विश्वासाचं दुसरं नाव – महेश्वर रेड्डी साहेब...!
विश्वासाचं दुसरं नाव – महेश्वर रेड्डी साहेब...!
कर्तृत्वाची उंची आभाळाएवढी असते, पण काही माणसं ती उंची गाठूनही नेहमी जमिनीवर राहतात.आपल्या माणसांत, आपल्या कार्यात, आपल्या जबाबदारीत. अशीच एक तेजस्वी, पण अत्यंत नम्र अशी प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी साहेब.
ज्यांच्या नावातच ‘महेश्वर’ आहे.म्हणजे साक्षात शिवशक्तीचा आशीर्वाद लाभलेले. आणि त्यांच्या कार्यात ही अगदी तशीच एक विलक्षण ताकद आहे. संयमाची, शौर्याची आणि न्यायाची.
आज त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी, त्यांच्या कार्याची उजळणी करावी वाटते. कारण अशा व्यक्तीचा दिवस केवळ शुभेच्छांनी साजरा होतो असं नाही, तर त्यांच्या मुळे समाजात निर्माण झालेल्या विश्वासाने तो खराखुरा उत्सव ठरतो.
जळगावच्या मातीला शांततेचं, सुरक्षिततेचं आणि कायद्यानुसार न्याय मिळवून देणारं नेतृत्व लाभावं, अशी ज्यांनी इच्छा केली होती, त्या साऱ्यांच्या प्रार्थनांचं उत्तर म्हणजे महेश्वर रेड्डी साहेब. त्यांचं काम केवळ पोलीस खात्यापुरतं मर्यादित नाही, तर एका समाजाभिमुख दृष्टिकोनाने भारलेलं आहे.ते जनतेला भीतीने नव्हे, विश्वासाने वागताना शिकवतात. एक अधिकारी असूनही, ते आपले वाटतात. रस्त्यावर एखादी समस्या असेल, गुन्हेगारीचा अटकाव असेल, महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न असो की तरुणांना चांगल्या मार्गावर नेण्याचं काम ते नेहमी पुढे असतात.
महेश्वर रेड्डी साहेब हे फक्त पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी नाहीत, ते जळगाव जिल्ह्याच्या विश्वासाचं दुसरं नाव आहेत. त्यांचं बोलणं कमी, पण कृती मोठी असते. शिस्त, संवेदनशीलता, आणि नेतृत्वगुण यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. आणि म्हणूनच, त्यांचं नाव घेतलं की डोळ्यांसमोर येतो तो एक आधार, एक न्यायदूत.
आज त्यांच्या वाढदिवशी, त्यांना शुभेच्छा देताना शब्द अपुरे वाटतात. पण अंत:करणापासून निघणाऱ्या भावना या शब्दांपेक्षा मोठ्या असतात.
“आपल्या नेतृत्वात मिळालेला आत्मविश्वास,
आपल्या कर्तृत्वामुळे लाभलेली सुरक्षा,
आणि आपल्या माणुसकीमुळे निर्माण झालेला विश्वास
हेच तुमच्या कार्याचं खरं यश आहे, साहेब.”
परमेश्वर आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिक व्यापक कार्य करण्याची संधी देवो, हीच प्रार्थना.
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा,
आदरणीय डॉ. श्री. महेश्वर रेड्डी साहेब!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा