गुलाबराव पाटील यांचे पद्मालय येथे गणरायाला साकडे - “माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येवो!”
गुलाबराव पाटील यांचे पद्मालय येथे गणरायाला साकडे - “माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येवो!”
पद्मालय/जळगाव दि. २७: महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयासाठी शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पद्मालय मंदिरात श्री गणेशाच्या चरणी आपल्या विजयाचे साकडे घातले. पद्मालयाच्या पवित्र परिसरात महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. गणरायाच्या पवित्र चरणी गुलाबराव पाटील यांनी साकडे घातले की, “जनतेच्या आशीर्वादाने आणि बाप्पाच्या कृपेने माझा विजय नक्की होईल, आणि राज्यात महायुतीचे सरकार येईल.” या शब्दांत त्यांनी आपला दृढ विश्वास व्यक्त केला.
हे मंदिर अडीच पीठापैकी एक म्हणून मान्यता पावलेले असल्याने गुलाबराव पाटील यांनी येथे दर्शन घेऊन आरती केली आणि प्रचाराचा शुभारंभ केला. सहाव्या वेळेस निवडणूक लढणाऱ्या पाटलांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात केलेल्या विकासकामांवरच ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. “महायुतीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाची गंगा वाहिली असून मतदारसंघातील प्रगती हेच माझ्या प्रचाराचे मुख्य कारण आहे,” असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत महायुतीला राज्यात १८० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी प्रकट केला.
महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रचंड मांदियाळी
या सोहळ्याला महायुतीच्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. भाजपा जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी-कोल्हे, अनिल अडकमोल, पवन सोनवणे आणि तालुक्यातील विविध पदाधिकारी या सर्वांनी कार्यक्रमास हजेरी लावली. गुलाबराव पाटील यांच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांनी “गणपती बाप्पा मोरया,” “गुलाबराव पाटील आगे बढो,” “बाळासाहेबांचा विजय असो,” आणि “महायुतीचा विजय असो” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, पी. एम. पाटील, रवी कापडणे, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, भाजपचे तालुका अध्यक्ष हर्षल चौधरी, हर्षल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद मानकरी, भाजप महिला तालुकाध्यक्ष रेखाताई पाटील, सेनेच्या तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील, भारतीताई चौधरी, जळगावचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, अजय पाटील, दिलीप पोकळे, कैलास चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष राजू सोनवणे, राजेंद्र पाटील, हर्षल पाटील आणि जळगाव-धरणगाव तालुक्यातील अनेक महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमातील उत्साहपूर्ण वातावरणात गुलाबराव पाटील यांनी आपल्या समर्थकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा