जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक अजिंक्य योद्धा – ना.गिरीशभाऊ महाजन



जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे एक अजिंक्य योद्धा – ना.गिरीशभाऊ महाजन

सत्तेच्या शिखरावर पोहोचणं सहज शक्य असतं, परंतु जनतेच्या हृदयात स्थान मिळवणं हे केवळ निस्वार्थ सेवेच्या वृत्तीनेच शक्य होतं. अशीच एक प्रभावी, कणखर आणि संवेदनशील व्यक्तीमत्त्व म्हणजे आमचे लाडके, आदरणीय ना. गिरीशभाऊ महाजन.

गिरीशभाऊंच्या व्यक्तिमत्त्वात एक विलक्षण तेज आहे. हे तेज केवळ त्यांच्या पदामुळे किंवा अधिकारामुळे नाही, तर त्यांच्या प्रत्येक कृतीमागील जनसेवेच्या नितळ भावनान मुळे आहे. एकीकडे जबाबदारीची मोठी धुरा खांद्यावर असताना, दुसरीकडे समाजातील  तळागाळातील व्यक्तींच्या समस्यांवर बारकाईने लक्ष देणं  ही त्यांची जाणीव खऱ्या लोकनेत्याचं उदाहरण आहे.

"आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा" हे त्यांनी केवळ ब्रीदवाक्य म्हणून नव्हे, तर जीवनधर्म म्हणून अंगीकारलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले, अनेक आरोग्य शिबिरांनी ग्रामीण भागात नवसंजीवनी दिली. गिरीशभाऊंचं काम म्हणजे केवळ योजनांची अमलबजावणी नव्हे, तर हजारो आयुष्यांना नवीन आशेचा किरण देणारी एक प्रभावी चळवळ आहे.

ते केवळ एक सक्षम मंत्री किंवा आमदार नाहीत, तर त्याहून आधी एक सजग, कणखर आणि मायाळू माणूस आहेत. त्यांचं बोलणं असो वा वागणं, त्यात कोणता ही दिखावा नसतो. साधेपणा, विनयशीलता आणि सहजपणे प्रत्येकाशी आत्मीयतेनं संवाद साधण्याची कला हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

कोणताही प्रसंग असो गावकऱ्यांची समस्या, शेतकऱ्यांचा आक्रोश, विद्यार्थ्यांची अडचण, महिलांच्या समस्या गिरीशभाऊ तत्काळ पुढे येऊन तो विषय आपला समजून मार्ग काढतात. त्यामुळेच ते केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे, तर घराघरात ‘आपला माणूस’ म्हणून ओळखले जातात.

दु:खाच्या काळात आधार देणारा नेता आणि सुखाच्या क्षणी सहर्ष सहभागी होणारा मित्र अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख झाला की चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात आपुलकीचा ओलावा आपसूकच प्रकटतो.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, प्रत्येक वस्ती, गल्लीतून, मंदिरातून, शिबिरातून, एकच हृदयापासून प्रार्थना ऐकू येते."आदरणीय भाऊ, आपल्याला उदंड आयुष्य लाभो...आपले कार्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहो...आई तुळजा भवानीच्या चरणी हीच सादर प्रार्थना!"

गिरीशभाऊंसारख्या नेत्यामुळेच आज हजारो सामान्य कुटुंबांमध्ये संघर्ष असून ही आशावाद टिकून आहे, कारण त्यांच्या सारखा कुणी तरी त्यांच्या मागे निरंतर उभा आहे.

आपल्या कार्याचा सुगंध अधिकाधिक आयुष्यांत आनंद फुलवो,आपले मनमोकळं हास्य सदैव जनतेच्या विश्वासाचं प्रतीक ठरावं...

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, आदरणीय गिरीशभाऊ!तुमच्यासारखा नेता हीच आमच्या जनतेची खरी संपत्ती आहे.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !