मातोश्री कै.मैनाबाई बुंदेले एक आदर्श व्यक्तिमत्त्व
मातोश्री कै.मैनाबाई बुंदेले एक आदर्श व्यक्तिमत्त्व
- प्रा.अरुण बुंदेले
मातोश्री कै.मैनाबाई बुंदेले यांचा २७ चा स्मृतिदिन संपन्न
अचलपूर ( प्रतिनिधी )
" मातोश्री कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले यांनी गरिबांची प्रत्यक्ष सेवाभावी वृत्तीने सेवा केली.आईंनी गोरगरिबांना मदत करून अनेकांचे कुटुंब सुखी केले.अशा कुटुंबातील सदस्य दरवर्षी येथे होणाऱ्या कोजागिरी यात्रेला अचलपूरला आई बाबांच्या नावे असलेल्या मंदिरात येऊन आजही आईचे गोडवे गाताना दिसतात,तेव्हा आम्हा मुलांना खूप आनंद होतो.आईने गायन केलेल्या जात्यावरच्या ओव्या ऐकून मी सुद्धा कविता करायला लागलो.आज आईच्या या प्रेरणेतून माझा 'निखारा' आणि 'अभंगतरंग 'हे दोन काव्यसंग्रह व नऊ शैक्षणिक साहित्यिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आईच्या नावे स्थापन केलेल्या प्रतिष्ठान द्वारे आज मी अंध,अपंग, बेघर, मनोरुग्ण,गरीब विद्यार्थी यांना मदत करतो.समाजातील मान्यवरांचा आई-बाबांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करतो . ते आईबाबांच्या प्रेरणामुळे,अशा समाजसेवी - आदर्श व्यक्तिमत्वाला मी सत्ताविसाव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करतो."असे विचार समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
ते कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे आयोजित कै.मैनाबाई बुंदेले व कै. बाबारावजी बुंदेले यांच्या स्मृती प्रित्यर्थ नशिबपुरा,अचलपूर येथे बांधलेल्या मंदिरामध्ये कै. मैनाबाई बुंदेले यांच्या २७ व्या स्मृतीदिनानिमित्त दि.१० डिसेंबर २०२५ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी पदावरून विचार व्यक्त करीत होते.
स्मृतिदिनाचे अध्यक्ष गुरुदेव भक्त गजाननराव धुमाळे माजी एपीआय भगवंतराव बुंदेले,गणेश बुंदेले,प्रा.अरुण बुंदेले,मोहन बुंदेले,दिगंबर खंडारे,सुखदेव धुमाळे,दिलीप शिवदास धुमाळे,आनंद गजाननराव धुमाळे,सौ.संगीता खंडारे,सौ.वनमाला इंगळे, सौ.सुनंदाताई पानझाडे, सौ.सोनूताई धुमाळे,सौ.शुभांगी धुमाळे,पवन धुमाळे, सौ.राणी धुमाळे,स्वप्निल बुंदेले,सौ.अश्विनी बुंदेले होते तर सौ.गोकुळा बुंदेले,श्रीमती कविता बुंदेले,सौ.ज्योती बुंदेले,सौ.सपना बुंदेले,प्रा.रवि मांगे,मुख्याध्यापक विनोद मांगे, सौ.ज्योती मांगे,सौ.ज्योती चापके, कमलाकर चापके,सौ.सारिका नितिन सातपुते,कु.कस्तुरी सातपुते,सचिन बुंदेले,विपिन बुंदेले,मनोज रामभाऊ नासने,दीपाली मनोज नासने,अंश मनोज नासने,
शिव मनोज नासने ,सौ.चंदा तायडे,एकनाथराव तायडे,प्रदीप श्रीकृष्ण डवरे,तुषार श्रीकृष्ण डवरे,गुणवंत चापके सौ.मंदा चापके,राजू कपिले,सुमित कपिले,सौ.सविता कपिले,विजय लांजे यांची उपस्थिती होती.
अध्यक्ष गजाननराव धुमाळे व प्रमुख अतिथी माजी एपीआय भगवंतराव बुंदेले यांनी मनोगतातून मातोश्रीं कै.मैनाबाई बुंदेले यांना २७ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले.
कार्यक्रमाची सांगता 'कै. मैनाबाई बुंदेले ' या स्वरचित अभंग गायनाने प्रा.अरुण बुंदेले यांनी केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा