कष्टातून घडलेले जीवन: सुनिल हिंमतराव पाटील यांची प्रेरणादायी कथा
कष्टातून घडलेले जीवन: सुनिल हिंमतराव पाटील यांची प्रेरणादायी कथा
सामान्य परिस्थितीतून असामान्य यशाचा डोंगर चढणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे फारच दुर्मिळ असतात,आणि त्यांपैकी एक म्हणजे सुनिल हिंमतराव पाटील.टिटवी,तालुका पारोळा या गावातील एका साध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या उपशिक्षकाचे जीवन म्हणजे कष्ट,जिद्द,आणि साधेपणाचा उत्तम आदर्श होय.
सुनिल पाटील यांचे वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत.घरची परिस्थिती अत्यंत साधी असल्याने,लहान वयातच त्यांना आपल्या जबाबदाऱ्या समजल्या.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी श्रमाला सुरुवात केली. शिक्षणात कधीही कसूर न करता त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर आपले शिक्षण पूर्ण केले. आई-वडिलांच्या कष्टांचे दुःख पाहून त्यांच्या बालमनात एक दृढ विचार पक्का झाला –"आपल्या घराची परिस्थिती बदलायची असेल,तर मेहनती शिवाय पर्याय नाही."
सुनिल पाटील यांच्या जिद्दीचा परिणाम असा झाला की त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.आर्थिक अडचणी, कठीण प्रसंग,आणि शारीरिक थकवा यांवर मात करत त्यांनी शिक्षणाची उंच शिखरे गाठली.आज ते जबाबदार उपशिक्षक म्हणून आपली भूमिका समर्थपणे पार पाडत आहेत.शिक्षण ही समाजाच्या परिवर्तनाची मूलभूत गुरुकिल्ली आहे,आणि ती विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवीन स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
सुनिल पाटील यांच्या यशामागे त्यांच्या अर्धांगिनी शितल ताईच्या मोलाचा वाटा आहे.संसाराच्या गाड्याला खांद्याला खांदा लावून आधार देणाऱ्या त्यांच्या पत्नीने घर आणि समाज यांमध्ये अप्रतिम संतुलन राखले आहे. त्यांच्या घरातील एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तेथे कोणी ही उपाशीपोटी जात नाही. त्यांच्या कुटुंबाचे प्रेम, आदर,आणि आपुलकी हीच खरी संपत्ती आहे.
त्यांचे घर धार्मिकतेने परिपूर्ण आहे.त्यांच्या आईंनी चार धाम यात्रा तर वडिलांनी दोन धाम यात्रा पूर्ण केल्या आहेत.हे त्यांचे कुटुंब श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा जिवंत आदर्श ठरले आहे.
सुनिल पाटील हे केवळ एक शिक्षक नाहीत,तर ग्रामीण भागातील लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्या साधेपणातून आणि कष्टातून त्यांनी दाखवून दिले आहे की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही जिद्द, प्रामाणिकता,आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर यश निश्चित मिळवता येते.
सुनिल पाटील यांना प्रेमाने 'सुनिल आबा' म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या संघर्षपूर्ण प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !
© शब्दांकन: दीपक पवार(संपादक)खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा