"वैभव प्रभाकर महाजन: संघर्षाच्या कडवटातून उगवलेली यशाची शिखर"


"वैभव प्रभाकर महाजन: संघर्षाच्या कडवटातून उगवलेली यशाची शिखर"


वैभव प्रभाकर महाजन हे नाव आज लोकांच्या मनात आदराने घेतले जाते. उत्राण या लहानशा गावातून आपल्या प्रवासाला सुरुवात करून त्यांनी जे कर्तृत्व गाजवलं, ते नक्कीच प्रेरणादायी आहे. साध्या कुटुंबात जन्मलेल्या वैभव यांनी आपल्या जीवनाला एका वेगळ्या मार्गावर नेऊन ठेवले, जिथे संघर्ष होता, पण त्याहून मोठी होती जिद्द आणि स्वप्नं.

लहानपणापासूनच त्यांचं आयुष्य कष्टाचं होतं. प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झालं, आणि इथूनच त्यांच्या जिद्दीची आणि कष्टांची सुरुवात झाली. आयुष्याला नवं वळण देण्यासाठी शिक्षणाची कास धरली, पण नियतीने त्यांच्यावर मोठं संकट ओढवलं. वडिलांच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधारच हरपला. पण त्यांच्या आईच्या हिमतीने आणि भावाच्या पाठींब्याने वैभव यांनी खचून न जाता आयुष्याला सामोरं जाण्याचा निर्धार केला.

कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून त्यांनी बायोटेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. शिक्षणासाठी केलेले कष्ट, घरच्या गरिबीचा सामना करत केलेलं अभ्यासातलं योगदान, हे सगळं त्यांना त्यांच्या स्वप्नांच्या जवळ घेऊन गेलं. शेतीच्या कष्टांशी त्यांचा नेहमीच जवळचा संबंध राहिला, म्हणूनच त्यांच्या कवितांमध्ये शेतकऱ्यांचं दुःख आणि त्यांचा आक्रोश नेहमीच जागा असतो.

वैभव यांचं साहित्य हे त्यांचं खरं आयुष्य आहे. त्यांच्या कवितांमधून व्यक्त होणारा संघर्ष, समाजाच्या वेदना आणि एका निडर मनाचा आवाज हे सगळं आपल्याला जिवंत जाणवतं. “कापसाला भाव कधी?” या त्यांच्या कवितेने राज्यभर खळबळ उडवली. शेतकऱ्यांच्या वेदना त्यांनी इतक्या ताकदीने मांडल्या की या कवितेने थेट महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. यानंतर त्यांच्या “भिडेवाडा” कवितेने तर समाजातील दु:ख आणि लढ्यांना एक नवा आवाज दिला.

पण वैभव फक्त एक कवी नाहीत; ते खऱ्या अर्थाने समाजसेवक आहेत. त्यांच्या शब्दांमध्ये फक्त समस्या मांडण्याचं सामर्थ्य नाही, तर त्या सोडवण्यासाठी प्रेरणा देण्याची ताकद आहे. त्यांच्या पत्नीने त्यांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आधार दिला, प्रेम आणि विश्वासाचं पाठबळ दिलं. त्यांच्या कुटुंबाचं योगदान आणि त्यांच्या स्वतःच्या मेहनतीमुळेच ते आज या ठिकाणी पोहोचले आहेत.

वैभव प्रभाकर महाजन यांचं आयुष्य म्हणजे संघर्षाचं, जिद्दीचं, आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. त्यांच्या प्रवासाने हे सिद्ध केलं आहे की कठीण परिस्थिती कितीही असली, तरीही जिद्द आणि मेहनतीने ती परिस्थिती बदलता येते. त्यांच्या शब्दांनी, त्यांच्या कृत्यांनी, आणि त्यांच्या साध्या, पण महान जीवनाने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

अशा शब्दांचा माध्यमांतून सामान्य जनतेचा आंतरमनाला भिडणाऱ्या कवीला पुढील वाटचालीस शुभेच्छा.....

© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !