एक हाडाचा कार्यकर्ता शेतकरी पुत्र दिपकभाऊ भदाणे..!
एक हाडाचा कार्यकर्ता शेतकरी पुत्र दिपकभाऊ भदाणे..!
बिलखेडा हे एक साधं, शांत आणि सामान्य गाव. याच गावातील एका सर्वसामान्य कुटुंबात दिपकभाऊ भदाणे यांचा जन्म झाला. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, त्यांनी केवळ आपल्या आत्मविश्वासाच्या, मेहनतीच्या आणि निष्ठेच्या बळावर स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं. राजकारणात घराणेशाहीचे प्रभाव असताना, दिपकभाऊंचं पुढे येणं आणि नेतृत्वाचं स्थान मिळवणं हे खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतं.
एक सर्वसामान्य युवासैनिक शिवसैनिक म्हणून राजकीय प्रवासास सुरुवात करणाऱ्या दिपकभाऊंनी कोणताही गाजावाजा न करता, पक्षनिष्ठा आणि जनतेची सेवा हाच ध्यास घेतला. आणि हाच त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न त्यांना "युवासेना तालुकाप्रमुख" या महत्त्वाच्या जबाबदारीपर्यंत घेऊन आला. त्यांचा हा प्रवास केवळ पदांपर्यंत पोहोचण्याचा नव्हता, तर तो होता विचारांचा, सेवाभावाचा आणि अहोरात्र जनतेसाठी झगडणाऱ्या एका खऱ्या कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाचा प्रवास.
दिपकभाऊंची ओळख ही त्यांच्या पदावरून नाही, तर त्यांच्या कामातून होते. त्यांनी गावागावात लोकांपर्यंत पोहोचून, माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांचे विचार समाजमनात खोलवर रुजवले. त्यांचे विचार त्यांनी केवळ ऐकले नाहीत, तर हृदयात कोरून घेतले. त्यांच्या प्रत्येक कृतीतून, संवादातून आणि निर्णयांतून हे विचार नेहमीच प्रकट होत आले आहेत.
माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात आणि त्याचबरोबर, माननीय प्रतापरावजी पाटील साहेबांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांच्याकडे समाजाकडून आदराने पाहिले जाते. ही दोन राजकीय व्यक्तिमत्त्वं म्हणजे एक भक्कम आधारस्तंभ आणि त्यांच्याच प्रेरणेतून घडलेलं दिपकभाऊंचं नेतृत्व म्हणजे निष्ठा, संयम आणि कार्यक्षमतेचं उत्कृष्ट उदाहरण आहे .
आज राजकारणात स्वार्थाचे रंग गडद दिसतात, परंतु दिपकभाऊंच्या व्यक्तिमत्त्वात निस्वार्थ भावनेची उब आहे. कोणत्याही गरजू व्यक्तीचे दुःख त्यांच्या मनाला सहज भिडतं आणि मग तो व्यक्ती कोणताही असो, दिपकभाऊ तात्काळ मदतीसाठी धावून जातात. त्यांना ना प्रसिद्धीचा हव्यास आहे, ना सत्तेचा मोह आहे. ते फक्त आणि फक्त सामान्य जनतेची सेवा करण्याची जाज्वल्य तळमळ.
त्यांच्या प्रत्येक कृतीतून एक स्पष्ट संदेश समाजासमोर येतो."सत्ता ही शाइनिंग साठी नसून सेवेसाठी असते."
त्यांनी समाजासाठी दिलेला वेळ, स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या आणि त्या पार पाडताना दाखवलेली पारदर्शकता, सचोटी आणि निष्ठा हीच त्यांच्या यशाचे खरे कारणं आहेत.
दिपकभाऊ भदाणे हा एक असा कार्यकर्ता आहे ज्यांनी राजकारणात ‘माणूसपण’ जपलं. म्हणूनच ते प्रत्येक गावात, प्रत्येक मनात ‘आपला माणूस’ म्हणून ओळखले जातात.
दिपकभाऊ भदाणे एक निष्ठावान कार्यकर्ता, एक झुंजार लढवय्या आणि एक दिलदार माणूस.
त्यांची जीवनकहाणी ही आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरावी अशीच आहे. त्यांनी आपल्या कर्तृत्वातून, सेवाभावातून आणि निष्ठेच्या बळावर सिद्ध केले आहे की कार्यकर्त्याचं खरे यश हे त्याच्या पदात नसतं, तर त्याच्या लोकांशी असलेल्या नात्यात आणि सेवेमध्ये असतं. आणि परमेश्वर त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो. भावी जिल्हा परिषद सदस्य साळवा बांभोरी गट त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!त्यांची तळमळ, निष्ठा आणि सेवाभाव असेच बहरत राहोत, हीच सदिच्छा.
© दिपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा