आई कधी न संपणारी माया.....!
आई कधी न संपणारी माया.....!
आज माझा आईचे पाचवे पुण्यस्मरण,
आई…हा शब्द उच्चारताच डोळ्यांत पाणी येतं आणि मन नकळत भरून येतं.आज माझ्या आईचे, स्व. सुंगधाबाई रतन पवार यांचे पाचवे पुण्यस्मरण. पाच वर्षे झाली तरी आई गेली आहे, हे आजही मन मान्य करायला तयार नाही. तिची आठवण आली की डोळे पाणावतात आणि हृदयात एक हळवी कळ उठते. काळ जरी पुढे सरकत असला, तरी आईची जागा मात्र आजही तशीच रिकामी आहे.
आईने आयुष्यभर कुटुंबासाठी झगडत राहिली. स्वतःच्या इच्छा, सुख-दुःख बाजूला ठेवून ती शेवटपर्यंत आमच्यासाठी उभी राहिली. शांत, संयमी स्वभावाची आई कधीच कुणाचं मन दुखावणार नाही, याची ती नेहमी काळजी घ्यायची. कुणाशी कटू शब्द नाहीत, कुणावर राग नाही.फक्त माया, समजूतदारपणा आणि आपुलकी. घरातलं वातावरण तिच्या उपस्थितीने नेहमीच शांत आणि प्रेमळ असायचं.
सर्वांना सोबत घेऊन चालणं ही तिची खास ओळख होती. मतभेद असले तरी नाती जपणं, तुटलेली मने जोडणं आणि घराला एकत्र ठेवणं.हे सगळं ती अगदी सहज करत असे. आईचं अस्तित्व म्हणजे घराचा खरा आधार होता. आज तिचा आवाज ऐकू येत नाही, पण तिचे संस्कार, तिची शिकवण आणि तिचं प्रेम आजही आमच्या प्रत्येक पावलात जाणवतं.
आई, तू आमच्यासोबत नसलीस तरी तुझी आठवण, तुझी माया आणि तुझं आशीर्वादरूपी अस्तित्व आमच्या हृदयात कायम आहे.तू आठवणीत नाहीस, तू तर आमच्या श्वासात आहेस.आई आपणास भावपूर्ण श्रद्धांजली.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा