कृतीतून इतिहास घडवणाऱ्यांचे स्थान


कृतीतून इतिहास घडवणाऱ्यांचे स्थान

आपलं नाव इतिहासात कोरायचं असेल, तर केवळ शब्दांवर अवलंबून राहता येत नाही. अनेक लोक मोठ्या गोष्टी सांगतात, मोठ्या गोष्टींचे स्वप्न पाहतात, पण त्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीतून घडवणारेच खरे इतिहासकार ठरतात. “बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवणे” हेच खरे यश आहे.

शिवाजी महाराजांचं नाव इतिहासात कोरलेलं आहे आणि ते फक्त त्यांच्या शब्दांमुळे नाही, तर त्यांच्या कर्तृत्वामुळे. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी जी शौर्याची आणि संघर्षाची गोष्ट केली, ती केवळ बोलण्यातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली. लोकांनी जे स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात आणलं. त्यांच्या पराक्रमाने आणि क्रियाशीलतेने इतिहास घडवला.

महात्मा गांधीजींचं उदाहरणही तसंच आहे. त्यांचे बोलणं फक्त शब्दांत न रेंगाळता, ते "अहिंसा" ही संकल्पना कृतीत उतरवून दाखवली. त्यांची विचारशक्ती, त्यांचा धाडस आणि समर्पणामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यांनी नुसत्या शब्दांनीच नव्हे, तर आपल्या कृतीद्वारे सर्व जगाला एक नवा मार्ग दाखवला.

आपल्या साध्या जीवनात देखील अशी अनेक उदाहरणं आहेत. एखादा शेतकरी जो कष्ट करून आपल्या शेतात पिकवतो, एक विद्यार्थी जो कठीण परिस्थितीतही शिक्षण घेतो, किंवा एक सामाजिक कार्यकर्ता जो न थांबता लोकांसाठी काम करत राहतो—हे सर्व लोक बोलण्यावर न थांबता, आपल्या कृतीतून जगाला प्रेरणा देतात.

सत्य हेच आहे की बोलणे सोपे आहे, पण त्यापेक्षा कृती करणे हे खूप कठीण. त्यात मेहनत, चिकाटी, त्याग आणि समर्पण लागते. जो पर्यंत आपली कृती आपल्या शब्दांना सिद्ध करत नाही, तोपर्यंत शब्दांना काहीच मूल्य नाही.

जग आपल्याला ऐकायला नक्कीच वेळ देत नाही, पण जेव्हा आपण आपल्या कृतीतून काही तरी सिद्ध करतो, तेव्हा ते आपल्याकडे लक्ष देतात. शब्द हे क्षणिक असतात, पण आपल्या कृतीचा ठसा तो कायम ठेवतो. म्हणूनच, बोलण्याची वेळ संपली की कृतीला सुरुवात करा. कारण इतिहास तेच लोक घडवतात जे "बोलून दाखवण्यापेक्षा" "करून दाखवतात".

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !