“गुलाबरावजी पाटील साहेबांचा विश्वासू कार्यकर्ता शहरप्रमुखपदी धरणगावात जल्लोष”
“गुलाबरावजी पाटील साहेबांचा विश्वासू कार्यकर्ता शहरप्रमुखपदी धरणगावात जल्लोष”
धरणगावच्या राजकीय भूमीत आज एक नवा विश्वास, नवी उमेद आणि नव्या नेतृत्वाची पहाट उगवली आहे. शिवसेनेच्या ठाम विचारांना मनापासून वाहून घेणारे, मा. नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांचे कट्टर समर्थक श्री. धीरेंद्रसिंग पुरभे यांची धरणगाव शहरप्रमुखपदी निवड होणे ही केवळ नियुक्ती नाही.तर धरणगावच्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हृदयातील विजयाची पहाट आहे.
त्यांच्या कार्यतत्परतेवर, लोकाभिमुख स्वभावावर आणि पक्षनिष्ठेवर ठेवलेला पक्षाचा विश्वास आज सर्वांसमोर ठामपणे उभा आहे. सातत्याने जनतेच्या विश्वासासाठी परिश्रम करणाऱ्या या तरुण नेतृत्वाला मोठ्या जबाबदारीचे सोन्याचे पंख आज प्राप्त झाले आहेत.
शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख मा.विष्णूभाऊ भंगाळे यांनी ज्यावेळी ही नियुक्ती जाहीर केली, तेव्हा धरणगावातल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या अंतःकरणात आनंदाची लहर उसळली. त्यांच्या निर्णयाने पक्षनिष्ठा, संघर्षशीलता आणि लोकांसाठी झटणाऱ्या नेतृत्वाची खरी ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर ही महत्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.याचा अर्थ स्पष्ट आहे… पक्षाला धीरेंद्रसिंग पुरभे यांच्यातील नेतृत्वाची ताकद, त्यांची जनआधारातील पकड, आणि लोकांशी असलेली जिव्हाळ्याची नाती यावर अढळ विश्वास आहे.
धरणगावातील प्रत्येकाला माहीत आहे.पुरभे यांची राजकारणातील वाटचाल केवळ सत्तेसाठी नसून,
सेवेसाठी आहे.त्यांचे दार कायम सर्वांसाठी खुले, त्यांच्या मनात जनतेसाठी अढळ प्रेम, आणि त्यांच्या पावलांत नेहमीच सेवाभावाचे तेज.
आज ते शहरप्रमुखपदी विराजमान होत असताना धरणगावला एक नवे दिशादर्शन, नवा आत्मविश्वास, आणि नवी ऊर्जा मिळाली आहे.ही नियुक्ती म्हणजे त्यांच्या संघर्षाची पावती, आणि पक्षाने दाखवलेला विश्वास म्हणजे जबाबदारीची नवी शिदोरी.
धरणगावच्या प्रत्येक रस्त्यावर आता एकच संदेश घुमत आहे.“विश्वासाची माणसं पुढे आली, तर विकासाची स्वप्नं नक्कीच पुर्ण होतात!”
श्री.धीरेंद्रसिंग पुरभे यांना मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन.धरणगावच्या उज्ज्वल भवितव्याची आशा आता अधिकच दृढ झाली आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा