जितेंद्र अहिरे – विश्वासाचे आणि माणुसकीचे प्रतीक

जितेंद्र अहिरे – विश्वासाचे आणि माणुसकीचे प्रतीक

सार्वे (ता. धरणगाव) या गावाचे नाव घेताच नजरे समोर उभे राहते एक शांत, संयमी, अभ्यासू आणि विचारशील व्यक्तिमत्त्व – श्री. जितेंद्र अहिरे. पोलीस पाटील म्हणून त्यांच्यावर असलेली जबाबदारी ते केवळ अधिकार म्हणून न पेलता, एक सेवाभाव म्हणून पार पाडतात. कारण जितेंद्र भाऊ हे केवळ पदावरचे व्यक्ती नाहीत, तर एक विचारधारा आहेत, एक आश्वासक सावली आहेत, आणि गावकऱ्यांच्या मनातील खंबीर आधारवड आहेत.

त्यांचे बोलणे मृदू, वागणे समंजस आणि प्रत्येक कृती समाजहितासाठी प्रेरित असते. सत्तेचा अहंकार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वाट्याला कधीच आला नाही, कारण त्यांच्या जीवनाची पायवाट माणुसकीवर आधारित आहे. त्यांच्या स्वभावात गर्व किंवा आक्रस्ताळेपणा नाही, आहे ती केवळ समाजाप्रती असलेली तळमळ आणि प्रेमळ मन.

गावातील वाद मिटवायचे असोत, कोणाचे घरकुल रखडलेले असो, मुलांच्या शिक्षणासाठी मदत करायची असो, किंवा एखाद्या गरजू कुटुंबाला आधार द्यायचा असो जितेंद्र भाऊ नेहमीच पुढाकार घेतात. कोणी ही अडचणीत असले, तरी त्यांच्या दाराशी गेले की वाट सापडते, आणि मनाला दिलासा मिळतो. त्यांचे मार्गदर्शन म्हणजे केवळ सल्ला नसतो, तर त्यात अनुभव असतो, आपुलकी असते आणि आशेचा किरण असतो.

गावातील कार्यक्रमांमध्ये ते जेव्हा हसतमुखाने सहभागी होतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर कृत्रिमपणा नसतो. असतो तो केवळ आपुलकीचा ओलावा. आजच्या या स्पर्धात्मक आणि स्वार्थी युगात, माणूस माणसापासून दूर जात असताना, जितेंद्र भाऊं सारखा समजून घेणारा, जवळ घेणारा, आणि खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा व्यक्ती लाभणे हे खरोखरच भाग्याचे लक्षण आहे.

त्यांनी केवळ गावात न्याय नितीने काम केले नाही, तर माणुसकीचा खरा अर्थ ही लोकांना शिकवला. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांशी संवाद साधत, त्यांनी अनेकांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागवला. अशा असंख्य ह्रदयांना दिलासा देणाऱ्या, डोळ्यांत आशेचे नवे स्वप्न जागवणाऱ्या जितेंद्र भाऊंना त्यांच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक आणि हृदयस्पर्शी शुभेच्छा!

आजचा दिवस त्यांच्या सन्मानाचा, त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या माणूसपणाचा उत्सव आहे. त्यांच्या या जन्मदिनी, ईश्वरचरणी हीच प्रार्थना की त्यांना उत्तम आरोग्य लाभो, यशाची नवी शिखरे गाठता येवोत, आणि ते असेच सर्वांच्या मनामध्ये “आपले भाऊ” म्हणून वावरत राहावेत.

जितेंद्र भाऊ, तुमच्यासारखी माणसं हीच खऱ्या अर्थाने गावाची शान असतात.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !