संगीत आणि गीत मानवी मनाचे अविभाज्य घटक : कवी प्रा.वा.ना.आंधळे


संगीत आणि गीत मानवी मनाचे अविभाज्य घटक : कवी प्रा.वा.ना.आंधळे

धरणगाव : संगीताचा जन्म झाला नसता तर गितंही जन्माला आली नसती.या दोन्ही गोष्टी जन्माला आल्या नसत्या तर मानवी जीवन आणि मानवी मन यांना रुक्षता आली असती.मानवी आयुष्य सकारात्मकतेला मुकलं असतं. असे सांगत संगीताची व गीताची शक्तीस्थाने सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी सप्रमाण कथन केली.काल दि.१०.ऑगस्ट२५रोजी श्री.आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट व स्व.लक्ष्मीकांतजी डेडिया सर शिष्य परिवार आयोजित ,स्व.मास्टरजी लक्ष्मीकांतजी डेडिया स्मृती स्वरांजली तृतीय संगीत महोत्सवाचे उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून बोलत होते.
आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की,वर्तमान काळ हा धकाधकीचा व मोठा स्पर्धेचा असल्यामुळे मनाला सक्षमता आणि सामर्थ्य मिळावे यासाठी संगीत आवश्यक आहे.अनेक आजार त्यातल्या त्यात मानसिक आजारावर संगीत हा यथोचित उपाय आहे.असे सांगत लय, ताल,आरोह अवरोह,नजाकत, यावर भाष्य करीत काही संगीत रागांच्या उदाहरणासह  दोन गीतांच्या सादरीकरणातुन मानवी मनावर होणाऱ्या संस्काराकडे श्रोत्यांचे लक्ष वेधले.
याप्रसंगी व्यासपीठावर  कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अजित डहाळे,प्रतिष्ठित व्यापारी कांतीलाल शेठ डेडिया,प.रा.हायस्कूल सोसायटीचे सचिव डॉ.मिलिंद डहाळे,एल आय सी चे डेव्हलपमेंट ऑफिसर श्री.रावतोळे यांची उपस्थिती होती.
सदर संगीत महोत्सवात व्हायोलिन वादक भूषण चौधरी (हरिद्वार),बासरी वादक योगेश पाटील(एरंडोल),यांनी सोलो आणि समूह वादनाने समारंभाची सुरुवात झाली.सचिन भावसार, सौ.स्वाती भावे, देवा महाजन, सुधीर भावसार,संजय परदेशी,कु.उत्कर्षा भरत चौधरी, राजेश डहाळे, तनय डहाळे, नाना पवार, अहान डहाळे, कु.श्रेया भावे, प्रा.बी.एन.चौधरी, प्रदीप झुंजारराव यांच्या गीत गायनाने चांगलीच रंगत आणली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल जैन यांनी केले.सूत्र संचलन प्रा.ए. आर.पाटील यांनी केले तर आभार प्रतिक जैन यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !