मराठी गझल एक समृद्ध प्रवाह....!
शनिवार दि.७ फेब्रुवारी २०२६ व रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलन संपन्न होत आहे त्यानिमित्त हा लेख. ------------------------------------------------- अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुरेश भट एक महान गझल सम्राट मराठी गझल एक समृद्ध प्रवाह शनिवार दि.७ फेब्रुवारी २०२६ व रविवार दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलन संपन्न होत आहे त्यानिमित्त हा लेख प्रपंच . या अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनामध्ये संपूर्ण भारतातून आलेल्या गझलकरांचे हार्दिक अभिनंदन ॥ आणि या अखिल भारतीय एल्गार गझल साहित्य संमेलनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा ॥ मराठी साहित्याच्या प्रांतात 'गझलसम्राट' म्हणून ओळखले जाणारे सुरेश भट हे केवळ एक कवी नव्हते, तर ते मराठी गझलेला घराघरात पोहोचवणारे एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्व होते. त्यांनी उर्दूत...