मनातला नेता – निलेशआबा......!

मनातला नेता – निलेशआबा......!

धरणगाव नगरीतील राजकारण, जनसामान्यांचे भावविश्व आणि युवकांच्या मनातील प्रेरणास्थान म्हणजे निलेशआबा चौधरी. एक असे नाव, ज्याचा उच्चार होताच गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपुलकीचे, विश्वासाचे आणि प्रेमाचे हास्य फुलते. एक असे व्यक्तिमत्त्व, जे केवळ राजकीय पदांपुरते मर्यादित नाही, तर हक्काने जनतेच्या अंतःकरणात स्थान मिळवून बसले आहे.

आज त्यांचा वाढदिवस... ही एक साधी तारीख नाही, तर त्यांच्याच कार्याची, तळमळीची, माणुसकीच्या वाटेवर चाललेल्या त्यांच्या झिजेची एक जिवंत आठवण आहे. हा दिवस म्हणजे संघर्ष, कर्तृत्व आणि लोकसेवेच्या निखळ भावनेला वंदन करण्याचा दिवस आहे.

त्यांनी नगराध्यक्षपद भूषवताना केलेली कर्तव्यनिष्ठ कामगिरी, घेतलेले दूरदृष्टीचे निर्णय आणि राबवलेली उपक्रमशील योजना आज ही धरणगावच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक मनात जिवंत आहे. त्यांच्या लोकप्रियतेचं खरं कारण हे केवळ पद नव्हे, तर त्यांच्या मनात असलेली जनतेविषयीची अपार आपुलकी, सेवाभाव आणि माणुसकीची भावना आहे.

"आरोळी मारताच होकारा देणारा नेता" ही उपाधी त्यांना सहजासहजी मिळालेली नाही. व्यासपीठावर उभं राहताच त्यांच्या आवाजात अशी एखादी ऊर्जा असते की सभागृहात, रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये उत्साहाची लाट उसळते. त्यांच्या शब्दांत केवळ राजकारण नसतं, तर सत्य, सरळपणा आणि जनहिताची स्पष्ट दिशा असते. त्यांचा प्रत्येक उच्चार हा जनतेच्या मनाला भिडणारा असतो.

कोरोना काळामध्ये, जेव्हा संपूर्ण देशात भय, अनिश्चितता आणि असहायता पसरलेली होती, तेव्हा निलेशआबा यांनी धरणगावकरांसाठी केलेली मदत अविस्मरणीय ठरली. औषधोपचारांची गरज असो, ऑक्सिजनची निकड असो, गरजूंना अन्न, रेशन किंवा आर्थिक सहाय्य पुरवायचे असो.त्यांनी रात्रंदिवस एक करून आपली सेवा उभी केली. जेव्हा अनेक लोक घरी बंदिस्त होते, तेव्हा निलेशआबा मात्र गावागावांत फिरून लोकांची काळजी घेत होते. ही सेवा धरणगावच्या माणसांनी केवळ पाहिलेली नाही, तर हृदयात कोरून ठेवलेली आहे.

युवकांच्या मनावर त्यांनी जो ठसा उमटवला आहे, तो काळाच्या ओघात पुसट होण्यासारखा नाही. प्रत्येक तरुणाला समजून घेत, त्याच्या अडचणींवर मार्ग काढत आणि योग्य दिशा दाखवत त्यांनी युवकांमध्ये एक आत्मीय नातं निर्माण केलं आहे. म्हणूनच आज प्रत्येक तरुण त्यांना प्रेमाने “आपला आबा” म्हणतो.

शिवसेना (उबाठा) गटाचे ते युवा जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत असले तरी त्यांची ओळख केवळ पक्षापुरती सीमित नाही. त्यांनी पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन जनतेच्या मनात आपले घर केले आहे. त्यांच्या नेतृत्वात पक्षाचा ध्वज उंचावत असताना, त्यांच्या माणुसकीने मात्र समाजातील प्रत्येक थरातील माणसांचे दुःख हलके केले आहे.

धरणगावचे चौक, रस्ते, अंगणवाड्या, शाळा साऱ्यांमध्ये त्यांच्या कर्तृत्वाचे आणि सेवाभावाचे ठसे उमटलेले आहेत. त्यांची एक नजर, एक शाब्दिक आश्वासन, एक होकारा हे सारे धरणगावकरांच्या आशा-विश्वाचे अधिष्ठान ठरले आहे.

आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने धरणगावच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक हृदयात एकच आवाज घुमतो आहे."जय निलेशआबा! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"या शुभेच्छा केवळ मुखाने दिलेल्या नाहीत, त्या आहेत हृदयातून उमटलेल्या, प्रेमाने सजलेल्या आणि विश्वासाने भारलेल्या.

निलेशआबा, आपली वाटचाल अशीच सदैव यशस्वी, जनतेसाठी समर्पित आणि नव्या उंची गाठणारी होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आपल्या आवाजातील होकारा आज ही आमच्यासाठी आशेचा किरण आहे.
आपल्या डोळ्यांतली चमक आमच्यासाठी आत्मविश्वासाचा प्रकाश आहे.
आणि आपल्या मनातली माणुसकी तीच तर आमची खरी कमाई आहे.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !