बोललेले शब्द आणि सोडलेली साथ....!
बोललेले शब्द आणि सोडलेली साथ....!
वेळ… तो थांबत नाही. आज जे आपल्यासोबत आहे, तेच उद्या वेगळं होऊन जाईल. आजच्या क्षणांची गोडी आपण अनुभवतो, पण तोच क्षण काळाच्या ओघात बदलतो, नवे रंग घेऊन येतो. माणसं येतात, जातात; नाती बदलतात, परिस्थिती बदलते… पण काही गोष्टी आहेत ज्या काळाच्या ओघानेही धुसर होत नाहीत.
तुम्ही जे बोललेले शब्द, ते क्षणभरात आले तरी मनावर घर करतात. आनंदात दिलेले हास्य, दुःखात दिलेले आधाराचे शब्द, विश्वासाने दिलेले वचन हे शब्द फक्त ऐकले जात नाहीत, ते हृदयात जिवंत राहतात. आणि ज्या वेळी रागात किंवा विसराने एखादे शब्द उडतात, ती आठवणही काळानं मिटत नाही; ती मनात खोलवर ठसा उमटवते.
साथ… ती फक्त शारीरिक उपस्थिती नाही, ती माणूस आपल्या आयुष्यात किती महत्वाचा होता याची जाणीव आहे. एखाद्या अडचणीच्या क्षणी दिलेली साथ, किंवा नुसती हसत हसत दिलेली वेळ, किंवा अचानक सोडलेली साथ ही सगळी आठवण जिवंत राहते. काही साथ आपल्या जीवनातून निघून गेली तरी ती हृदयात कायम राहते, कधी दुःख देते, कधी स्मित करून जाते.
कदाचित म्हणूनच म्हणतात वेळ बदलतो, पण काही गोष्टी मनात कोरल्या जातात. आजची माया, आजचे शब्द, आजची साथ उद्या केवळ आठवणींच्या रूपात उरतात. आणि त्या आठवणीच आपल्याला शिकवतात की, माणसांचे प्रेम, सोबत आणि शब्दांची किंमत किती महत्त्वाची आहे.
वेळ बदलतो, आयुष्य बदलते, परिस्थिती बदलते…
पण तुम्ही बोललेले शब्द, दिलेली साथ, आणि सोडलेली जागा ही सर्व गोष्टी मनात कायम राहतात, हृदयाला छेडतात, आणि आयुष्याला अर्थ देतात.
© दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा