या जगात आईवडीलां शिवाय कोणीच मोठं नाही
या जगात आईवडीलां शिवाय कोणीच मोठं नाही
आईवडील या दोन शब्दांमध्येच एक अद्भुत विश्व सामावलेलं आहे. आपलं अस्तित्वच त्यांच्या त्यागातून उभं आहे. आई-वडील आपल्या आयुष्याचे खरे नायक असतात. त्यांच्या अस्तित्वानेच आपलं जीवन उजळून निघतं, त्यांच्याशिवाय कोणाचंच प्रेम, त्याग आणि आधार हे इतकं शुद्ध आणि निरपेक्ष असू शकत नाही.
आई म्हणजे वात्सल्याचा झरा, जिच्या प्रेमाने आपलं बालपण सजतं. तिचं प्रेम इतकं विशाल असतं की त्यात संपूर्ण जगाचं सुख सामावतं. ती आपल्यासाठी जेवढं सहन करते, त्याचा थांग लागत नाही. आपल्या पहिल्या पावलापासून पहिल्या शब्दापर्यंत आईचं हातात असतं. तिच्या कुशीत आपल्याला संपूर्ण विश्वाचं संरक्षण मिळतं. आपलं अस्तित्व तिच्या हृदयाशी जोडलेलं असतं.
वडील म्हणजे हक्काचा आधारस्तंभ, धीराचा स्तंभ. आई जिथे आपलं जीवन फुलवते, तिथे वडील आपल्या आयुष्याची दिशा देतात. कष्टांचं ओझं आपल्या खांद्यावर झेलत, स्वतःचं आयुष्य विसरून आपल्याला उभं करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या कष्टातूनच आपल्याला यश मिळतं, पण ते मात्र कधीही स्वतःच्या श्रेयाची अपेक्षा ठेवत नाहीत. ते आपल्याला जगात उभं करण्यासाठी, मजबूत बनवण्यासाठी कठोर होतात, पण त्यांचं अंतःकरण मात्र प्रेमानं भरलेलं असतं.
आईवडीलांनी केलेला त्याग आणि प्रेमाचं मोल कुठल्याही किमतीत चुकवता येत नाही. आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचं मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपल्याला नवसंजीवनी देतं. त्यांच्या उपदेशांत जीवनाचं खरे रहस्य सामावलेलं असतं. कधीही त्यांनी आपल्या यशात अडथळा आणला नाही; उलट आपल्या यशासाठी स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवल्या. त्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला सुरक्षेचं कवच देतात.
आजच्या धकाधकीच्या काळात अनेकदा आपण त्यांच्या त्यागाला कमी लेखतो, त्यांचं महत्त्व विसरतो. पण खरंतर आपण जिथे कुठे असतो, जसं काही करतो, त्याच्या मुळाशी आईवडीलांची मेहनत, त्यांची कष्ट आणि त्यांचं अतुट प्रेम असतं. त्यांच्या मागे उभं राहून त्यांनी आपल्याला शिकवलं, घडवलं. ते आपल्याला कधीच कमी पडू देत नाहीत, त्यांच्या समर्पणातूनच आपण जीवनात यश मिळवतो.
आईवडीलांच्या पायाशीच खरं सुख आहे, त्यांच्यापासून दूर जाऊन कधीही मनःशांती मिळू शकत नाही. त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतंच मोठं कार्य साध्य होत नाही. त्यांचं प्रेम हेच खरेच अमृत आहे, जे जीवनाला नवीन उमेद आणि आनंद देतं. त्यांच्या सहवासात मिळालेलं शिक्षण, त्यांचा आशीर्वाद हेच आपलं खरं वैभव आहे.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, "या जगात आईवडीलांशिवाय मोठं असं काहीच नाही." त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आयुष्यातलं कुठलंही यश संपादन करू शकतो, त्यांचं प्रेम हेच आपलं खरं खजिना आहे. म्हणूनच त्यांच्या प्रेमाला, त्यांचं महत्त्व कधीच कमी लेखू नका. त्यांच्या चरणीच सगळ्या सुखांचं, समाधानाचं, आणि यशाचं मूळ आहे.
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा