पोस्ट्स

पडल्यावर हात देणारे मोजकेच...!

इमेज
पडल्यावर हात देणारे मोजकेच...! या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात, पण त्या वाटेवर चालण्याचं धाडस मात्र आपल्यालाच करावं लागतं. आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक वळणावर सल्ले मिळतात, सूचना मिळतात, अनुभव सांगणारे लोक भेटतात. “असं कर”, “तसं करू नकोस”, “हा मार्ग योग्य आहे” असं सांगणारे अनेकजण असतात. पण या सगळ्या शब्दांच्या पलीकडे एक कठोर सत्य दडलेलं असतं.त्या वाटेवर पडायचं,थकायचं, घसरायचं आणि पुन्हा उभं राहायचं काम आपल्यालाच करावं लागतं. कारण आयुष्य कोणाच्याही शब्दांवर नाही, तर आपल्या पावलांवर चालत असतं. चालताना आपण एकटेच असतो. आजूबाजूला गर्दी असते, ओळखीचे चेहरे असतात, पण तरीही मनाच्या आत एक एकटेपणाची शांत जाणीव असते. कारण प्रत्येकाचं दु:ख वेगळं असतं, प्रत्येकाची लढाई वेगळी असते. कुणालाही आपल्या मनातल्या वेदना पूर्णपणे समजत नाहीत. म्हणूनच वाट दाखवणारे असले, तरी चालणं आपल्यालाच शिकावं लागतं. पडायचं भीती न बाळगता पुढे जाण्याचं धाडस स्वतःमध्येच शोधावं लागतं. आयुष्याच्या या प्रवासात पडणं अपरिहार्य आहे. कधी अपेक्षांवर पाणी फिरतं, कधी स्वप्नं तुटतात, कधी विश्वासाला तडा जातो. अशा क...

सकाळची किरणे आणि स्वप्नांचा पाठलाग...!

इमेज
सकाळची किरणे आणि स्वप्नांचा पाठलाग...! उजेडणारी प्रत्येक सकाळ आपल्यासमोर दोन दरवाजे उघडून ठेवते.एक, गोड झोपेत हरवून स्वप्न पाहण्याचा, आणि दुसरा, धैर्याने उभे राहून त्या स्वप्नांच्या मागे पाऊल टाकण्याचा. स्वप्नं मोहक असतात. त्या रंगीत, सुंदर जगात आपण कोणताही त्रास, कोणताही अपयश अनुभवत नाही. आपल्याला वाटतं, “थोडं झोपून राहू, उद्याचं दिवस बघू…” पण खरं तर प्रत्येक उशिरा घालवलेली सकाळ आपल्याला आपल्या स्वप्नांपासून थोडं दूर नेत असते. उठण्याचा निर्णय सोपा नसतो. रस्ता कठीण असतो.  अपयशाची भीती, थकवा, जगाची टिंगल सर्व काही डोक्यावर येतं. पण हा तोच रस्ता आहे जो आपल्याला स्वप्नांच्या जवळ नेतो. पायरी-पायरी चढत जाताना आपण फक्त आपले स्वप्न पूर्ण करत नाही, तर स्वतःच घडत जातो. आपण अधिक मजबूत होतो, अधिक धैर्यवान होतो, आणि जगण्याची खरी कला शिकतो. सकाळची किरणं आपल्याला हे सांगतात.तुम्ही निवड करू शकता. तुमच्या हातात आहे की तुम्ही पुन्हा झोपेत हरवाल की स्वप्नांना प्रत्यक्षात बदलण्यासाठी उठाल. स्वप्न पाहणे सोयीचे आहे, पण स्वप्न पूर्ण करणे.अद्भुत. त्या एक पावलाही विसरू नका, जे तुम्हाला स्वप्ना...

कामातून उमटवलेले नाव....!

इमेज
कामातून उमटवलेले नाव....! संधी ही आपल्याला हवेतून मिळणारी वरदानासारखी नसते. ती कुणी देणार नाही, ती कुणी बांधणार नाही. संधी ही आपणच निर्माण करतो. आपल्या कष्टाने, आपल्या जिद्दीने, आपल्या धैर्याने. जीवनात जे लोक फक्त वाट पाहतात, ते वेळ गमावतात; पण जे लोक प्रत्येक क्षणाला संधी समजून त्यावर काम करतात, तेच खरे यश मिळवतात. आपलं नाव इतिहासात नसेल तरी चालतं. पण जेव्हा आपण केलेलं काम इतकं प्रभावी, इतकं अर्थपूर्ण असतं की लोक ते पाहून आपल्याला आठवतात, तेच खरे यश असतं. लोक आपल्याला नावानं नव्हे, तर कर्मानं आठवतात. आपली मेहनत, आपलं धैर्य, आपली निष्ठा हेच आपल्या अस्तित्वाचं खरे प्रतिक आहे. संधी मिळणे ही अपेक्षा सोडून द्या. प्रत्येक अपयश, प्रत्येक अडचण ही नवीन संधी आहे. प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रयत्न आपल्याला आपली स्वतंत्र वाट तयार करण्याची संधी देतो. आपलं काम असे करा की ते लोकांच्या हृदयाला भिडेल, त्यांना प्रेरणा देईल, आणि ते आपल्याला आपल्या नावाशिवाय ही आठवतील. खरे नाव ते नाही जे कागदावर लिहिलं जातं; खरे नाव ते आहे जे आपल्या कार्याने जगात सोडले जाते. जगाला बदलण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण...

शब्द कमी,सामर्थ्य जास्त....!

इमेज
शब्द कमी,सामर्थ्य जास्त....! नम्रतेने वागणारा माणूस अनेकदा या जगात गैरसमजांचा बळी ठरतो. त्याच्या शांत शब्दांना कमजोरीचं लेबल लावलं जातं, त्याच्या संयमाला असहायतेची छाया दिली जाते. लोकांना वाटतं, जो माणूस मोठ्याने बोलतो, उद्धटपणे वागतो, समोरच्याला दबवतो तोच खरा हिम्मतवान. पण हे चित्र खरंच इतकं सोपं असतं का? नम्रता ही भीतीतून येत नाही, ती येते आत्मभानातून. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं, रागाच्या भरातही चुकीचं न बोलणं, दुखावलं गेलं तरीही मर्यादा न सोडणं हे सगळं प्रत्येकाला जमत नाही. ओरडणं सोपं असतं, अपमान करणं सोपं असतं; पण शांत राहून स्वतःला सावरून घेणं ही खरी कसोटी असते. कारण ज्याचं मन अस्थिर असतं, तोच माणूस सतत बाहेर गोंधळ निर्माण करतो. उद्धटपणामागे बहुतेक वेळा असुरक्षितता लपलेली असते. “मी कमजोर दिसू नये” या भीतीपोटी माणूस कडक मुखवटा चढवतो. पण नम्र माणूस मुखवट्यां शिवाय जगतो. त्याला स्वतःला सिद्ध करण्याची घाई नसते, कारण त्याचं मन स्वतःशी शांततेत असतं. खरं तर, सगळे संघर्ष बाहेर नसतात. अनेक लढाया आपल्या मनातच चालू असतात. आणि ज्याला स्वतःचं मन शांत करता आलं, त्याच्यासाठी ब...

जीवनाच्या प्रवासातील क्षणिक विश्रांती.....!

इमेज
जीवनाच्या प्रवासातील क्षणिक विश्रांती.....! दिवसभराच्या धावपळीच्या प्रवासात, शरीर थकते, आणि मनही नकळत शांततेचा शोध घेते. अविरत जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली हसण्याचे क्षण कधी कधी हरवून जातात, आणि आपल्याला वाटते की फक्त पुढे चालत राहणे म्हणजेच जीवन. पण अशा वेळी विरंगुळा हा फक्त विश्रांतीचा क्षण नसतो; तो आपल्याला आपल्या अंतर्मनाशी बोलण्याची संधी देतो. विरंगुळा म्हणजे शांत चहा घेताना, आवडत्या पुस्तकात हरवताना, किंवा फक्त शांतपणे बसून आपल्या विचारांना वेळ देताना अनुभवलेला एक हळवा संवाद आहे. तो आपल्या थकव्याला सामोरे जातो, आपल्याला पुन्हा उर्जा देतो, आणि प्रत्येक श्वासात आशेचा प्रकाश भरतो. ही छोटीशी विश्रांतीच आपल्याला आठवण करून देते. की जीवन फक्त जबाबदाऱ्या आणि धावपळीपुरते मर्यादित नाही. विरंगुळा आपल्याला पुन्हा हसण्याची, पुन्हा मनमोकळेपणाने जगण्याची, आणि नव्या उमेदीनं पुढे जाण्याची ताकद देतो. थकलेल्या शरीराला जसा विश्रांतीची गरज असते, तसाच मनालाही विरंगुळ्याची आवश्यकता असते. आणि जेव्हा आपण पुन्हा जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करतो, तेव्हा जाणवते की विरंगुळा फक्त थकलेल्या क्षणाचा आधा...

क्षणभराची भेट,जन्मभराची आठवण....!

इमेज
क्षणभराची भेट,जन्मभराची आठवण....! आयुष्य म्हणजे असंख्य भेटींची गुंफण. काही माणसं आपल्यासोबत चालत राहतात, तर काही फक्त क्षणभरच भेटतात. पण या क्षणभरच्या भेटीतही जर आपल्या स्वभावाचा सुगंध दरवळला, तर ती भेट काळाच्या ओघातही पुसली जात नाही. कारण माणूस चेहरा नाही आठवत, तो आठवतो तो भाव. स्वभाव म्हणजे केवळ बोलण्याची शैली नव्हे, तर तो आपल्या मनाचा आरसा असतो. एखाद्याशी दोन शब्द बोलताना त्याला दिलेला मान, त्याच्या डोळ्यांत पाहून केलेलं संवाद, आणि त्याच्या भावनांना दिलेली किंमत यातूनच आपला स्वभाव उमटतो. क्षणभर भेटलेला माणूसही जर आपल्या वागण्यात आपलेपणा अनुभवला, तर तो आपल्याला आयुष्यभर विसरू शकत नाही. कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या डोळ्यांत दुःख दिसतं, आणि आपण त्याला फक्त “काही हरकत नाही, सगळं ठीक होईल” एवढंच म्हणतो. पण त्या एका वाक्याने त्याच्या मनाला आधार मिळतो. अशा छोट्या शब्दांतून, छोट्या कृतीतून आपण नकळत कुणाच्या आयुष्यात आशेचा दिवा लावतो. स्वभाव सुंदर असणे म्हणजे नेहमीच गोड बोलणे नव्हे. कधी कधी शांतपणे ऐकणे, वेळेवर मदतीचा हात पुढे करणे, किंवा कुणाला कमी न लेखता समजून घेणे.हेच खरे सौं...

‘मीच बरोबर’ या भ्रमाची किंमत...!

इमेज
‘मीच बरोबर’ या भ्रमाची किंमत...! अति स्वतःला हुशार समजणाऱ्या माणसांच्या आयुष्यात एक विचित्र शांतता असते.ती आत्मविश्वासाची नसते, तर अहंकाराची असते. त्यांना वाटतं, जगातलं सगळं ज्ञान त्यांनीच मिळवलं आहे. त्यांच्यापेक्षा शहाणं कुणीच नाही, अनुभवी कुणीच नाही. त्यामुळे दुसऱ्याचं मत ऐकणं त्यांना अपमानासारखं वाटतं, आणि प्रेमाने दिलेला सल्ला हस्तक्षेपासारखा भासतो. अशा लोकांचं मन हळूहळू बंद होत जातं. शिकण्याचे दरवाजे आपोआप बंद होतात. अनुभव सांगणारी माणसं मागे पडतात, चुका दाखवणारी माणसं शत्रू वाटू लागतात. वास्तव समोर असून ही ते मान्य केलं जात नाही. कारण अहंकार डोळ्यांवर असा पडदा टाकतो की योग्य-अयोग्य यातला फरकच अस्पष्ट होतो. स्वतःच्या बुद्धीवरचा अति विश्वास माणसाला एकटा करतो. कारण नात्यांना ‘बरोबर-चूक’पेक्षा ‘समजून घेणं’ जास्त गरजेचं असतं. सतत “मीच बरोबर” म्हणणाऱ्या माणसासोबत चालताना माणसं थकतात. हळूहळू संवाद कमी होतो, माणसं दूर जातात, आणि शेवटी भोवती गर्दी असूनही तो माणूस एकटा राहतो. आयुष्य मात्र कुणाच्याही अहंकाराला थांबवत नाही. ते आपली गती चालूच ठेवतं. वेळोवेळी थांबवून, अडवून, वाकवू...

मीच आहे ना,माझ्यासोबत....!

इमेज
मीच आहे ना,माझ्यासोबत....! आयुष्याच्या वाटेवर चालताना प्रत्येकाला कुणाच्या तरी सोबतीची गरज असते. लहानपणापासूनच आपण हात धरून चालायला शिकतो.आईचा, वडिलांचा, मित्रांचा, प्रिय व्यक्तीचा. त्या हातात सुरक्षितता असते, विश्वास असतो, आणि “मी एकटा नाही” ही भावना असते. पण आयुष्य जसजसं पुढे सरकतं, तसतसं एक कठोर सत्य समोर येतं.प्रत्येक हात कायमचा धरून राहीलच असं नाही. कधी परिस्थिती बदलते, कधी माणसं बदलतात, तर कधी नातीच बदलून जातात. ज्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवलेला असतो, तोच हात अचानक सुटतो. त्या क्षणी मन कोलमडतं, पाय थरथरतात, आणि वाटतं की आता पुढे चालणं अशक्य आहे. पण अशाच क्षणी आयुष्य आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतं.स्वतःचा हात स्वतःच धरायला शिक. स्वतःचा हात स्वतःच धरायला शिकणं म्हणजे स्वार्थी होणं नव्हे, तर स्वावलंबी होणं आहे. म्हणजे इतरांपासून दूर जाणं नव्हे, तर स्वतःच्या आतल्या ताकदीशी ओळख करून घेणं आहे. कारण बाहेरचा आधार कधीही निघून जाऊ शकतो, पण आतली हिंमत जर जागी असेल, तर कोणतीही साथ सुटली तरी पाय घसरत नाहीत. आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अनेक धक्के बसतात. अपयश, नाकारलं जाणं, वि...

खोटेपणाच्या गर्दीत सत्याचा प्रकाश...!

इमेज
खोटेपणाच्या गर्दीत सत्याचा प्रकाश...! जगात खोटं बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सत्य बोलणारे लोक अनेकदा एकटे पडतात. सत्य हे नेहमीच सोपे नसते; ते बोलायला धाडस लागतं, स्वीकारायला धैर्य लागतं, आणि टिकवायला संयम लागतो. सत्य बोलणाऱ्या माणसाची वाट कठीण असते. जेव्हा त्याच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा असतो, तेव्हा अनेक वेळा इतरांना ती कडवी वाटते. लोक आपल्याला समजू शकत नाहीत, प्रश्न विचारतात, किंवा आपल्यावर टीका करतात. आणि हळूहळू, सत्य बोलणारा माणूस एकटा पडतो. पण एकटेपणात ही त्याचे अंत:करण शांत असते. खोटं बोलणाऱ्या माणसाची जगण्यात गती असते, पण त्यांना आत्म्याचा शांती कमी मिळते. सत्य बोलणारा जरी समाजात थोडा वेगळा दिसतो, तरी त्याचे शब्द आणि कृती मनाला भिडतात. तो ज्या मार्गावर चालतो, तो मार्ग कठीण असला तरी प्रामाणिकतेचा मार्ग असतो. सत्य बोलणारे लोक जरी कमी असतील, तरी त्यांचा प्रभाव मोठा असतो. एक छोटासा सत्याचा शब्द अनेक खोट्या शब्दांपेक्षा जास्त ताकदवान असतो. एकटी वाट चालत चालत ते आपले धैर्य टिकवतात, आत्म्याची ताकद ओळखतात, आणि जीवनाला अर्थ देतात. जगात सत्य बोलणाऱ्यांची संख्या कम...

वर्दीतील समर्पणाचा विजय चोपडा पोलीस उपविभागाची प्रेरणादायी कामगिरी....!

इमेज
वर्दीतील समर्पणाचा विजय चोपडा पोलीस उपविभागाची प्रेरणादायी कामगिरी....! सामान्य माणसाच्या आयुष्यात “पोलीस” हा शब्द कधी धाक वाटणारा, तर कधी आधार देणारा असतो. पण जेव्हा पोलीस आपली वर्दी केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर समाजसेवेचे व्रत म्हणून परिधान करतात, तेव्हा विश्वास जन्माला येतो. चोपडा पोलीस उपविभागाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सर्वोत्कृष्ट पोलीस उपविभाग हा मान मिळवला, ही केवळ एक प्रशासकीय उपलब्धी नाही.ती लोकांच्या विश्वासावर उमटलेली मोहोर आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या सक्षम, संयमी आणि प्रेरणादायी नेतृत्वाखाली चोपडा शहर, चोपडा ग्रामीण, धरणगाव आणि अडावद येथील प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदाराने आपले कर्तव्य केवळ आदेश म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून निभावले. दिवस असो वा रात्र, ऊन असो वा पाऊस कायद्याचे रक्षण करताना स्वतःच्या सुख-दुःखाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या वर्दीधारी माणसांनी समाजासाठी स्वतःला झोकून दिले. गुन्हेगारी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था, नागरिकांशी संवाद, तक्रारींवरील तत्काळ कारवाई आणि मानवी दृष्टिकोनातून दिलेला न्याय या सर्व बाबींमध्ये चोपडा ...

अनुभवातून शहाणपण....!

इमेज
अनुभवातून शहाणपण....! “अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे” हे वाक्य आपण वारंवार उच्चारतो; पण त्यामागचा अर्थ मात्र अनेकदा आपल्या मनापर्यंत पोहोचत नाही. कारण अनुभव शिकवतो असं आपण मान्य करतो, पण तो अनुभव स्वतःचा नसेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहण्याची सवय आपल्यात कमीच असते. दुसऱ्याच्या आयुष्यात घडलेली घटना आपल्याला फक्त ऐकलेली गोष्ट वाटते, जोपर्यंत तिची झळ स्वतःला लागत नाही. समाज हा खरं तर आपल्याला सतत आरसा दाखवत असतो. पण त्या आरशात पाहताना आपण स्वतःला शोधत नाही; उलट इतरांच्या चुका, उणिवा, अपयश यातच आपलं लक्ष अडकतं. कुणी चुकलं की आपण लगेच मत मांडतो, चर्चा करतो, कधी न्यायाधीशासारखे निकालही देतो. मात्र “मी त्या जागी असतो तर?” हा प्रश्न स्वतःला विचारण्याइतकी प्रामाणिकता आपल्यात क्वचितच दिसते. एखादी वेदना जो पर्यंत आपली होत नाही, तो पर्यंत तिचं खरं वजन आपल्याला जाणवत नाही. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचतो, टीव्हीवर चर्चा पाहतो,सोशल मीडियावर प्रतिक्रिया देतो.पण मनाच्या आत काही हलत नाही. कारण सहानुभूतीचा स्पर्श नसतो. जोपर्यंत आपण स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करत नाही, तोपर्यंत...

गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्यावर…..!

इमेज
गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्यावर…..! काही नाती अशी असतात, जी जपता-जपता आपणच थकून जातो. सुरुवातीला सगळं सहज असतं.आपण वेळ देतो, मन देतो, भावना देतो… कारण आपल्याला समोरचा आपलासा वाटतो. पण कधीतरी लक्षात येतं की आपलं देणं वाढत जातं, आणि आपली किंमत मात्र कमी होत जाते. आपण जितकं जास्त झुकतो, तितकं समोरच्याला ते आपलं कर्तव्य वाटू लागतं. आपली उपस्थिती सवयीची होते. आपलं नसणं काही फरकच पडत नाही. आपण थांबतो, समजून घेतो, माफ करतो पुन्हा पुन्हा. आणि हळूहळू आपल्या मनात एक प्रश्न उगवतो.मी खरंच महत्त्वाचा आहे का, की फक्त सोयीचा? वेळ, भावना आणि आपुलकी या आयुष्यातल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टी आहेत. त्या कोणाच्या ही हातात सहज देण्यासाठी नसतात. कारण ज्याला तुमच्या वेळेची किंमत कळत नाही, त्याला तुमच्या भावना कधीच समजणार नाहीत. आणि ज्याला तुमच्या उपस्थितीचा सन्मान नाही, त्याच्यासाठी तुम्ही कितीही दिलं, तरी ते कधीच पुरेसं ठरणार नाही. म्हणूनच कुणाला जवळ येऊ देण्याआधी, कुणासाठी स्वतःला झोकून देण्याआधी एक क्षण थांबणं गरजेचं असतं. तो माणूस तुमचं ऐकून घेतो का? तुमच्या भावना जपतो का? तुमच्या शांततेचा ही...

स्वार्थाच्या जगात निस्वार्थ मनं....!

इमेज
स्वार्थाच्या जगात निस्वार्थ मनं....! या जगात खूप माणसं अशी असतात की ज्यांचा स्वभाव कधीच कामापुरता नसतो. ते नात्यांकडे व्यवहार म्हणून पाहत नाहीत. भेटले की हसून भेटणं, मदत करताना मनापासून करणं आणि नातं जोडताना “मला काय मिळेल?” असा हिशोब न ठेवणं ही त्यांच्या स्वभावाची ओळख असते. त्यांची आपुलकी वेळेवर अवलंबून नसते किंवा गरजेपुरती मर्यादित नसते. म्हणूनच अशा माणसांना आयुष्यात थोडं अधिक दुखावलं जातं, थोडं अधिक फसवलं जातं; तरीसुद्धा ते पुन्हा माणसांवर विश्वास ठेवतात. कारण त्यांचा स्वभाव व्यवहाराचा नसून माणुसकीचा असतो. अशा लोकांना अनेकदा “तू खूप चांगला आहेस” असं म्हणत लोक बाजूला होतात. सुरुवातीला गोड बोलणं, जवळ येणं आणि आपुलकी दाखवणं हे सगळं असतं; पण काम झालं की माणसं बदलतात. हे अनुभव मनाला थकवणारे आणि वेदनादायक असतात. मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की ही फसवणूक त्यांच्या चांगुलपणाची हार नसते, तर त्यांच्या समजुतीची सुरुवात असते. या अनुभवांतूनच माणसं ओळखण्याची दृष्टी अधिक स्पष्ट होत जाते. नाती टिकवण्यासाठी हे लोक जे प्रयत्न करतात, ते कुठल्याही प्रकारच्या कमजोरीतून नसतात. ते त्यांच्या आत...

आयुष्यात पैसा कमवा पण…..!

इमेज
आयुष्यात पैसा कमवा पण…..! आयुष्यात पैसा कमवणं आवश्यक आहे. कारण पैसा म्हणजे फक्त सुखसोयी नाहीत, तर आत्मसन्मान, स्वप्नांना बळ आणि जबाबदाऱ्यांची खात्री असते. पण तो कुठून येतो, किती येतो, कसा येतो.हे सगळं प्रत्येकाला सांगत फिरणं शहाणपणाचं नसतं. कारण पैशाबरोबर माणसांच्या नजरा बदलतात, आणि त्या बदललेल्या नजरांमध्ये माणूस हरवू लागतो. आज तुमचे कष्ट लोकांना दिसतात. तुमचा संघर्ष, तुमची धडपड, तुमचं न थकणं सगळं कौतुकास्पद वाटतं. पण उद्या जेव्हा यश तुमच्या दाराशी येतं, तेव्हा तेच कष्ट संशयास्पद वाटू लागतात. “इतकं कसं?” “एवढ्या लवकर कसं?” असे प्रश्न मनात जन्म घेतात. यश दिसू लागतं, पण त्या मागचा संघर्ष अदृश्य होतो. कमाईची माहिती झाली की आपुलकी हळूहळू कमी होते आणि सल्ले वाढू लागतात. कोण कसा खर्च करावा, कुणाला मदत करावी, कुठे गुंतवणूक करावी.हे सगळं सांगणारे अचानक वाढतात. पण या सल्ल्यांमागे काळजीपेक्षा तुलना जास्त असते. काही जण खरोखर प्रेरणा घेतात, पण बरेच जण स्पर्धा आणि हेवा मनात साठवून ठेवतात. तुमचं यश त्यांच्या अस्वस्थतेचं कारण ठरतं. पैशाची गोष्ट उघड झाली की नात्यांत हिशेब शिरतो. मदत मागणं...

नात्याची खरी किंमत...!

इमेज
नात्याची खरी किंमत...! नात्यांची खरी ओळख शब्दांत नाही, तर कृतीत असते. ज्याला खरंच तुमची गरज असते, तो मोठमोठ्या वचनांआधी स्वतःत बदल घडवतो. त्याला सांगावं लागत नाही, समजावं लागत नाही. तुमचं मौन, तुमच्या डोळ्यातली थकवा, मनातली जखम हे सगळं तो शब्दांआधीच ओळखतो. कारण नात्याची किंमत त्याला मनापासून माहीत असते. त्याच्यासाठी नातं म्हणजे फक्त सोबत नसते, तर जबाबदारी असते. पण ज्याला तुमची गरजच नसते, तो कितीही समजावलं तरी बदलत नाही. तुम्ही तुमचं मन उघडं ठेवलं, भावना मांडल्या, स्वतःला कमी केलं तरी त्याच्याकडून बदल मिळत नाही. उलट प्रत्येक वेळी नवी कारणं, नवी सबब आणि नवे आरोप पुढे येतात. अशा माणसाला बदलायचंच नसतं; त्याला फक्त वेळ काढायचा असतो. तो तुमच्या संयमावर जगतो, तुमच्या आशांवर खेळतो. आणि आपण? आपण मात्र विश्वास ठेवत राहतो. “कदाचित आता समजेल” या आशेवर भावना, वेळ आणि स्वतःची शांतता सगळं पणाला लावतो. हळूहळू आपण थकतो. आतून तुटतो. स्वतःलाच दोष देऊ लागतो. आपली किंमत आपल्यालाच कमी वाटू लागते. हे सगळं घडत असताना समोरच्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीवही नसते. कारण ज्याला फरक पडतो, तोच बदलतो;...