दुसऱ्यासाठी झेपेल तितकंच देणे....!
दुसऱ्यासाठी झेपेल तितकंच देणे....!
आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काही करण्याची इच्छा ठेवतो. आणि त्या कृतीत कोणताही स्वार्थ नसतो. फक्त एक भावना असते मदत करण्याची, आधार देण्याची, प्रेम देण्याची. कधी कुटुंबासाठी, कधी मित्रांसाठी, कधी इतरांनसाठी… आपण आपल्याकडून जे शक्य आहे तेच देतो.
पण अनेकदा हे निःस्वार्थ प्रयत्न इतरांना समजत नाहीत. आपली साधी मदत, मनापासून केलेली काळजी काही लोकांना विचित्र वाटते. काहीजण आपल्याला वेड्यात मोजतात, काहीजण हसतात."इतके का झटतोस?", "हे का करत आहेस?" अशा प्रश्नांची पर्वा न करता आपण पुढे चालत राहतो.
हेच जीवनाचे खरं ध्येय आहे.दुसऱ्यासाठी जे शक्य आहे ते देणे. आपल्याला पूर्ण देणे शक्य नसते, हे आपण जाणतो; पण जे काही दिले जाते, ते हृदयाने दिले जाते. आपले प्रयत्न, आपली दया, आपले प्रेम कधी कधी एखाद्याच्या आयुष्यात बदल घडवतात, जरी कोणी ते पाहिले किंवा समजले नाही.
जग प्रत्येकाला समजू शकत नाही. पण महत्वाचे म्हणजे, आपण आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक राहतो. आपली निःस्वार्थता,आपले प्रयत्न,आपली मदत हेच खरे सामर्थ्य आहे. दुसऱ्यासाठी करताना झेपेल तितकंच देणे, आणि बाकीच्या गोष्टी लोकांच्या मनावर सोडणे याच्यात खरी शांती आहे.
शेवटी, जे दिले जाते ते आपल्यालाच परत आनंद देते. इतर काय म्हणतात, ते महत्त्वाचे नाही; आपण जे दिले, ते दिले हीच खरी संपत्ती आहे.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा