गाव तेथे राष्ट्रवादी' अभियानात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग...!

गाव तेथे राष्ट्रवादी' अभियानात निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग...!


धरणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या "गाव तेथे राष्ट्रवादी" या अभियानाने साळवा-साकरे जि.प. गटात चांगलाच जनसंपर्क साधत जनतेच्या मनात पक्षाचा विचार खोलवर रूजवला. एक गाव, एक विचार, आणि एक ध्येय शरदचंद्र पवार साहेबांचे समाजोन्मुख आणि लोकहितवादी विचार गावोगाव पोहोचवण्याचा या अभियानाचा मुख्य हेतू होता.

ही केवळ राजकीय चळवळ नव्हती, ही होती एक विचारांची यात्रा. या यात्रेची सुरुवात झाली ती समतेचे प्रतीक असलेल्या पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाने आणि छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादनाने. ही सुरुवातच जणू या अभियानाच्या मूल्यांचा आरंभ ठरली.

अभियान अंतर्गत बांभोरी, भवरखेडे, बोरगाव, जांभोरा, सारवे, बाभळे, धानोरा, गारखेडा, भोणे, रोटवद, नांदेड, साळवा, निशाणे, पिंपळे अशा गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जुने जाणते, निष्ठावंत कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत, त्यांचे अनुभव ऐकले गेले आणि पक्ष संघटनेच्या मजबुतीसाठी मोलाचे मार्गदर्शन घेण्यात आले.

माजी युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांनी शरद पवार साहेबांचे कृषी धोरण, महिला धोरण, शैक्षणिक आणि युवक विकास यासारख्या विषयांवर सविस्तर माहिती देत पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवला. त्याचबरोबर मतदारसंघातील प्रश्नांचाही सखोल अभ्यास करण्यात आला आणि यावर कार्यवाहीचा निर्धार करण्यात आला.

अनेक गावांतील कार्यकर्ते यावेळी उत्साहाने सहभागी झाले. धर्मा आबा, अशोक पाटील, भाईदास पाटील, संभाजी आबा, रविंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, अनिल पाटील, पुरुषोत्तम पाटील, नरेंद्र पाटील, गोरख पाटील, विनायक पाटील, परेश गुजर, सुनिल गुजर, रमेश सपकाळे, रघुनाथ रामराव पाटील, जितेंद्र अहिरे, नाना मरसाळे, ईश्वर भिल, वाल्मिक पाटील, रावा तात्या, किशोर पाटील, गणेश महाजन, रवि महाजन, मकरध्वज पवार, सुनिल पाटील, दिपक पाटील, राजेश अत्तरदे, बाळू भारंभे, किरण सोनवणे, राजाराम गुरुजी, श्रावण गुरुजी, दिलीप बापू, कपिल पाटील, सुभाष पाटील, समाधान पाटील, पिंटू पाटील, तुकाराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सोनू पाटील, जिजाबराव पाटील, गणेश पाटील, सुरेश पाटील, प्रकाश रणसिंग, काशिनाथ रणसिंग, संजय रणसिंग, रविंद्र रणसिंग, सुहालाल मोरे, शांताराम मोरे या सर्वांनी आपली ताकद आणि निष्ठा उघडपणे दाखवून दिली.

संपर्क अभियानात तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी सरपंच उज्वल पाटील, एकनाथ पाटील, मोहीत पवार, नारायण चौधरी, ओंकार माळी, राजू धनगर, नंदू धनगर, सुरेश महाजन, भैय्या पाटील, पी. डी. नाना, भगवान शिंदे, आणि शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील हे पदाधिकारीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले की, "शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षातून हजारो नेते घडले. हे नेतृत्व तयार होण्यामागे पक्ष संघटनेतील काटेकोर बांधणी आणि विचारांची पाळेमुळे आहेत. आज आपण जे कार्य करतो आहोत, तेच उद्याचे भविष्य ठरवेल."

संजय पाटील, तालुकाध्यक्ष, यांनी सांगितले की, "साळवा-साकरे गटातील युवकांनी गावागावात पक्षाच्या शाखा उभ्या करून समाजातील प्रश्नांवर ठाम, परंतु विधायक भूमिका घ्यावी. हीच खरी राष्ट्रवादी विचारधारा आहे."

"गाव तेथे राष्ट्रवादी" हे केवळ एक ब्रीदवाक्य नव्हे, तर ही आहे एक जनतेच्या मनाला भिडणारी चळवळ जी विचारांनी पेटलेली, निष्ठेने चाललेली आणि समाजबदलाची जाणीव घेऊन उभी राहिलेली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !