महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचे शक्तिप्रदर्शन – धरणगावच्या जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा
महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचे शक्तिप्रदर्शन – धरणगावच्या जनतेचा अभूतपूर्व पाठिंबा
धरणगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जनतेचे विश्वासू नेतृत्व आणि संघर्षशील व्यक्तिमत्त्व असलेल्या गुलाबराव देवकर यांनी सोमवारी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज मोठ्या शक्तिप्रदर्शनाने दाखल केला. रॅलीचे भव्य आयोजन श्री बालाजी मंदिरापासून करण्यात आले होते, आणि तेथून सुरू झालेल्या रॅलीत हजारोंच्या संख्येने धरणगावातील विविध भागातून जमलेले नागरिक गुलाबराव देवकर यांच्यासोबत सहभागी झाले होते. धरणगावच्या गल्लीबोळातून गाजत-धुमधडाक्यात, लोकांच्या जयघोषात तहसील कार्यालयापर्यंत पोहोचलेल्या या रॅलीने एक अभूतपूर्व दृश्य साकारले.
रॅलीत उपस्थित असलेल्या उबाठा शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष आणि समाजसेवक सुरेश चौधरी, शिवसेना नेते लकी पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देवकर यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास व्यक्त केला.
धरणगावातील जनतेसाठी हे दृश्य म्हणजे त्यांचे प्रश्न सोडवणारा नेता आणि त्यांच्याशी कायम खंबीर उभा असणारा एक समाजप्रिय नेता म्हणून त्यांची भावना व्यक्त करणारा क्षण होता. देवकर यांनी आपल्या कार्यातून कायमच समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे, आणि त्यांचे हे शक्तिप्रदर्शन म्हणजे त्यांच्या कार्यप्रवणतेवर असलेल्या जनतेच्या अपार प्रेमाची साक्ष आहे. त्यांच्या या प्रेरणादायी नेत्रुत्वामुळे त्यांनी धरणगावच्या मनामनात कायमचा ठसा उमटवला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा