दादासाहेब डॉ. हर्षल माने – शिवसेनेचे दिलदार जिल्हाप्रमुख

दादासाहेब डॉ. हर्षल माने – शिवसेनेचे दिलदार जिल्हाप्रमुख

शिवसेनेच्या उबाठा गटातील जळगाव जिल्हाप्रमुख म्हणून दादासाहेब डॉ. हर्षल माने यांची ओळख एक संयमी, अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणून आहे. शिवसैनिकांना त्यांचा आधार, मार्गदर्शन आणि प्रेम मिळतंय, ते त्यांच्याचं व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब आहे.

दादासाहेब हे दिलदार माणूस, हक्काचा माणूस, आणि सोबतच शिवसेनेच्या विचारधारेचे एक निस्सीम समर्थक आहेत. त्यांच्या सहवासात असताना शांतता, संयम आणि विचारांची गोडी अनुभवायला मिळते. प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्याकडे हक्काने जातो, कारण दादासाहेबांच्या मनात कार्यकर्त्यांबद्दल एक खास आदर आणि आपुलकी आहे.

विशेष म्हणजे, गरज पडली की ते कोणत्याही शंका-कुशंका न घेता मदतीसाठी तत्पर असतात. "आरोळी मारताच होकारा देणारा" अशी त्यांची खास ओळख आहे. शिवसैनिकांना संकटकाळीही त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळतो, आणि ते त्यांच्या शब्दाला साजेसे ठरतात.

आज दादासाहेबांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, त्यांच्या अनुयायांसाठी, आणि जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकासाठी एक प्रेरणादायी दिवस आहे. अशा आपल्या दिलदार, हक्काच्या आणि कर्तृत्ववान नेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

शतशः प्रणाम आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !