पैलवान पांडुरंग धोंडू धोबी: संघर्षातून साकारलेले एक यशस्वी जीवन



पैलवान पांडुरंग धोंडू धोबी: संघर्षातून साकारलेले एक यशस्वी जीवन

माणसाच्या आयुष्यात संघर्ष आणि मेहनत यांचा हातात हात असतो. आयुष्यभर झगडत राहणारे हातच पुढे एखाद्या कलेला किंवा क्षमतेला नवा आकार देतात. अशाच एका मेहनती, साध्या आणि निष्ठावान व्यक्तिमत्त्वाची कहाणी म्हणजे पैलवान पांडुरंग धोंडू धोबी!

एरंडोलच्या एका सर्वसामान्य कुटुंबात पांडुरंग धोंडू धोबी यांचा जन्म झाला. त्यांच्या घरची परिस्थिती साधी होती, पण त्यांचे वडील अपार कष्ट करून शेती आणि वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत होते. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, पण शिक्षणाची गोडी लागलेली असल्याने त्यांनी जुनी चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना त्यांना वडिलांना कामात मदत करावी लागायची.

परंतु, त्यांच्या मनाला मात्र या व्यवसायात अजिबात रुची नव्हती. त्यांना लहानपणापासूनच व्यायामाची आणि कुस्तीची प्रचंड आवड होती. साधारण मुलांना खेळणी हवी असतात, पण पांडुरंग धोंडू धोबी यांना मातीचा गंध हवा होता. हातात कुस्तीपट्ट्या घ्यायच्या होत्या आणि आपल्या ताकदीने आखाडा गाजवायचा होता.

त्यांचा कुस्तीशी असलेला संबंध हा सहज घडलेला नव्हता. त्यांच्या कुस्तीची सुरुवात अगदी बालपणीच्या एका साध्या गोष्टीने झाली – शेव-चिवड्याच्या पुड्यामुळे! लहान वयातच त्यांनी आखाड्यात पाऊल ठेवले आणि आपल्या अफाट मेहनतीने स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली. रोज सकाळी उठून अंगाला तेल लावून, वजन उचलून आखाड्यात कुस्ती खेळण्याची त्यांची जिद्द अविश्वसनीय होती.

एकेकाळी ज्यांना कोणी ओळखत नव्हते, ते हळूहळू तालुक्यात नावारूपाला येऊ लागले. लोक त्यांच्या कुस्तीच्या ताकदीचं वर्णन करायला लागले. त्यांना पाहण्यासाठी गावोगावी मोठमोठ्या पैलवानांची गर्दी व्हायची. त्यांच्या कुस्तीला लोक पैन लावत असत, जणू त्यांच्या ताकदीवर संपूर्ण गावाचा विश्वास होता!

त्यांनी आपल्या काळात अनेक आखाडे गाजवले. त्यांच्या कुस्तीच्या ताकदीची आणि शैलीची साऱ्यांना भुरळ पडली. त्यांचे अंगी असलेले कौशल्य आणि धडाडी हे त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवत होते. आज ते पंच म्हणून ही काम पाहतात आणि अनेक नवोदित पैलवानांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या शिष्य गणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

पांडुरंग धोंडू धोबी हे केवळ एक पैलवान नव्हे, तर एक विचार आहेत, एक प्रेरणा आहेत. त्यांनी मिळवलेली यशाची उंची ही केवळ त्यांच्या मेहनतीमुळेच आहे. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि निष्ठा या तत्त्वांवर त्यांनी आपलं जीवन उभारलं. आज ही त्यांच्या बोलण्यात, वागण्यात, आणि प्रत्येक कृतीत हीच शिस्त दिसून येते.

त्यांच्या या संघर्षमय आणि यशस्वी वाटचालीचा वारसा आता त्यांचे चिरंजीव प्रकाश महाले पुढे नेत आहेत.ते ही सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. त्यांनी वडिलांकडून मिळालेल्या शिकवणीला आपलं ध्येय मानून समाजासाठी झटण्याचा वसा घेतला आहे. गरजू लोकांसाठी ते अनेक सामाजिक कार्ये करतात आणि आपल्या वडिलांच्या कष्टांची परंपरा पुढे नेत आहेत.

पांडुरंग धोंडू धोबी यांचं आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी प्रवास आहे. साध्या घरातून येऊन त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या जीवनाची गोष्ट ऐकली की कोणाला ही आपल्या ध्येयांसाठी पुन्हा नव्याने झगडण्याची ऊर्जा मिळते.

त्यांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ही मेहनत आणि जिद्द यामुळे माणूस स्वतःचं भविष्य घडवू शकतो. त्यांच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष, प्रत्येक यश, आणि त्यांच्या साधेपणाने भारावलेल्या व्यक्तिमत्त्वाने हजारो लोकांना प्रेरित केलं आहे.

आज ही ते आपल्या मातीशी जोडलेले आहेत, आपली संस्कृती जपत आहेत, आणि नव्या पिढीला योग्य मार्ग दाखवत आहेत. त्यांच्या जीवनावर लिहावं तेवढं कमीच आहे – कारण त्यांनी जो संघर्ष केला तो शब्दांपलीकडचा आहे.

"पैलवान पांडुरंग धोंडू धोबी – एक साधा माणूस, पण असामान्य प्रवास!"


© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
 मो.9370165997

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !