मुलांचा आधारस्तंभ – पांडुरंग अण्णांची निःस्वार्थ सेवा”
खान्देश माझा
*“मुलांचा आधारस्तंभ – पांडुरंग अण्णांची निःस्वार्थ सेवा”
प्रत्येकाच्या जीवनात काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की, जी नुसतीच प्रेरणा देत नाहीत, तर ती स्वतः एक प्रेरणास्त्रोत बनतात. असेच एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे पांडुरंग हरी पाटील, ज्यांना सगळे प्रेमाने "अण्णा" म्हणतात. अण्णांनी आपल्या जीवनाचा एकमेव उद्देश साधला आहे – विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासात मदत करणे आणि त्यांना जीवनात यशाच्या उंच शिखरावर पोहोचवणे.
*सेवा-समर्पणाचं प्रतीक:
एरंडोल तालुक्यातील आडगाव सारख्या साध्या गावातून येणारे पांडुरंग अण्णा म्हणजे समाजसेवेचं जिवंत उदाहरण आहेत. शेतकरी कुटुंबातून आलेले आणि कृषी सेवक म्हणून आपलं कार्य पूर्ण केल्यानंतरही, अण्णांनी समाजासाठी कर्तव्य म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करण्याचं ठरवलं. वयाच्या ८१व्या वर्षीही त्यांच्या कार्यातली उर्जा पाहून कुणालाही वाटेल, की ही माणूस थकायला तयारच नाही!
*निःस्वार्थ शिक्षण सेवा:
निवृत्तीनंतर पांडुरंग अण्णा कासोदा येथे पंचप्राणेश्वर मंदिरात विनामूल्य शिक्षण केंद्र चालवतात. त्यांच्याकडे दररोज १०० ते ११० विद्यार्थी येतात, आणि अण्णा त्यांना नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करतात. अण्णांचा शिक्षणासाठी असलेला आंतरिक जिव्हाळा त्यांची खरी संपत्ती आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी नसतानाही, ते आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना ज्ञान देतात. त्यांच्या शिकवणीमुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतात.
*अण्णांचा खरा पुरस्कार:
अण्णांनी आपल्या शिक्षण कार्यातून कधीच कोणतीही आर्थिक मदत स्वीकारली नाही. त्यांचं काम निःस्वार्थ होतं आणि आहे. त्यांना ना कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा, ना कोणत्याही मोठ्या मानमरातबाची गरज! कारण त्यांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचं यशच त्यांचं खरं समाधान आहे. त्यांच्या कार्यातलं यश हे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांत दडलेलं आहे.
*समाजाला मिळालेला प्रेरणास्रोत:
अण्णांचं संपूर्ण जीवन म्हणजे निःस्वार्थ सेवा आणि समर्पण. समाजात कितीही बदल झाले तरी अण्णांचा ध्यास मात्र तसाच राहिला. त्यांच्या या सेवेबद्दल आजपर्यंत कुठेही मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली नाही, ना त्यांनी कधी प्रसिद्धीचा मोह धरला. पण त्यांच्या कामाचं खणखणीत कौतुक व्हायला हवं. अशा निःस्वार्थ सेवकांचं कार्यच समाजाला एक नवीन दिशा देतं, नवीन आशा देतं.
*अण्णांचा कार्याला सलाम:
आज समाजाला अशा अण्णांसारख्या व्यक्तिमत्त्वांची गरज आहे, जी कोणताही स्वार्थ न ठेवता समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी काम करतात. अण्णांचा जीवन प्रवास म्हणजे समाजासाठी दिलेलं समर्पणाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांच्या शिक्षण कार्यामुळे अनेक गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी मिळाली आहे.
*अण्णा – समाजाचा हिरो:
अण्णांनी आपल्या साध्या जीवनातून जे कार्य केलं आहे, ते खरंच प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याला आपण सगळ्यांनी सलाम करायला हवा, कारण समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या अशा लोकांमुळेच समाजात प्रकाशमान भविष्यातील नव्या पिढीला प्रेरणा मिळते.
पांडुरंग अण्णा, तुमच्या सेवेचं मोल शब्दांपलीकडचं आहे. तुमचं कार्य हेच तुमचं महान योगदान आहे, आणि त्यासाठी तुम्हाला सलाम!
©शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
======================================
*“बच्चों का आधारस्तंभ – पांडुरंग अण्णा की निस्वार्थ सेवा”
हर किसी के जीवन में कुछ व्यक्तित्व ऐसे होते हैं जो केवल प्रेरणा नहीं देते, बल्कि खुद एक प्रेरणास्रोत बन जाते हैं। ऐसा ही एक अद्वितीय व्यक्तित्व हैं पांडुरंग हरी पाटील, जिन्हें सब प्यार से "अण्णा" कहते हैं। अण्णा ने अपने जीवन का एकमात्र उद्देश्य साधा है – विद्यार्थियों को शिक्षा के सफर में मदद करना और उन्हें जीवन में सफलता की ऊँचाइयों पर पहुँचाना।
*सेवा-समर्पण का प्रतीक:
एरंडोल तालुक़े के आडगांव जैसे साधारण गाँव से आने वाले पांडुरंग अण्णा समाज सेवा का जीवंत उदाहरण हैं। एक किसान परिवार से आने वाले और कृषि सेवक के रूप में अपना कार्य पूरा करने के बाद भी, अण्णा ने समाज के प्रति अपने कर्तव्य को समझते हुए शिक्षा के क्षेत्र में कार्य करने का निर्णय लिया। 81 वर्ष की आयु में भी उनकी कार्यशक्ति देखकर कोई भी कह सकता है कि यह इंसान थकने के लिए तैयार ही नहीं है!
*निस्वार्थ शिक्षा सेवा:
निवृत्त होने के बाद, पांडुरंग अण्णा कासोदा में पंचप्राणेश्वर मंदिर में मुफ्त शिक्षा केंद्र चलाते हैं। उनके पास प्रतिदिन 100 से 110 विद्यार्थी आते हैं, और अण्णा उन्हें नवोदय, छात्रवृत्ति परीक्षा, तथा अन्य प्रतियोगी परीक्षाओं के लिए मार्गदर्शन करते हैं। अण्णा की शिक्षा के प्रति गहरी लगन उनकी असली संपत्ति है। शैक्षणिक पृष्ठभूमि न होते हुए भी, वे अपने अनुभवों से विद्यार्थियों को ज्ञान प्रदान करते हैं। उनकी शिक्षाओं के कारण हर वर्ष कई विद्यार्थी परीक्षाओं में उत्तीर्ण होते हैं।
*अण्णा का असली पुरस्कार:
अण्णा ने अपनी शिक्षा कार्य में कभी भी कोई आर्थिक सहायता स्वीकार नहीं की। उनका काम निस्वार्थ है। उन्हें न किसी पुरस्कार की आवश्यकता है, न किसी बड़े मान-सम्मान की! क्योंकि उनके लिए विद्यार्थियों की सफलता ही उनकी असली संतोष है। उनके कार्य की सफलता उनके विद्यार्थियों के हंसते चेहरे में छिपी हुई है।
*समाज को मिला प्रेरणास्रोत:
अण्णा का पूरा जीवन निस्वार्थ सेवा और समर्पण का प्रतीक है। समाज में कितने ही परिवर्तन आएं, लेकिन अण्णा का समर्पण वैसा ही बना रहा। उनकी इस सेवा के बारे में आज तक कहीं भी बड़े पैमाने पर चर्चा नहीं हुई, न ही उन्होंने कभी प्रसिद्धि का मोह पकड़ा। लेकिन उनके काम की गहराई से प्रशंसा होनी चाहिए। ऐसे निस्वार्थ सेवकों का कार्य समाज को एक नई दिशा देता है, नई आशा प्रदान करता है।
*अण्णा के कार्य को सलाम:
आज समाज को ऐसे अण्णा जैसे व्यक्तित्वों की आवश्यकता है, जो बिना किसी स्वार्थ के समाज और विद्यार्थियों के लिए काम करते हैं। अण्णा का जीवन यात्रा समाज के प्रति समर्पण का उत्कृष्ट उदाहरण है। उनके शिक्षा कार्य के कारण कई गरीब और जरूरतमंद विद्यार्थियों को शिक्षा की नई संभावना मिली है।
*अण्णा – समाज के नायक:
अण्णा ने अपने साधारण जीवन में जो कार्य किया है, वह वास्तव में प्रेरणादायक है। हमें सभी को उनके कार्य को सलाम करना चाहिए, क्योंकि समाज के लिए निस्वार्थता से काम करने वाले ऐसे लोग ही आने वाली पीढ़ी को एक उज्ज्वल भविष्य की प्रेरणा देते हैं।
पांडुरंग अण्णा, आपकी सेवा का मूल्य शब्दों से परे है। आपका कार्य ही आपका महान योगदान है, और इसके लिए आपको सलाम!
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*"The Pillar of Support for Children – The Selfless Service of Pandurang Anna"*
In everyone's life, there are certain individuals who do not merely inspire but become a source of inspiration themselves. One such extraordinary personality is Pandurang Hari Patil, affectionately known as "Anna." He has dedicated his life to a singular purpose: to assist students on their educational journeys and help them ascend to the peaks of success.
*A Symbol of Service and Dedication
Emerging from the humble village of Adgaon in the Erandol taluka, Pandurang Anna is a living embodiment of social service. Coming from a farming family and having fulfilled his duties as an agricultural worker, Anna resolved to commit himself to the field of education as a civic duty. At the age of 81, his unwavering energy in this endeavor makes it seem as though he has no intention of slowing down!
*Selfless Educational Service
After retirement, Pandurang Anna established a free educational center at the Panchpraneshwar Temple in Kasoda. Every day, 100 to 110 students come to him for guidance in preparing for Navodaya and scholarship exams, as well as various competitive tests. Anna’s genuine passion for education is his greatest asset. Despite lacking a formal academic background, he imparts knowledge drawn from his life experiences. Thanks to his teachings, countless students pass their examinations each year.
* Anna’s True Reward
Anna has never accepted any financial assistance for his educational work. His endeavors are purely selfless. He expects no awards and seeks no recognition or prestige! For him, the success of his students is his true fulfillment. The achievements of his students are reflected in their beaming smiles, which serve as his greatest reward.
* An Inspiration to Society
Anna's entire life exemplifies selfless service and dedication. Regardless of how society evolves, his commitment remains unchanged. There has never been widespread discussion about his contributions, nor has he ever sought fame. Yet, his work deserves significant recognition. The efforts of such selfless individuals provide new direction and hope for society.
*A Salute to Anna’s Work
Today, society needs more individuals like Anna, who work for the community and students without any selfish motives. Anna’s life journey is a shining example of dedication to society. His educational efforts have opened new doors for many underprivileged and needy students.
*Anna – The Hero of Society
The work that Anna has accomplished through his simple life is truly inspiring. We must all pay tribute to his efforts, for it is individuals like him who selflessly work for society that ignite the spark of inspiration in the next generation.
Pandurang Anna, the value of your service transcends mere words. Your work is your magnificent contribution, and for that, you deserve our deepest salute!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा