शब्दांविना बोलणारी माणुसकी.....!


शब्दांविना बोलणारी माणुसकी.....!

या जगात असे अनेक जीव आहेत, ज्यांना शब्दांची देणगी मिळालेली नाही; पण त्यांचे दुःख, वेदना आणि प्रेम मात्र बोलके असते. हीच आहेत मूक दया ज्या आवाजाविना आपल्याला माणुसकीची जाणीव करून देतात.

माणूस आपल्या वेदना शब्दांत मांडू शकतो, मदतीसाठी हाक मारू शकतो. पण मूक जीवांना ते शक्य नसते. भुकेने व्याकुळ झालेले पिल्लू, अपघातात जखमी झालेला प्राणी, पावसात कुडकुडणारा पक्षी हे सर्व आपल्याकडे मदतीची याचना करत असतात, पण न बोलता. त्यांच्या डोळ्यांत प्रश्न असतो.“माझे ही या जगात स्थान नाही का?”
मूक दयांवर होणारी क्रूरता मन सुन्न करणारी आहे. त्यांना मारहाण करणे, हाकलून देणे, जखमी अवस्थेत सोडून देणे.हे सगळे आपण पाहतो, पण अनेकदा दुर्लक्ष करतो. त्यांची वेदना न बोलता सहन करण्याची ताकद आपल्याला आरसा दाखवते. आपण स्वतःला सुजाण म्हणवतो, पण मूक दयांकडे पाहताना आपल्या संवेदना कुठे हरवतात?

मूक दयांचे प्रेम अतिशय निर्मळ असते. ते स्वार्थ ओळखत नाही, फसवणूक जाणत नाही. तुम्ही दिलेल्या एका क्षणाच्या मायेवर ते आयुष्यभर विश्वास ठेवतात. त्यांच्या नजरेतला आधार, शेपटी हलवणारा आनंद, किंवा जवळ येऊन बसलेली शांतता हे सगळे न बोलता व्यक्त झालेले प्रेम आहे.
आज गरज आहे ती दयाळूपणाची. मूक दयांकडे पाहताना “ते आपले नाहीत” असे म्हणण्याऐवजी “ते ही जीव आहेत” ही भावना मनात रुजवण्याची. रस्त्यावरच्या एखाद्या प्राण्याला पाणी देणे, पक्ष्यांसाठी दाणे ठेवणे, जखमी जीवासाठी मदतीचा हात पुढे करणे हीच खरी मूक दया आहे.

कारण जिथे शब्द थांबतात, तिथे माणुसकी बोलायला लागते. आणि जो माणूस मूक दयांचे अश्रू ओळखतो, तोच खऱ्या अर्थाने माणूस ठरतो.

© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सेवा हीच श्रद्धा — नंदू हिरालाल चौधरी यांची गोसेवेची वाटचाल

"मातीपासून दीपस्तंभापर्यंत – प्रा. डॉ. अनंत चौधरी यांची प्रेरणादायी वाटचाल"

संकटांना सामोरे जाण्याची कला !