दिलदार मनाचा दिलदार माणूस दादासाहेब चंद्रशेखर अत्तरदे...!
दिलदार मनाचा दिलदार माणूस दादासाहेब चंद्रशेखर अत्तरदे...! काही व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या तेजाने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करतात. त्यांचं बोलणं, त्यांची वागणूक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं माणुसकीनं ओथंबलेलं हृदय... यामुळेच त्या समाजात एक वेगळी, उठावदार ओळख निर्माण करतात. अशीच एक मनाला भिडणारी, हृदयात स्थान घेणारी, आणि सदैव प्रेरणा देणारी व्यक्ती म्हणजे दादासाहेब चंद्रशेखर अत्तरदे. आज त्यांचा वाढदिवस एक विशेष दिवस. हा दिवस केवळ त्यांच्या जन्माचा आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो त्यांच्या आयुष्याच्या संघर्षमय, समर्पणशील प्रवासाची आठवण करून देणारा आहे. साध्या घरात जन्मलेला हा मुलगा, पुढे भुसावळ नगरीत आपल्या कार्यकर्तृत्वाने, सेवाभावाने आणि मनमिळावूपणाने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतो, ही बाब स्वतःतच खूप काही सांगून जाते. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते म्हणून झाली. मात्र, राजकारण हे त्यांचं केवळ एक माध्यम होतं. लोकांच्या सेवा करण्याचं. भुसावळ नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून कार्य करताना त्यांनी नेहमी जनतेच्या अड...