धरणगावच्या आशेचं नवं पर्व वाल्मीकभाऊ पाटील....!


धरणगावच्या आशेचं नवं पर्व वाल्मीकभाऊ पाटील....!

जग बदलण्याची ताकद काही माणसांमध्ये उपजत असते. त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या कृतींमध्ये आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेमध्ये एक अशी जादू असते, जी काळाच्या कसोटीवर खरी ठरते. धरणगावच्या मातीनेही अशाच एका खऱ्या, प्रामाणिक, आणि ज्वलंत नेतृत्वाला जन्म दिला आहे.वाल्मीकभाऊ पाटील.

जगदंबा कन्स्ट्रक्शनचे संचालक, मा.ना. भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब पालकमंत्री जळगाव यांच्या कट्टर समर्थक असलेले वाल्मीकभाऊ, हे केवळ एक राजकीय चेहरा नाहीत, तर धरणगावच्या जनतेचा विश्वास, आशा आणि भविष्य आहेत.

त्यांची कार्यशक्ती, धडाडी, आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना आपल्या प्रश्नासारखं मानून त्यासाठी झगडण्याची वृत्ती, त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, संपूर्ण धरणगावकरांच्या मनात एकच भावना आहे. "हा माणूस आपलाच आहे!"

त्यांचं नेतृत्व हे उगवत्या सुर्याप्रमाणे आहे. जे शहराच्या कोपऱ्याकोपऱ्याला प्रकाशमान करत आहे. तरुणाईसाठी प्रेरणा, गरिबांसाठी आधार, आणि वृद्धांसाठी विश्वास असलेले वाल्मीकभाऊ, हे धरणगावच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहित आहेत.

आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांना फक्त शुभेच्छा देणं अपुरं आहे... कारण ते फक्त साजरे होणारे व्यक्तिमत्त्व नाहीत, तर घडवले जाणारे भविष्य आहेत.

भविष्यातील नगरसेवक नाही, तर लोकांच्या हृदयात आजच निवडून आलेला प्रतिनिधी वाल्मीकभाऊ पाटील! यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... त्यांच्या वाटचालीस यश, बळ, आणि अखंड जनसेवेची प्रेरणा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !