आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात
आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय पिंप्री येथे स्वातंत्र्य दिवस उत्साहात
प्रतिनिधी
पिंप्री खुर्द येथील आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आदर्श बालक विद्या मंदिर प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न झाला
सर्वप्रथम पिंप्री गावातून विद्यार्थ्यांची मिरवणूक निघाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मधुकर रामजी चौधरी हे होते तर ध्वजारोहण सेवानिवृत्त सब इन्स्पेक्टर विद्याधर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद चौधरी संस्थेचे सचिव विनोद चौधरी संचालिका यशोदाताई चौधरी आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली चौधरी भोद येथील सरपंच विजय पाटील संदीप पाटील सेवानिवृत्त शिक्षक उमाकांत बोरसे पिंप्री खुर्दचे पोलीस पाटील गोपाल बडगुजर माजी सरपंच यशवंत चौधरी व पालक वर्ग उपस्थित होते
विद्यार्थ्यांनी मनोगतातून आपल्या देशावर कृतज्ञता व्यक्त केली तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नृत्याविष्कार माध्यमातून विविध देशभक्तीपर गीतांनी उपस्थित मान्यवर यांचे लक्ष वेधले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व युनिटचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले
सूत्रसंचालन सतिष शिंदे यांनी तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा