शांततेपलीकडचं नातं....!
शांततेपलीकडचं नातं....!
जो पर्यंत एखादा माणूस रुसतोय, रागावतोय, भांडतोय, अपेक्षा ठेवतोय,नको ती बडबड करतोय.तो पर्यंत तो माणूस आपलाच असतो.
कारण या सगळ्या भावना राग, रुसवा, भांडणं, आणि सततचं बोलणं या त्या व्यक्तीकडूनच येतात,ज्याच्याशी आपलं नातं खऱ्या अर्थाने जिव्हाळ्याचा असतं.ज्याच्या कडून काही अपेक्षा आहेत,त्याच्याकडेच तक्रारीही केल्या जातात.
कोणी आपल्यावर रागावतो,तर ते नातं टिकवण्यासाठीच.भांडणं करतो, कारण संवादाची गरज वाटते.बोलतो, कारण त्याच्या मनात साचलेलं काहीतरी असतं.आणि अपेक्षा ठेवतो, कारण त्याला वाटतं.
"तू माझा आहेस… तू वेगळा नाहीस."
पण…
एक दिवस असा येतो.जेव्हा सगळं अचानक थांबतं…
ना राग, ना रुसवा, ना भांडणं, ना तक्रार.कोणतीच अपेक्षा उरलेली नसते.आणि त्या क्षणाला समजतं.
खरा माणूस आपल्या हातून निसटून गेला आहे.
त्या दिवशी तो माणूस "आपला" राहात नाही.तो तुमच्यात असूनही मनाने फार लांब गेलेला असतो.
ना शब्द, ना भावना फक्त एक शांत नजरेतली निर्विकार झलक.आणि तिथेच, नकळतपणे, नात्याचा अंत होतो…
शांत राहणं ही केवळ समजूतदारी नसते,कधी कधी ती असते.हृदयाच्या खोल थकव्याची, आतल्या मूक वेदनेची साक्ष.
एकेकाळी तुमच्यासाठी आवाज उठवणारा माणूस,
जर आज सगळं गप्पगुमान स्वीकारतो आहे,
तर समजून घ्या.तो आता प्रयत्न करायचं थांबवलंय.
माणूस तेव्हाच बोलणं थांबवतो.जेव्हा त्याला वाटतं.
"माझं म्हणणं ऐकून घेणारं कोणीच उरलेलं नाही."
तो रुसत नाही, कारण त्याला विश्वास उरलेला नसतो की
कोणी त्याला समजून घेईल.तो भांडत नाही, कारण त्याच्या दृष्टीने प्रेम, संवाद सगळं संपून गेलं असतं.
आणि तो अपेक्षाही ठेवत नाही,कारण तो आपल्यातलं स्थान मनातून पुसून टाकतो.
तो गप्प राहतो,दैनंदिन वागणुकीत बदलही करत नाही.
पण आतून, हळूहळू… तुमच्याशी नातं तोडतो.आणि हीच ती वेळ असते.ज्याक्षणी खरा माणूस कायमचा हरवतो.
तो निघून जात नाही,तो ओरडून काही सांगत नाही,
तो तुमच्यावर दोषही ठेवत नाही.फक्त… तुमच्या आयुष्यातून निःशब्दपणे निघून जातो.
❝ जोपर्यंत कोणी रुसतो, रागावतो, बोलतो.तो पर्यंत तुमचं त्याच्याशी असलेलं नातं जिवंत असतं.पण एकदा का तो शांत झाला…तेव्हा समजून घ्या.त्याने तुम्हाला मनातलं स्थान दिलं, आणि तुम्ही ते गमावलं. ❞
प्रत्येक वाद, प्रत्येक राग, प्रत्येक खंत ही प्रेमाचीच वेगवेगळी रूपं असतात.कधीच गृहित धरू नका की
कोणी बोलतंय म्हणजे त्रास देतोय…कदाचित तेच त्यांच्या प्रेमाचं शेवटचं रूप असेल.
एक हरवलेलं नातं, एक न बोलेलं सत्य
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा