स्वर्गीय रामदास नंदाराम मराठे: साधेपणातून तेजस्वी जीवन
स्वर्गीय रामदास नंदाराम मराठे: साधेपणातून तेजस्वी जीवन
बांबरुड बु, तालुका पाचोरा इथले स्वर्गीय रामदास नंदाराम मराठे हे खरंच शिक्षणाच्या चळवळीचं एक सजीव मूर्तिमंत उदाहरण होते. अगदी सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले रामदास मराठे यांचे वडील शिक्षणाचे मोल अगदी चांगलं ओळखत होते. स्वतः अशिक्षित असूनही, आपल्या मुलांनी शिक्षण घ्यावं, जगात काहीतरी बनावं, हा त्यांचा कटाक्ष होता. त्या हातमजुरी करणाऱ्या बापाच्या खांद्यावर शिक्षणाची जबाबदारी होती आणि तो ती साग्रसंगीत निभावत होता. हाच विचार रामदास यांच्या मनात अगदी लहानपणापासून रुजला.
रामदास मराठे यांचं बालपण म्हणजे कष्ट, जिद्द आणि ध्येयवाद यांचा सुरेख मिलाफ. शिक्षणाच्या ओढीमुळे ते रात्री दुसऱ्याच्या घरी काम करायचे, आणि सकाळी शाळेत हजर असायचे. त्यांचे हे अथक कष्ट पाहूनच त्यांना जुनी सातवीची फायनल परीक्षा पास करता आली. शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली, आणि त्यांच्या जीवनातला हा एक सोनेरी क्षण ठरला. ज्या स्वप्नाची त्यांनी लहानपणी कल्पना केली होती, ते स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात आणलं.
शिक्षक म्हणून त्यांनी एक आदर्शच निर्माण केला. साधेपणात प्रामाणिकपणाची मूर्ती असलेल्या रामदास मराठे समाजसेवा करण्यासाठी सदैव तत्पर असायचे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच जीवनाचे धडे देणारा असा हा शिक्षक समाजात एक उदाहरण होता. त्यांनी आपलं जीवन आणि कार्य समाजाच्या भल्यासाठीच खर्च केलं, आणि वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला.
रामदास मराठे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे दोन मुलं—विनायक मराठे आणि राजू मराठे—यांनीही आपापली क्षेत्रं निवडली. विनायक मराठे कृषी सहाय्यक म्हणून समाजसेवा करतात, तर राजू मराठे यांनी व्यापारात आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. वडिलांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेत या दोघांनीही आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे.
रामदास मराठे यांच्या साधेपणातच त्यांचं खरं मोठेपण सामावलं होतं. एका अशिक्षित हातमजूर बापाने घालून दिलेल्या शिकवणीतून शिक्षणाचं दीप पेटवणारा हा थोर शिक्षक समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले. त्यांचा आदर्श आजही मराठे कुटुंबाच्या नात्यात आणि संस्कारात दिसतो, आणि त्यांच्या जीवनाच्या या तेजस्वी वारशाला समाजात एक विशेष मान मिळतो.
©शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा