दिलदार मनाचा माणूस परेशभाऊ गुजर...!


दिलदार मनाचा माणूस परेशभाऊ गुजर...!

माणुसकी हीच खरी श्रीमंती असते, आणि ज्या माणसाच्या मनात ही श्रीमंती ओसंडून वाहते, तो म्हणजेच श्री. परेशभाऊ गुजर. धरणगाव युवक तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख असली, तरी त्यांचं खऱ्या अर्थाने मोठेपण त्यांच्या दिलदार मनात दडलेलं आहे.

आज त्यांच्या वाढदिवसाच्या शुभक्षणी, त्यांच्या गुणांचं आणि कार्याचं स्मरण करणं म्हणजे खरंतर एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करणं आहे. राजकारण, समाजकारण आणि माणुसकी यांचं सुंदर संमेलन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतं. कोणता ही आव नाही, गर्व नाही. पण मनात सगळ्यांना आपलं मानण्याची एक विलक्षण ताकद आहे त्यांच्याकडे.

दिलदार मन म्हणावं तर त्यासाठी मोठं हृदय लागतं. आणि परेशभाऊंचं हृदय खरंच खूप मोठं आहे. कोणती ही मदत लागो, कोणताही प्रसंग असो ते नेहमी पुढे असतात. त्यांच्या डोळ्यातली कणव आणि चेहऱ्यावरचं हास्य हे अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरतं. गरजूंना मदतीचा हात देणं, तरुणांना मार्गदर्शन करणं, आणि ज्येष्ठांचा मान राखणं. ही त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्यं आहेत.

त्यांची राजकीय भूमिका ही सत्तेसाठी नाही, तर सेवेच्या भूमिकेतून सुरू झालेली आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, त्यांनी युवकांसाठी कार्य केलंय, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी नवी दिशा शोधली आहे. त्यांच्या कृतिशील विचारांमुळे तालुक्याच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे.

परेशभाऊंची मैत्री म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. त्यांना एकदा भेटला की माणूस कायमचा त्यांच्या हृदयात घर करतं. त्यांच्या स्वभावात एक असा सहजपणा आहे, की कोणतंही बंधन न वाटता माणूस त्यांच्या जवळ जातो. त्यांचं ऐकणं, समजून घेणं, आणि योग्य सल्ला देणं. ही त्यांची खास शैली आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि अधिक यशासाठी मनःपूर्वक प्रार्थना. त्यांच्या कार्याला, त्यांच्या सेवेला आणि त्यांच्या माणुसकीला कोटी कोटी सलाम.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !