धरणगाव सायकलीस्ट ग्रुप तर्फे चि.तनिष्क देशमुख याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !....
धरणगाव सायकलीस्ट ग्रुप तर्फे चि.तनिष्क देशमुख याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत !....
चि. तनिष्कची बुलढाणा ते स्टॅच्यू ऑफ युनिटी सायकल मोहीम !....
धरणगांव प्रतिनिधी :
धरणगांव - धरणगाव सायकलिस्ट ग्रुप तर्फे बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर शाळेचा इ.५ वी चा विद्यार्थी तनिष्क माधव देशमुख व त्याच्या परिवाराचे धरणगाव शहरात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ स्वागत सत्कार करण्यात आला.
बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी बुलढाणा व सहकार विद्या मंदिर स्कूल बुलढाणाच्या वतीने ऑपरेशन सिंदूर निमित्त बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर ते गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत सायकल मोहीम आयोजित केली आहे. ही मोहीम कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंग, प्रेरणा देवस्थळी यांच्या अक्कलनीय नेतृत्व आणि प्रेरित होऊन ऑपरेशन सिंदूर नारी शक्ती या थीमवर आधारित या प्रवासाची उद्दिष्ट २२ एप्रिल २०२५ च्या आतंकी हमल्यांमध्ये मृत पावलेले २६ भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करणे. महिला सक्षमीकरण लवचिकता तंदुरुस्ती आणि शिस्त यांना प्रोत्साहन देणे आहे व तरुणांना धैर्य आणि दृढ निश्चय स्वीकारण्यास प्रेरित करणे आहे हा संपूर्ण प्रवास इंडियन आर्मीला समर्पित आहे. असे प्रतिपादन तनिष्क देशमुख यांनी केले आहे.
याप्रसंगी छोटा सायकलिष्ट तनिष्क व आई - वडीलांचा स्वागत करताना माळी समाजाचे अध्यक्ष व्ही टी माळी, विश्वस्त कैलास माळी, नगरसेवक शरद कंखरे, भूषण कंखरे, माधवराव धनगर, धरणगांव येथील सायकलिष्ट ग्रुपचे सदस्य प्रा.डॉ.योगेश सुर्यवंशी, प्रा.डॉ. शारदा सुर्यवंशी, शरयू सुर्यवंशी, एस एन कोळी, इशिता कोळी, पी डी पाटील, वेणु पाटील,खुझेमा शाकीर, सौ. सकीना शाकीर, मुस्तफा शाकीर, मुफद्धल बुऱ्हानी यासंह धरणगाव शहरातील पत्रकार बांधव व शहरातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्ही टी माळी सर यांनी तनिष्क चे अभिनंदन व कौतुक केले. ११ वर्षीय तनिष्कचे सायकलींगचे ध्येय कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्यकर्ते कैलास माळी व सायकलीष्ट ग्रुपतर्फे एनर्जि ड्रिंक ,फळे, नाश्ता देण्यात आले.डॉ.योगेश सुर्यवंशी यांनी प्रस्ताविक व सूत्रसंचालन केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा