कृष्ण गीता नगर येथे बक्षीस वितरण समारंभ


कृष्ण गीता नगर येथे बक्षीस वितरण समारंभ

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व ग्रंथ भेट कृष्ण गीता नगरवासीयांचा स्थुत्य उपक्रम : सुनील पवार ( पोलीस निरीक्षक )

धरणगाव प्रतिनिधी - 

धरणगाव - शहरातील नगरपालिका हद्दीतील गट नंबर ४७५ कृष्ण गीता नगर येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव व  नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील गणेशोत्सव निमित्त कॉलनी मध्ये निबंध, रंगभरण , चित्रकला,  बुद्धिबळ, एक मिनिट, सुंदर हस्ताक्षर, लिंबू चमचा, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी डी पाटील यांनी केले.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलनीचे सदस्य तथा महात्मा फुले हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून धरणगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार उपस्थित होते. सर्वप्रथम साहेबांच्या हस्ते दुर्गादेवीची आरती करण्यात आली. कॉलनी च्या वतीने साहेबांचे राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांचा ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य पेन, चित्रकला वही, पॅड , कंपास पेटी व महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट स्वरूपात प्रमुखातीची व कॉलनीतील बंधू-भगिनी यांच्या हस्ते देण्यात आले.
         प्रमुख अतिथी सुनील पवार यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले व अशाच स्पर्धांच्या माध्यमातून उत्तम यश संपादन करा. रोज वाचन, लेखन करून नियमित अभ्यास करत पुस्तकांशी मैत्री करा. मैदानी खेळ खेळा शरीर तंदुरुस्त ठेवा अशा विविध विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले असेच यश संपादन करत आपल्या आई-वडिलांचे व शहराचे नाव मोठे करा असे प्रतिपादन केले. 
              याप्रसंगी कॉलनीचे अध्यक्ष बी एम सैंदाणे, उपाध्यक्ष विनायक न्हावी, सचिव महेंद्र सैनी,  प्रल्हाद विसपुते, भरत पाटील, पंकज मिस्तरी, बाळू अत्तरदे, गोकुळ महाजन, एस एन कोळी, ज्ञानेश्वर पवार, सतीश पवार, अमोल धनगर, अनिल कुलट, निलेश कुलट, निलेश गुरव, राजेंद्र भोई, शंकर पाटील, विनोद सैनी, ईश्वर बन्सी, जगन्नाथ भोई, तापीराम मालचे तसेच कॉलनीतील सर्व बंधू-भगिनी व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पी डी पाटील यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !