श्री जगदंब विद्यालय येथे प्रा.अरुण बुंदेलेंची आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला संपन्न
" अभ्यास करताना आत्मविश्वास
व मनाची एकाग्रता आवश्यक "
- प्रा.अरुण बुंदेले
श्री जगदंब विद्यालय येथे प्रा.अरुण बुंदेलेंची
आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला संपन्न
अचलपूर ( प्रातिनिधी )
" विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाच्या आदर्श वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करणे आवश्यक आहे.वाचन करताना मनवाचन,मौनवाचन,नेत्रवाचन, चित्रवाचन या वाचनाच्या प्रकारानुसार वाचन केल्यास वाचन केलेल्या प्रश्नांची उत्तरे दीर्घकाळ लक्षात राहतात. अभ्यासानंतर एका गुणाला ९९ सेकंद याप्रमाणे प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा सराव विद्यार्थ्यांनी करावा.अभ्यास करताना न्यूनगंडाची भावना मनातून काढून आत्मविश्वास जागृत करणे व मनाची एकाग्रता आवश्यक आहे; " असे प्रतिपादन विद्यार्थीप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी केले.
ते श्री जगदंब विणकर शिक्षण संस्था,अचलपूर द्वारा संचालित श्री जगदंब विद्यालय, अचलपूर येथे दि.१० डिसेंबर २०२५ ला कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान द्वारा आयोजित स्वनिर्मित " आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला " हा विद्यार्थ्यांच्या गुणवृद्धिचा कार्यक्रम सादर करताना प्रमुख वक्ते पदावरून विचार व्यक्त करीत होते.
प्रबोधनमालेच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका कु.रजनी हेडाऊ (श्री जगदंब विद्यालय,अचलपूर) होत्या.प्रमुख वक्ते अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले (अध्यक्ष,कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान)तर प्रमुख अतिथी पर्यवेक्षक श्री हितेंद्र नाकिल सर होते.
" विद्यार्थी प्रबोधन मालेच्या ३५ मुद्यातून प्रा.बुंदेले यांनी केले विद्यार्थी प्रबोधन अभ्यासाच्या हमीपत्रासह "
स्वनिर्मित " आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला ",
" परीक्षेला जाता जाता " आणि " मराठी विषयाची आदर्श अध्ययन माला " या विद्यार्थ्यांच्या गुणवृद्धीच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना प्रा.अरुण बुंदेले यांनी कॉपीमुक्त अभियानाचे महत्त्व,वळणदार हस्ताक्षरांचे महत्त्व,शुद्धलेखनचे महत्त्व,पाठांतराचे महत्त्व,आदर्श वाचनाचे महत्त्व सांगून २४ तासाचे नियमित अभ्यासाचे आदर्श वेळापत्रक विद्यार्थ्यांना देऊन त्या वेळापत्रकानुसार अभ्यास कसा करावा?, अभ्यासानंतर प्रश्नांच्या उत्तराचा सराव कसा करावा?,आदर्श उत्तर पत्रिका कशी आखावी व सोडवावी ?,टीव्ही आणि मोबाईलचा त्याग का करावा? अशा अभ्यास विषयक ३५ मुद्द्यांचे विवेचन करून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची जिद्द व चिकाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही विद्यार्थी प्रबोधन मालेत सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विषयात गुणवृद्धीसाठी आदर्श अभ्यास करणार असल्याचे " हमीपत्र " प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रा.बुंदेले यांनी लिहून घेतले.
बॉक्स
" विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण करणारी प्रा.अरुण बुंदेले यांची विद्यार्थी प्रबोधन माला "
अध्यक्ष - कु.रजनी हेडाऊ
" विविध प्रलोभनामुळे आज विद्यार्थी अभ्यासापासून दूर जात आहे.अशावेळी प्रा.बुंदेले यांची " आदर्श विद्यार्थी प्रबोधन माला " विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढविण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.त्यांनी विद्यार्थी प्रबोधन मालेत जे अभ्यासविषयक मार्गदर्शन केले ते विद्यार्थ्यांनी आचरणात आणणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण करणाऱ्या या प्रबोधन मालेला शुभेच्छा देते." असे विचार अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापिका कु.रजनी हेडाऊ यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विद्यार्थी प्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांचा परिचय पर्यवेक्षक श्री.हितेंद्र नाकिल सर यांनी केला.संचालन श्री.रवींद्र गायगोले सर तर आभार
श्री.महेश निर्मळ सर यांनी मानले.
कार्यक्रमाला श्री.निशांत विखार सर,सौ.वर्षा राऊत मॅडम, कु.नेहा भोंडे मॅडम,कु.साक्षी लाड मॅडम,सौ.प्राजक्ता शेरकार मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा