रुक्माई लॉन्स अ‍ॅन्ड मंगल कार्यालय – मेहनतीची सावली, माणुसकीचा सुगंध



रुक्माई लॉन्स अ‍ॅन्ड मंगल कार्यालय – मेहनतीची सावली, माणुसकीचा सुगंध

पिंप्री (ता. धरणगाव) या छोट्याशा खेड्यात चंदन सुरेश बडगुजर ऊर्फ चंदनभाऊ या कष्टाळू, दिलदार आणि माणुसकी जपणाऱ्या तरुणाचा जन्म झाला. मातीशी नातं जपणाऱ्या, प्रेमळ वातावरणात वाढलेल्या चंदनभाऊंचं बालपण मध्यमवर्गीय पण माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या घरात गेलं. लहानपणीच त्यांना आई-वडिलांचे कष्ट आणि त्याग अनुभवता आले. वडील सुरेश बडगुजर हॉटेल व टेन्ट हाऊस व्यवसाय करत, आर्थिकदृष्ट्या ते सर्वसामान्य होते, तरी घरात प्रेम, आपुलकी आणि सन्मानाचा वारसा भरपूर होता.

बालवयापासूनच चंदनभाऊ वडिलांना टेन्ट उभारताना, मांडव लावताना, खुर्च्या मांडताना मदत करत. उन्हातान्हात काम करणाऱ्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि डोळ्यांत चमक असायची. त्याच चमकेत त्यांनी स्वतःचं भविष्य पाहिलं. त्यांना लहानपणीच मनोमन ठरवलं – "हेच काम पुढे न्यायचं, पण नव्या रूपात, अधिक आधुनिकतेने आणि उंचीवर!"

वडिलांचा आदर्श समोर ठेवत त्यांनी व्यवसायाकडे ओढ घेतली. सुरुवातीला त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू केला, परंतु मन मात्र आपल्या वडिलांच्या व्यवसायाशी घट्ट जोडलेलं राहिलं. शेवटी त्यांनी ठाम निर्णय घेतला – आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाला नव्या युगाशी सुसंगत करत नव्या उंचीवर नेण्याचा! आणि त्यातूनच जन्म झाला – रुक्माई लॉन्स अ‍ॅन्ड मंगल कार्यालय या नावाचा.

हा केवळ एक मंगल कार्यालय नाही, तर गावकऱ्यांच्या स्वप्नांची, आनंदाच्या क्षणांची आणि माणुसकीच्या गंधाची जागा ठरली. पारंपरिक टेन्ट व मंडप व्यवसायाला आधुनिक स्वरूप देत चंदनभाऊंनी संपूर्ण समारंभाच्या सर्व सोयी – घोडा, मांडव, लाईट्स, सजावट, वातानुकूलित खोल्या, जेवण, वाहनव्यवस्था, फोटोग्राफी – या सर्व सेवा एकाच ठिकाणी अत्यंत माफक दरात आणि दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून दिल्या.

मोठ्या शहरांमध्ये लाखो रुपये मोजावे लागणाऱ्या सेवा गावकऱ्यांना आपल्या भाषेत, आपुलकीने आणि सुलभ दरात इथे मिळू लागल्या. आणि म्हणूनच ‘रुक्माई लॉन्स’ ही जागा गावकऱ्यांच्या मनात घट्ट रुजली.

तीसऱ्या पिढीकडून चालत आलेला हा व्यवसाय चंदनभाऊंनी केवळ टिकवून ठेवला नाही, तर त्याला आधुनिकतेची जोड देत नावारूपाला आणला. त्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच उद्योजक होण्याचं ठरवलं. आपल्या मेहनतीने आणि दूरदृष्टीने त्यांनी इतकी मोठी प्रगती साधली की आज अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे ते उद्योजक ठरले आहेत. त्यांच्या या कार्यातून स्पष्ट दिसून येतं की त्यांनी केवळ स्वतःच्या यशाचा विचार केला नाही, तर आपल्या गावाच्या, आपल्या लोकांच्या प्रगतीचा आणि त्यांच्या सन्मानाचा विचार केला.

चंदनभाऊंचं व्यक्तिमत्त्व म्हणजे नम्रता, दिलदारी आणि सच्चेपणाचा मूर्तिमंत आदर्श. कोणता ही ग्राहक असो वा काम करणारा मजूर, प्रत्येकाशी ते प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने वागतात. व्यवसाय वाढला, नाव झालं, तरी माणुसकीची गंध त्यांच्यात आज ही तसाच आहे. त्यांच्या डोळ्यांत आज ही वडिलांचं स्वप्न ताजं आहे आणि त्यांच्या पावलांमागे आईच्या आशीर्वादाची नितांत प्रेमळ सावली आहे.

आज पिंप्री गावात कोणता ही समारंभ असो – लग्न, मुंज, वाढदिवस, साखरपुडा वा कोणता ही खास सोहळा – लोकांच्या मनात प्रथम नाव येतं ते ‘रुक्माई लॉन्स’चं. कारण इथे केवळ एक जागा मिळत नाही, तर एक अनुभव मिळतो – प्रेमाचा, आदराचा, सेवाभावाचा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपुलकीच!

चंदनभाऊ केवळ यशस्वी उद्योजक नाहीत, तर ग्रामीण भागातील नवतरुणांसाठी एक स्फूर्तीदायक उदाहरण आहेत. जेव्हा एखाद्या समारंभात वधू-वर हसतमुख दिसतात, पाहुण्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकतं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत खरा आनंद दिसून येतो. कारण त्यांच्यासाठी हा व्यवसाय म्हणजे केवळ आर्थिक उत्पन्नाचं साधन नाही, तर माणसांशी नातं जोडण्याचं एक भावनिक माध्यम आहे – जिथे प्रत्येक क्षण साजरा होतो आणि आठवणीत ठसतो.

‘रुक्माई लॉन्स अ‍ॅन्ड मंगल कार्यालय’ ही जागा केवळ समारंभांची नसून, ती गावकऱ्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणारी जागा आहे. चंदनभाऊंचं आयुष्य आणि प्रवास आपल्याला एकच संदेश देतो –
“कष्ट करा, माणुसकी जपा आणि स्वप्नं उंच ठेवा.”

© दीपक पवार (संपादक)खान्देश माझा
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !