विलासभाऊ महाजन एक विश्वासाचं नाव...!
विलासभाऊ महाजन एक विश्वासाचं नाव...!
राजकारण म्हणजे केवळ सत्तेसाठीची धडपड नसते. ती असते जनतेसाठी स्वतःला समर्पित करण्याची तयारी; ती असते प्रत्येक सामान्य माणसाच्या मनाला भिडणारी सच्ची माणुसकी. आणि ही माणुसकी ज्या व्यक्तीच्या वागणुकीत, स्वभावात आणि कृतीत दिसून येते, ती व्यक्ती म्हणजे विलासभाऊ महाजन, शहरप्रमुख शिवसेना (शिंदे गट).
आजच्या वेगवान आणि स्वार्थी जगात, जिथे अनेकजण पद मिळताच माणुसकी गमावतात, तिथे विलासभाऊ महाजन हे नाव माणुसकीच्या मूळ तत्त्वांवर ठाम उभं असलेलं आढळतं. त्यांच्या दिलदार स्वभावामुळे कित्येकांचे प्रश्न सुटले, अनेकांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य उमटले. कोणता ही वर्ग असो, कोणती ही जात, पंथ, पक्ष अथवा विचारसरणी असो प्रत्येकाला आपलंसं करण्याची विलक्षण ताकद त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे.
त्यांची ओळख ही केवळ एक पदाधिकाऱ्यापुरती मर्यादित नाही. मा. नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांचे ते कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. मात्र, ही साथ ही केवळ पाठिंब्यापुरती मर्यादित न राहता, ती मूल्यांशी, विचारधारेशी व नेतृत्वाच्या निष्ठेशी घट्ट जोडलेली आहे. गुलाबरावजी पाटील साहेबांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कार्यकर्त्यांशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं हेच गुण विलासभाऊंमध्ये प्रकर्षाने दिसून येतात.
“सर्वांना घेऊन चालणं” हेच त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य. त्यांनी कधीच पक्षीय भिंतींमध्ये माणुसकी अडकवली नाही. त्यांच्या दारात आलेली कोणती ही व्यक्ती निराश होऊन परत जात नाही कारण त्यांचं मन विशाल आहे आणि हृदय माणुसकीने परिपूर्ण आहे.
सभांमधील त्यांचा आवाज प्रखर असतो, पण तो गर्वाचा नसतो. तो असतो हक्कासाठीचा, न्यायासाठीचा आणि लोकहितासाठीचा आवाज. जेव्हा ते कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहतात, तेव्हा त्या प्रत्येक कार्यकर्त्याला आत्मविश्वास मिळतो."आपण एकटे नाही; आपल्या पाठीवर विलासभाऊंचा खंबीर आधार आहे."
जेव्हा ते गावात फिरतात, तेव्हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत, गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, नवख्या कार्यकर्त्यांपासून ते अनुभवी नेतृत्वापर्यंत सर्वजण त्यांच्याकडे प्रेम आणि विश्वासाने पाहतात. कारण त्यांच्या प्रत्येक कृतीत, बोलण्यात आणि निर्णयामध्ये एकच भावना असते. "आपण आपल्या लोकांसाठी आहोत."
आजच्या काळात अशाच नेतृत्वाची गरज आहे. जे पद, सत्ता वा प्रसिद्धीपेक्षा माणसांचे दुःख समजून घेण्यास आणि त्यावर उपाय शोधण्यास प्राधान्य देतात.
विलासभाऊ महाजन यांचं नेतृत्व म्हणजे केवळ मार्गदर्शन नव्हे, तर प्रत्येक सामान्य माणसासाठी आधारवड ठरणारं व्यक्तिमत्त्व आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा