सहकाराचं उभं आयुष्य – भाऊसाहेब संजयजी पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
सहकाराचं उभं आयुष्य – भाऊसाहेब संजयजी पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
समाजासाठी अहोरात्र झिजणारी माणसं विरळाच असतात. त्यांचा जन्म केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, तर तो समाजासाठी एक वरदान ठरतो. त्यांच्या विचारसंपत्तीमुळे, कार्यशैलीमुळे आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ते जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. असंच एक प्रेरणादायी नाव म्हणजे भाऊसाहेब संजयजी पवार.
भाऊसाहेबांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे संयम, दूरदृष्टी, कार्यनिष्ठा आणि सातत्याचं मूर्त स्वरूप होय. महाराष्ट्र पणन महासंघाचे विभागीय संचालक, जिल्हा कॉटन मार्केटिंगचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन, जिल्हा दूध फेडरेशनचे संचालक, तसेच श्री क्षेत्र चांदसर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीचे संयोजक अशा विविध जबाबदाऱ्या ते अत्यंत कुशलतेने सांभाळत आहेत. त्यांनी कधीही केवळ पदासाठी राजकारण केले नाही, तर प्रत्येक पदाचा उपयोग समाजकारणासाठी करत, लोककल्याण साधलं.
ते सहकार महर्षी का म्हणवले जातात, याचं उत्तर त्यांच्या कृतीत स्पष्टपणे दिसून येतं. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेलं काम जिल्ह्यासाठी दीपस्तंभ ठरलं आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण अर्थव्यवस्था, दूध उत्पादन, आणि पणन प्रक्रिया या प्रत्येक बाबतीत त्यांनी सखोल विचार करीत दूरदृष्टीने निर्णय घेतले. त्या निर्णयांमुळे अनेक गरजू कुटुंबांना आधार मिळाला आणि त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली.
राजकीय मंचावर कार्यरत असतानाही त्यांनी नेहमीच "सामान्य माणसाची बाजू" घेतली. ते केवळ एक राजकारणी नाहीत, तर एक सच्चे मार्गदर्शक, प्रेमळ मनाचे समाजसेवक आहेत. लोकसभा वा विधानसभेच्या गदारोळापेक्षा त्यांनी गावपातळीवरील सहकार संस्थांवर अधिक विश्वास ठेवला. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेकडो तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांना आधार, आणि समाजाला योग्य दिशा दिली.
त्यांचा मृदू स्वभाव, मोजक्या शब्दांत मोलाची मांडणी, प्रत्येक कामात काटेकोरपणा आणि निर्णयांतील स्पष्टता — या गुणांमुळे भाऊसाहेब जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. पायी वारीचे संयोजक म्हणून त्यांनी आध्यात्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा उत्तम संगम घडवून आणला आहे.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फक्त शुभेच्छा द्यायच्या नाहीत, तर त्यांच्या समाजकार्याला कृतज्ञतेने वंदन करावं लागतं. त्यांनी केलेल्या प्रत्येक सामाजिक कार्यासाठी मन:पूर्वक धन्यवाद द्यायचे आहेत.
भाऊसाहेब, तुम्ही आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्थान आहात. तुमचं नेतृत्व, तुमचं मार्गदर्शन आणि समाजासाठी असलेली आपुलकी आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अधिक बळ देवो, जेणेकरून आपण समाजसेवेचा दीप असेच प्रज्वलित ठेवू शकता.
आपलं सहकारप्रेम आणि समाजकार्य अखंड तेजस्वी राहो!
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
मो.9370165997
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा