वाळू डम्पर अजून किती लोकांचा बळी घेणार.....?
वाळू डम्पर अजून किती लोकांचा बळी घेणार.....? एक शांत खेडेगाव. सकाळचे आठ वाजत आलेले. एका चिमुकल्या मुलाने शाळेची पिशवी पाठीवर घेतली आहे. तोंडात पोळीचा शेवटचा घास आहे आणि आईच्या "जपून जा रे" या काळजीने ओथंबलेल्या शब्दांना तो डोळ्यांनीच उत्तर देतो. गावातील रस्ता ओळखीचा, माणसंही परिचयाचीच. पण या रस्त्यावरून अचानक धावून येतो एक भरधाव वाळू डम्पर — धूळ उडवत, भीषण आवाज करत, कोणत्याही वाहतूक नियमांना न जुमानता, जणू काही माणसांना चिरडणेच त्याचं उद्दिष्ट आहे. क्षणात सगळं थांबून जातं. एक मोठा आवाज, एक धक्का, आणि एका घराचे जगणेच संपते.आईच्या तोंडून निघालेला "जपून जा" हा वाक्यांश तिच्या आठवणींमध्ये अखेरचा ठरतो.आणि त्या मुलाचे पाय जे परत यायचेच होते. ते आता केवळ आठवणीतच उरतात. हे चित्र आता नित्याचं झालं आहे. रोज कुठल्या ना कुठल्या गावात, शहरात, रस्त्यावर, अशाच दुर्घटना घडतात. फरक असतो तो फक्त मृताच्या नावात. मृत्यू मात्र सारखाच असतो. वेदनादायी, निर्दयी आणि आयुष्यभराचं दुःख देणारा. वाळू डम्परचं प्रकरण केवळ वाहतुकीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही.हा प्रश्न आहे. माणुसकीचा.हा ...