साहित्य सम्राटची शब्द गोड दिवाळी कला काव्य फराळाने बहरली.


साहित्य सम्राटची शब्द गोड दिवाळी 
कला काव्य फराळाने बहरली.

सौ.मंदाताई नाईक,प्रा.अरुण बुंदेले,दादासाहेब 
सोनवणे,सौ.अर्चना अष्टूळ,राजेंद्र सगर
श्री विनोद अष्टूळ यांची प्रमुख उपस्थिती.

अमरावती (प्रतिनिधी)
         " साहित्य सम्राट, पुणे ही संस्था शब्द गोड दिवाळी हा नावीन्यपूर्ण उपक्रम चौदा वर्षापासून साजरा करते.शब्द जोडतात आणि तोडतातही त्यामुळे आपण शब्द जपूनच वापरले पाहिजे.दिवाळीच्या फराळामध्ये जसे वेगवेगळ्या चवीचे पदार्थ असतात. त्याप्रमाणे आज सर्व निमंत्रित कवींनी वैविध्यपूर्ण कविता सादर केल्या.चांगलंच करायचं हे उद्दिष्ट ठेवून अष्टुळ मनापासून सातत्याने हा उपक्रम राबवितात. त्यांना व सर्वांनाच दिवाळीच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद." असे प्रतिपादन प्रसिद्ध कवयित्री मंदाताई नाईक यांनी केले.
      त्या साहित्य सम्राट संस्था पुणे आयोजित " कला काव्य फराळाची शब्द गोड दिवाळी " या उपक्रमांतर्गत २११ वे कवी संमेलन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था, सारसबाग, नेहरू स्टेडियम,पुणे येथे दि.२९ ऑक्टोबर २०२५ ला आयोजित केलेल्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रसिद्ध कवयित्री मंदाताई नाईक विचार व्यक्त करीत होत्या.
          कविसंमेलनाच्या अध्यक्षा प्रसिद्ध कवयित्री मंदाताई नाईक,डी.एस.एस माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे, निमंत्रित कवी व प्रमुख पाहुणे अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले (अमरावती ), राजेंद्र सगर ,साहित्य सम्राट संस्थेच्या सचिव अर्चनाताई अष्टुळ,संस्थापक विनोद अष्टूळ होते.  
      प्रमुख पाहुणे निमंत्रित कवी व अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांचा अध्यक्षांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
               " कवी व कवयित्रींचे काव्य नि कलगुणआणि घरी बनविलेला स्वादिष्ट फराळ यांचा एकत्र बसून मनसोक्त आस्वाद घेणे म्हणजे साहित्यसम्राटची ही दरवर्षीची शब्दगोड दिवाळी आहे."असे  विचार  संस्थापक विनोद अष्टुळ यांनी प्रास्ताविकात मांडले. 
          या कविसंमेलनामध्ये प्रमुख अतिथी व निमंत्रित कवी परिवर्तनवादी साहित्यिक व अभंगकार प्रा.अरुण बा.बुंदेले (अमरावती) यांनी त्यांच्या अभंग तरंग या काव्यसंग्रहातील 
" अण्णाभाऊ साठे " या अभंगाचे सुमधूर स्वरात गायन करून अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्याचे रसिकांना दर्शन घडविले.ते अभंगात म्हणाले की,
साहित्य सम्राट।वास्तवाची धार ॥
लेखनीने वार । दंभावर ॥ 
समता नि न्याय।ज्योत संघर्षाची ॥
लेखनी अण्णांची । फकिरात ॥
       कवी श्री दशरथ देविदास दुनघव,हडपसर पुणे. " फराळाचे ताट बोलू लागले " या कवितेत माणुसकी जागृत करताना म्हणाले की, 
" फराळ सर्व खाऊन झाला ।
खूपच होता छान,जपा माणुसकी 
देऊन एकमेकांना मानसन्मान ॥"
          या शब्दगोड दिवाळीच्या कवी संमेलनामध्ये दादासाहेब सोनवणे,कांताभाऊ राठोड, अर्चना अष्टूळ, राम सर्वगोड, नकुसाताई लोखंडे, राहुल भोसले,जनाबापू पुणेकर, जयश्री भोसले,प्रा.डॉ.बी.एन.चव्हाण,छगन वाघचौरे,शिवाजी उराडे, नानाभाऊ माळी,नंदकुमार गुरव,अंजली लाळे,राजेंद्र सगर, अलका जोशी,विजय जाधव, विजय सातपुते, प्रा.बाबासाहेब जाधव, किशोर कसबे,प्रिया दामले, प्रा.आनंद महाजन, चंद्रकांत जोगदंड, जगदीप वनशिव,चंद्रकांत गायकवाड, क्षितिज खरात,बाळू पाटोळे, सुजित रणदिवे आणि विनोद अष्टुळ अशा सर्वांच्या बहारदार कवितांनी व कलागुणांनी रसिकांची मने जिंकली.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सगर तर आभार कांताभाऊ राठोड यांनी मानले. कवी संमेलनाची सांगता दिवाळीच्या गोड फराळाने झाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !