खणखणत राहतो, चहा-कॉफीच्या गप्पा रंगतात, तुमचं नाव विशेष मानाने घेतलं जातं. पण एकदा ख...