सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल
सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल जळगाव जिल्ह्यातील धरणगाव या लहानशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले मा.नंदू हिरालाल चौधरी हे नाव आज गोसेवा आणि भारतीय गोवंश संवर्धन क्षेत्रात एक आदरयुक्त प्रेरणास्त्रोत ठरले आहे. शेतकरी वडिलांच्या कष्टात वाढलेले, साधेपणात संस्कारांचे बीज घेऊन मोठे झालेले मा.चौधरी यांनी आपल्या जीवनाची दिशा लहानपणातच निश्चित केली होती. त्यांचे बालपण कष्टमय होते. घरची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असताना ही, त्यांनी शिक्षण आणि मातापित्यांच्या कर्तव्यांमध्ये संतुलन साधले. शेतीत आई-वडिलांना मदत करत, अभ्यास करत आणि आसपासच्या सामाजिक वास्तवाचा अभ्यास करत मोठे होत असताना त्यांच्या मनात एक दृढ संकल्प निर्माण झाला."घराच्या आणि समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही." मात्र शिक्षणाइतकाच त्यांच्या मनाचा एक कोपरा गोसेवेच्या पवित्र भावनेने व्यापलेला होता. गायीं विषयी त्यांना लहानपणापासून अपार प्रेम होते. त्यांच्या मनात गोमातेला केवळ जनावर न मानता, ती आपली माय आहे असा श्रद्धेचा भाव होता. गायत्री परिवाराचे बालवयातच लाभलेले संस्क...