“शांत, संयमी व दिलदार व्यक्तिमत्त्व - ‘आबासाहेब’ राजधर महाजन”
“शांत, संयमी व दिलदार व्यक्तिमत्त्व - ‘आबासाहेब’ राजधर महाजन”
काही माणसांचं अस्तित्वच आपल्या आयुष्यात एक वेगळी उब, एक शांत झुळूक घेऊन येतं. त्यांच्या स्वभावातील गोडवा, विचारांची खोल दृष्टी, माणुसकीची असलेली जाण आणि नातेसंबंधांची जपणूक हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख असते. अशाच गुणांनी सजलेले, मनमिळावू आणि प्रगल्भ विचारांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे राजधर महाजन आपल्यासाठी प्रेमानं आणि आदरानं ओळखले जाणारे आबासाहेब.
राजधर आबासाहेब यांचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी आणि चिंतनशील आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे ते सदैव सखोल विचार करत निर्णय घेतात. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या समस्या मांडताना त्यांनी सत्य, न्याय आणि लोकहित यांचा नेहमीच आग्रह धरला. शब्दांची ताकद समाजपरिवर्तनासाठी कशी वापरायची, हे त्यांनी आपल्या कार्यातून सातत्याने दाखवून दिलं.
ते केवळ एक पत्रकार नाहीत, तर समाजाच्या विविध थरांशी समरस होऊन कार्य करणारे खरे हक्काचा माणूस आहेत. अनेक सामाजिक संघटनांत त्यांनी सक्रियपणे काम करताना संघर्ष, समजूत आणि सेवाभाव यांचा सुरेख मेळ साधला आहे. प्रसिद्धीपासून दूर राहून, संयमानं व सातत्याने काम करणं हीच त्यांची खास शैली आहे.जी आजच्या तरुण पिढीसाठी एक मोठा आदर्श आहे.
जेव्हा ते बोलतात, तेव्हा फक्त शब्द नव्हे, तर अनुभवांचा सारगर्भ ठेवा व्यक्त होतो. एखाद्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर ठेवलेला त्यांचा हात म्हणजे केवळ पाठ थोपटणं नसतं ती असते प्रेरणा देणारी, जिद्द जागवणारी आणि आत्मविश्वास निर्माण करणारी उर्जा.
आज त्यांचा वाढदिवस…
हा दिवस केवळ एक औपचारिक दिनविशेष नाही, तर त्यांच्या अथक कार्याला, त्यागमय जीवनशैलीला, आणि माणुसकीच्या वाटेवर न थकता चाललेल्या त्यांच्या प्रवासाला एक प्रेमाची आणि आदराची सलामी आहे.
"आबासाहेब, आपण असाच आमचा ‘हक्काचा माणूस’ राहा… कारण आपण व्यक्ती नसून एक प्रभावशाली प्रेरणा आहात!"
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा