राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्काराने सन्मानित यशवंत सोनवणे – एक स्वप्नपूर्तीचा सोहळा
राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्काराने सन्मानित यशवंत सोनवणे – एक स्वप्नपूर्तीचा सोहळा कलाविश्व हे प्रतिभेचे मंदिर असते. या मंदिरात ज्यांना स्थान मिळते, त्यांना समाज आदराने आणि अभिमानाने पाहतो. अशाच एका तेजस्वी कलाकाराचा गौरव करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट, मुंबई येथे एक अनोखा सोहळा रंगला. हा सोहळा संविधान हक्क परिषद आणि सा. मंत्रालय वार्ता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात चाळीसगावच्या सुपुत्र यशवंत संजय सोनवणे यांना राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंत अवघ्या १२वीत शिक्षण घेत आहे. परंतु त्याच्या कलात्मक प्रवासाची सुरुवात पाचवीत असतानाच झाली. लहानपणापासूनच त्याला रंगमंचाची ओढ होती. त्याच्या कल्पनाशक्तीला, मेहनतीला आणि निष्ठेला पाठबळ मिळाले त्याच्या वडिलांकडून. संजय सोनवणे, जे स्वतः खानदेशी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित दिग्दर्शक आणि कलाकार आहेत. घरातच प्रेरणेचा झरा वाहत असल्यामुळे यशवंतने आपल्या कलेच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या भव्य सोहळ्याला महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेते, कलाकार आणि म...