लोकनायक वासुदेव पाटील : निष्ठेचा दीपस्तंभ


लोकनायक वासुदेव पाटील : निष्ठेचा दीपस्तंभ

गावाकडच्या मातीला एक वेगळीच ओल असते. या मातीतून उगम पावलेली काही माणसं अशी असतात, ज्यांचं संपूर्ण जीवनच प्रेरणादायी ठरतं. अशाच मातीतील एरंडोल तालुक्यातल्या जवखेडेसिम या छोट्याशा गावात जन्मले एक थोर व्यक्तिमत्त्व–वासुदेव सुभाष पाटील.

त्यांचं बालपण संघर्षमय होतं. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या वासुदेवजींनी अवघ्या सोळाव्या वर्षीच पक्षाचा भगवा हातात घेतला. जेव्हा इतर मुलं खेळण्यात रमलेली असायची, तेव्हा वासुदेवजींनी लोकसेवेचा मार्ग स्वीकारला. बालशिवसैनिक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज ‘लोकनायक’ या सन्मानापर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास केवळ राजकीय नाही, तर सामाजिक, भावनिक आणि निष्ठेचा आहे.

शिवसेनेच्या कार्यात त्यांनी नेहमीच आघाडी घेतली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी जीव ओतून प्रचार केला, मतांचं अचूक गणित लावलं आणि विजय मिळवून दिला. त्यांच्या उपस्थितीचा प्रचारात विशेष प्रभाव असायचा जणू काही विजयाची हमीच! प्रत्येक प्रचारात त्यांनी पक्षाची विचारधारा, बाळासाहेब ठाकरे यांची तत्त्वं आणि जनतेसाठीची निःस्वार्थ तळमळ लोकांपर्यंत पोहोचवली.

वासुदेव पाटील यांचं राजकारण ही केवळ सत्ता मिळवण्याची हाव नव्हती, तर लोकांची सेवा करण्याची निष्ठा होती. त्यामुळेच गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत २००७ साली ग्रामपंचायत सदस्य व.  २०१० सारी त्यांना सरपंचपद बहाल केलं. त्यांच्या कार्यकाळात गावाचा चेहरामोहराच बदलला. अनेक विकास योजना गावात आणण्यात त्यांनी पुढाकार घेतला. पाणी योजना, रस्त्यांचं काँक्रिटीकरण, व्यापारी संकुल, घरकूल योजना, शाळा खोल्या... प्रत्येक कामात प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी दिसून आली.

खास उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या पत्नी सरिताताई पाटील यांना ही गावकऱ्यांनी लोकसेवेसाठी निवडून दिलं. ही निवडणूक म्हणजे केवळ राजकीय विजय नव्हता, तर त्यांच्या कुटुंबातील लोकसेवेच्या परंपरेला मिळालेलं मान्यतापत्र होतं. मतदारसंघ पुनर्रचनेच्या काळात अनेक आव्हानं उभी राहिली, तरी त्यांनी पक्षाशी निष्ठा कायम ठेवली. अनेक राजकीय वादळं येऊन गेली, प्रवाह बदलले, तरी ही वासुदेव पाटील आपल्या मार्गावर ठाम उभे राहिले.

माजी आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांची योग्य दखल घेत त्यांना तालुकाप्रमुखपद बहाल केलं. त्यानंतर आमदार अमोलदादा पाटील यांच्या सोबत काम करत त्यांनी जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारीही सक्षमपणे पार पाडली. कुठे ही गाजावाजा नाही, आत्मप्रशंसा नाही. फक्त सातत्यपूर्ण कार्य. गावोगावी फिरून पक्षाचं विचारधारा रुजवत त्यांनी पक्षाची मुळे अधिक भक्कम केली.

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार अमोलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनात वासुदेव पाटील गावागावांमध्ये शिवसेनेचा झेंडा अभिमानाने फडकवत आहेत. सामान्य माणसाच्या दारापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचं कार्य त्यांनी पार पाडलं आहे. त्यांचं नाव केवळ राजकीय परिचयापुरतं मर्यादित न राहता, आज लोकांच्या मनात खोलवर कोरलेलं विश्वासाचं प्रतीक बनलं आहे.

त्यांच्या कार्यप्रवासातील सर्वोच्च क्षण म्हणजे लोकमत 'लोकनायक' पुरस्कार मिळणं. हा पुरस्कार म्हणजे केवळ पदाचा गौरव नव्हे, तर त्यांच्या त्यागाचं, अपार मेहनतीचं आणि जनतेच्या हितासाठी दिलेल्या झिजेचं मूर्त मानचिन्ह आहे.

या गौरवाच्या प्रसंगी ही वासुदेव पाटील स्वतःबद्दल बोलत नाहीत. ते सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतात. माजी आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या बद्दल, ज्यांनी त्यांच्या गुणांना दिशा दिली; आणि आमदार अमोलदादा पाटील यांच्याबद्दल, ज्यांनी जिल्हाप्रमुखपदाची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली. ही विनम्रता हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.

हा सन्मान ते स्वतःसाठी मानत नाहीत, तर प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक कार्यकर्ता आणि गावातील सामान्य जनतेसाठी मानतात. त्यांच्या शब्दांत "हे यश माझं नाही, हे आपलं आहे!"

ही भावना आणि ही दृष्टिकोनच त्यांना खरे लोकनायक बनवतात.

त्यांच्या जीवनप्रवासात आपल्याला दिसतात.नेतृत्व, संघर्ष, निष्ठा, सेवा आणि माणुसकी. आजच्या तरुण पिढीसाठी त्यांचा प्रवास हा प्रेरणादायी मार्गदर्शक ठरावा, 

शिवसेनेच्या भगव्या ध्वजासोबत झुंजणाऱ्या, जनतेसाठी अहोरात्र झिजणाऱ्या, आणि निष्ठेच्या वाटेवर कधी ही डगमगू न शकणाऱ्या या थोर पुरुषाला–वासुदेव सुभाष पाटील यांना, आमचा मन:पूर्वक सलाम! 

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !