"संघर्षातून उभं राहिलेलं दीपस्तंभ – अनिल महाजन"
"संघर्षातून उभं राहिलेलं दीपस्तंभ – अनिल महाजन"
एरंडोलच्या मातीमध्ये रुजलेलं एक स्वप्न शांत, साधं आणि माणुसकीच्या गंधाने भारलेलं. या मातीच्या कुशीत, एका सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला अनिल केशव महाजन त्यांचे वडील शेती करणारे, हातात कुदळ, कपाळावर घाम आणि मनात फक्त एक इच्छा आपल्या मुलाचं आयुष्य आपल्या पेक्षा थोडं अधिक चांगलं व्हावं.
परिस्थिती फारशी साथ देणारी नव्हती. शिक्षण अपुरं राहिलं, पण शिकण्याची आणि उभं राहण्याची जिद्द कधी ही मागे फिरली नाही. कारण, जे शालेय शिक्षणात मिळालं नाही, ते आयुष्याच्या शाळेत त्यांनी दररोज शिकून घेतलं.
आज जेव्हा आपण श्री मंगलम स्टाईल्स या नावानं एरंडोलमध्ये विश्वासाचं प्रतीक पाहतो, तेव्हा त्या मागे उभं असतं. एका माणसाचं आयुष्यभराचं प्रामाणिक श्रम, संघर्ष आणि माणुसकीचं बळ. हे यश कुठल्या ही राजकीय किंवा आर्थिक पाठबळावर उभं राहिलेलं नाही, हे उभं राहिलंय फक्त आणि फक्त मेहनतीच्या आधारावर.
अनिलभाऊ महाजन म्हणजे केवळ व्यवसायिक नाहीत, ते माणसांना समजून घेणारे, त्यांना मदतीचा हात देणारे, आणि प्रत्येकाला आपल्या यशाच्या प्रवासात सामावून घेणारे एक दिलदार मनाचे माणूस आहेत. गरिबांच्या डोळ्यातली ओल पाहून हृदय पाझरावं, अशा संवेदनशीलतेनं भरलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व आज ही तितकंच जमिनीवर आहे, जसं ते पहिल्या दिवशी होतं.
ते कधीच "मी" या शब्दात अडकत नाहीत. त्यांच्या बोलण्यात "आपण", "आपलं", आणि "आपल्या माणसांचं" हेच शब्द सतत असतात. एरंडोलसारख्या गावात, जेव्हा माणूस यशस्वी होतो, तेव्हा तो एकटाच उंच होतो. पण अनिल महाजन मात्र स्वतःसोबत अनेक हातांना वर उचलत गेले.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी, केवळ एक व्यावसायिक म्हणून नाही, तर एक "हृदयात माणुसकी राखणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठी" ही शुभेच्छा द्यावीशी वाटते.
अनिलभाऊ, तुमचं आयुष्य हे कित्येकांसाठी एक प्रेरणा आहे.तुमची सादगी, तुमचं कष्टांचं भांडवल, आणि माणसांची माया हीच तुमची खरी संपत्ती आहे.
आज तुमच्या आयुष्याच्या या खास दिवशी,
"हृदयापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"
माझं नाही, तर त्या प्रत्येकाच्या वतीने
ज्यांच्या आयुष्यात तुम्ही एक विश्वासाचं, मदतीचं आणि प्रेमाचं नाव आहात.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा