शांत,संयमी व्यक्तिमत्त्व : नानासाहेब सूरेश सिताराम चौधरी


शांत,संयमी व्यक्तिमत्त्व : नानासाहेब सूरेश सिताराम चौधरी

धरणगाव नगरीच्या मातीला प्रतिष्ठेचं वलय प्राप्त करून देणाऱ्या काही व्यक्तींमधील एक अत्यंत आदरणीय, सुसंस्कृत आणि सर्वस्पर्शी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. नानासाहेब सूरेश सिताराम चौधरी.

त्यांचा चेहरा जितका शांत, तितकंच त्यांचं संपूर्ण अस्तित्व संयमी. कोणता ही प्रसंग असो अडचणींचा काळ असो किंवा आनंदाचा क्षण नानासाहेब नेहमीच स्थिर, संतुलित आणि मितभाषी राहतात. त्यांचे शब्द मोजके असले, तरी त्यामागचं विचारधन आणि माणुसकीचा गहिरा अर्थ प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जातो.

धरणगावचे माजी नगराध्यक्ष, यशस्वी उद्योगपती, जी.एस. ग्रुपचे संचालक, श्री जी जिनिंगचे संचालक तसेच गुरूदत्त पतसंस्थेचे चेअरमन अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कार्यक्षमतेने पार पाडल्या आहेत. केवळ पद किंवा हुद्दे नव्हे, तर प्रत्येक भूमिकेतून त्यांनी मूल्यांची, शिस्तीची आणि पारदर्शकतेची प्रेरणा दिली आहे.

माणूस मोठा तोच, जो स्वतःच्या यशात इतरांचं ही यश पाहतो. नानासाहेब यांचं आयुष्य हे या वाक्याचं मूर्त स्वरूप आहे. समाजात वावरताना त्यांची नम्रता, प्रत्येकाशी ठेवलेला आत्मीय संबंध आणि कुणाच्या ही सुख-दुःखात सामील होण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.

त्यांचं जीवन केवळ स्वतःपुरतं मर्यादित न राहता, संपूर्ण गाव, समाज आणि गरजूंच्या हितासाठी समर्पित आहे. कधी एखाद्याच्या डोळ्यांतून आशा हरवलेली असते, आणि अशा वेळी नानासाहेब त्या माणसासमोर विश्वासाचा उजेड घेऊन उभे राहतात. कुणालाही न कळता मदतीचा हात पुढे करणारे, मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवावं असं माणूसपण जपणारे.

त्यांचे बोलणे कमी असले, तरी डोळ्यांतून अनुभव, सुसंस्कार आणि आत्मविश्वासाची झळक स्पष्ट दिसते.
ते शांत आहेत, परंतु त्यांच्या सान्निध्यात एक प्रकारची उब, आधार आणि स्थैर्य नक्कीच जाणवतं.ते संयमी आहेत, पण योग्य वेळी निर्णय घेण्याचं त्यांचं भान आणि धाडस अद्वितीय आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, संपूर्ण धरणगाव नगरी, त्यांच्या सहकाऱ्यांचं, कुटुंबियांचं आणि तमाम हितचिंतकांचं मन कृतज्ञतेने भरून आलं आहे. कारण त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा इतरांच्या हितासाठीच जगलेला आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचं आयुष्य हे केवळ "वाढदिवस" साजरं करावं असं नसून, ते संपूर्ण समाजासाठी एक ‘प्रेरणादायी सण’ ठरतो.

आदरणीय नानासाहेब,आपल्या शांत, संयमी, विवेकी आणि विशाल व्यक्तिमत्त्वासाठी कोटी कोटी प्रणाम!
आपल्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि सदैव प्रेरणादायी मार्गदर्शनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !