माणुसकीचं चलतं-बोलतं रूप नामदेवभाऊ मराठे.....!
माणुसकीचं चलतं-बोलतं रूप नामदेवभाऊ मराठे.....!
नामदेवभाऊ मराठे… त्यांच्या नावातच एक ऊब आहे, एक विश्वास आहे. त्यांना पाहिलं की मनात नेहमीच त्या हसऱ्या चेहऱ्याची प्रतिमा उभी राहते. ते हसू म्हणजे फक्त ओठांवरचं नाही, तर मनातून येणारं, समोरच्याला आश्वस्त करून जाणारं. आजच्या धावपळीच्या जगात जिथे प्रत्येक जण स्वतःपुरता मर्यादित झाला आहे, तिथे नामदेवभाऊ मात्र कोणाच्याही हाकेला नेहमी धावून जाणारे, “हो” म्हणत मदतीसाठी तयार होणारे एक अलभ्य रत्न आहेत.
रुग्णालयात कोणतंही काम असो लहान असो किंवा मोठं, सोपं असो किंवा कठीण नामदेवभाऊ नेहमी पहिल्या पावलावर उभे राहून “मी आहे ना” असं सांगणारे. त्यांच्या उपस्थितीत रुग्णापासून ते नातेवाईकां पर्यंत प्रत्येकाला दिलासा मिळतो. त्यांच्या या सहजतेत कुठेही दिखावा नाही,तर माणुसकीच्या निखळ भावनेतून येणारा प्रेमळ स्पर्श आहे. ते ज्यांच्या सोबत असतात, त्यांचं मन आपोआप निर्धास्त होतं.
दिलदारपणा हा शब्द जणू नामदेवभाऊंसाठीच बनवला आहे. ते स्वतःपेक्षा इतरांचा विचार आधी करतात. मित्र म्हणून तर ते सोबत असणार नाहीत.तर कायम पाठीशी उभे राहणारे आहेत.त्यांचा स्वभाव इतका मृदू की कुणाचं मन त्यांनी कधी दुखवलं असेल असं वाटतच नाही. ते सर्वांना घेऊन चालतात, सर्वांची काळजी करतात आणि सर्वांना माणूस म्हणून समान प्रेम देतात.
आज त्यांचा वाढदिवस. हा दिवस म्हणजे फक्त त्यांच्या जन्माचा दिवस नाही, तर अनेकांच्या जीवनात आनंद, मदत, साथ आणि आशा घेऊन येणाऱ्या एका सुंदर व्यक्तीमत्वाचा उत्सव आहे. त्यांच्या आयुष्यात जेवढी चांगुलपणा आहे, तेवढं सौंदर्य त्यांच्या पुढच्या प्रत्येक दिवसातही खुलत राहो. त्यांचं हसू असंच सदैव फुलत राहो, त्यांची मनमिळावू वृत्ती अधिकाधिक बहरत राहो आणि त्यांचं आयुष्य आरोग्य, शांती, प्रेम आणि आनंदाने भरलेलं राहो.
नामदेवभाऊ मराठे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक, हार्दिक, अनंत शुभेच्छा. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच सुंदर, उजळ आणि हृदयस्पर्शी होवो.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा