"मेहनतीचा विश्वास"
व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भाग ४२
"मेहनतीचा विश्वास"
नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना, अनेकदा असं झालं की अंतिम टप्प्यावर जाऊन संधी निसटली. पण मी कोणालाही दोष दिला नाही. उलट, मी अधिक मेहनतीने तयारी केली. मी स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी सज्ज केलं. लोक म्हणायचे, "तुझ्या नशिबात चांगली नोकरी नाही," पण मी हसत उत्तर द्यायचो, "मेहनतीने ही नशीब घडवलं जातं."
आज जेव्हा मी माझ्या प्रवासाकडे पाहतो, तेव्हा मला जाणवतं की, जर मी नशिबाच्या भरवशावर राहिलो असतो, तर कदाचित मी अजून ही तिथेच असतो, जिथे काही वर्षांपूर्वी होतो. पण मेहनतीने माझं नशीब बदललं.
धीरूभाई अंबानी एका छोट्या खोलीत राहायचे, पण त्यांच्या मेहनतीने त्यांना भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक बनवलं. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे पेपर विकायचे, पण त्यांच्या मेहनतीने त्यांना देशाचा राष्ट्रपती बनवलं. हे सगळे लोक नशिबाच्या आधारावर मोठे झाले नाहीत, तर त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचं नशीब घडवलं.
आज जर तुम्ही कठीण परिस्थितीत असाल, तुम्हाला अपयश आलं असेल, संधी सुटल्या असतील, तरीही हार मानू नका. मेहनतीवर विश्वास ठेवा. यश उशिरा मिळेल, पण मेहनतीचा न्याय नेहमीच योग्य असतो. सुरुवातीला नशिबाने तुमच्यासाठी दरवाजे बंद केले असतील, पण मेहनतीने ती उघडता येतात.
माझा एकच विश्वास आहे—मी नशिबावर नाही, माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवतो!
© शब्दांकन: दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा