पोस्ट्स

खोटेपणाच्या गर्दीत सत्याचा प्रकाश...!

इमेज
खोटेपणाच्या गर्दीत सत्याचा प्रकाश...! जगात खोटं बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सत्य बोलणारे लोक अनेकदा एकटे पडतात. सत्य हे नेहमीच सोपे नसते; ते बोलायला धाडस लागतं, स्वीकारायला धैर्य लागतं, आणि टिकवायला संयम लागतो. सत्य बोलणाऱ्या माणसाची वाट कठीण असते. जेव्हा त्याच्या शब्दांमध्ये प्रामाणिकपणा असतो, तेव्हा अनेक वेळा इतरांना ती कडवी वाटते. लोक आपल्याला समजू शकत नाहीत, प्रश्न विचारतात, किंवा आपल्यावर टीका करतात. आणि हळूहळू, सत्य बोलणारा माणूस एकटा पडतो. पण एकटेपणात ही त्याचे अंत:करण शांत असते. खोटं बोलणाऱ्या माणसाची जगण्यात गती असते, पण त्यांना आत्म्याचा शांती कमी मिळते. सत्य बोलणारा जरी समाजात थोडा वेगळा दिसतो, तरी त्याचे शब्द आणि कृती मनाला भिडतात. तो ज्या मार्गावर चालतो, तो मार्ग कठीण असला तरी प्रामाणिकतेचा मार्ग असतो. सत्य बोलणारे लोक जरी कमी असतील, तरी त्यांचा प्रभाव मोठा असतो. एक छोटासा सत्याचा शब्द अनेक खोट्या शब्दांपेक्षा जास्त ताकदवान असतो. एकटी वाट चालत चालत ते आपले धैर्य टिकवतात, आत्म्याची ताकद ओळखतात, आणि जीवनाला अर्थ देतात. जगात सत्य बोलणाऱ्यांची संख्या कम...

वर्दीतील समर्पणाचा विजय चोपडा पोलीस उपविभागाची प्रेरणादायी कामगिरी....!

इमेज
वर्दीतील समर्पणाचा विजय चोपडा पोलीस उपविभागाची प्रेरणादायी कामगिरी....! सामान्य माणसाच्या आयुष्यात “पोलीस” हा शब्द कधी धाक वाटणारा, तर कधी आधार देणारा असतो. पण जेव्हा पोलीस आपली वर्दी केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर समाजसेवेचे व्रत म्हणून परिधान करतात, तेव्हा विश्वास जन्माला येतो. चोपडा पोलीस उपविभागाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सर्वोत्कृष्ट पोलीस उपविभाग हा मान मिळवला, ही केवळ एक प्रशासकीय उपलब्धी नाही.ती लोकांच्या विश्वासावर उमटलेली मोहोर आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या सक्षम, संयमी आणि प्रेरणादायी नेतृत्वाखाली चोपडा शहर, चोपडा ग्रामीण, धरणगाव आणि अडावद येथील प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदाराने आपले कर्तव्य केवळ आदेश म्हणून नाही, तर जबाबदारी म्हणून निभावले. दिवस असो वा रात्र, ऊन असो वा पाऊस कायद्याचे रक्षण करताना स्वतःच्या सुख-दुःखाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या वर्दीधारी माणसांनी समाजासाठी स्वतःला झोकून दिले. गुन्हेगारी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था, नागरिकांशी संवाद, तक्रारींवरील तत्काळ कारवाई आणि मानवी दृष्टिकोनातून दिलेला न्याय या सर्व बाबींमध्ये चोपडा ...

अनुभवातून शहाणपण....!

इमेज
अनुभवातून शहाणपण....! “अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे” हे वाक्य आपण वारंवार उच्चारतो; पण त्यामागचा अर्थ मात्र अनेकदा आपल्या मनापर्यंत पोहोचत नाही. कारण अनुभव शिकवतो असं आपण मान्य करतो, पण तो अनुभव स्वतःचा नसेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहण्याची सवय आपल्यात कमीच असते. दुसऱ्याच्या आयुष्यात घडलेली घटना आपल्याला फक्त ऐकलेली गोष्ट वाटते, जोपर्यंत तिची झळ स्वतःला लागत नाही. समाज हा खरं तर आपल्याला सतत आरसा दाखवत असतो. पण त्या आरशात पाहताना आपण स्वतःला शोधत नाही; उलट इतरांच्या चुका, उणिवा, अपयश यातच आपलं लक्ष अडकतं. कुणी चुकलं की आपण लगेच मत मांडतो, चर्चा करतो, कधी न्यायाधीशासारखे निकालही देतो. मात्र “मी त्या जागी असतो तर?” हा प्रश्न स्वतःला विचारण्याइतकी प्रामाणिकता आपल्यात क्वचितच दिसते. एखादी वेदना जो पर्यंत आपली होत नाही, तो पर्यंत तिचं खरं वजन आपल्याला जाणवत नाही. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचतो, टीव्हीवर चर्चा पाहतो,सोशल मीडियावर प्रतिक्रिया देतो.पण मनाच्या आत काही हलत नाही. कारण सहानुभूतीचा स्पर्श नसतो. जोपर्यंत आपण स्वतःला त्या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करत नाही, तोपर्यंत...

गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्यावर…..!

इमेज
गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्यावर…..! काही नाती अशी असतात, जी जपता-जपता आपणच थकून जातो. सुरुवातीला सगळं सहज असतं.आपण वेळ देतो, मन देतो, भावना देतो… कारण आपल्याला समोरचा आपलासा वाटतो. पण कधीतरी लक्षात येतं की आपलं देणं वाढत जातं, आणि आपली किंमत मात्र कमी होत जाते. आपण जितकं जास्त झुकतो, तितकं समोरच्याला ते आपलं कर्तव्य वाटू लागतं. आपली उपस्थिती सवयीची होते. आपलं नसणं काही फरकच पडत नाही. आपण थांबतो, समजून घेतो, माफ करतो पुन्हा पुन्हा. आणि हळूहळू आपल्या मनात एक प्रश्न उगवतो.मी खरंच महत्त्वाचा आहे का, की फक्त सोयीचा? वेळ, भावना आणि आपुलकी या आयुष्यातल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टी आहेत. त्या कोणाच्या ही हातात सहज देण्यासाठी नसतात. कारण ज्याला तुमच्या वेळेची किंमत कळत नाही, त्याला तुमच्या भावना कधीच समजणार नाहीत. आणि ज्याला तुमच्या उपस्थितीचा सन्मान नाही, त्याच्यासाठी तुम्ही कितीही दिलं, तरी ते कधीच पुरेसं ठरणार नाही. म्हणूनच कुणाला जवळ येऊ देण्याआधी, कुणासाठी स्वतःला झोकून देण्याआधी एक क्षण थांबणं गरजेचं असतं. तो माणूस तुमचं ऐकून घेतो का? तुमच्या भावना जपतो का? तुमच्या शांततेचा ही...

स्वार्थाच्या जगात निस्वार्थ मनं....!

इमेज
स्वार्थाच्या जगात निस्वार्थ मनं....! या जगात खूप माणसं अशी असतात की ज्यांचा स्वभाव कधीच कामापुरता नसतो. ते नात्यांकडे व्यवहार म्हणून पाहत नाहीत. भेटले की हसून भेटणं, मदत करताना मनापासून करणं आणि नातं जोडताना “मला काय मिळेल?” असा हिशोब न ठेवणं ही त्यांच्या स्वभावाची ओळख असते. त्यांची आपुलकी वेळेवर अवलंबून नसते किंवा गरजेपुरती मर्यादित नसते. म्हणूनच अशा माणसांना आयुष्यात थोडं अधिक दुखावलं जातं, थोडं अधिक फसवलं जातं; तरीसुद्धा ते पुन्हा माणसांवर विश्वास ठेवतात. कारण त्यांचा स्वभाव व्यवहाराचा नसून माणुसकीचा असतो. अशा लोकांना अनेकदा “तू खूप चांगला आहेस” असं म्हणत लोक बाजूला होतात. सुरुवातीला गोड बोलणं, जवळ येणं आणि आपुलकी दाखवणं हे सगळं असतं; पण काम झालं की माणसं बदलतात. हे अनुभव मनाला थकवणारे आणि वेदनादायक असतात. मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की ही फसवणूक त्यांच्या चांगुलपणाची हार नसते, तर त्यांच्या समजुतीची सुरुवात असते. या अनुभवांतूनच माणसं ओळखण्याची दृष्टी अधिक स्पष्ट होत जाते. नाती टिकवण्यासाठी हे लोक जे प्रयत्न करतात, ते कुठल्याही प्रकारच्या कमजोरीतून नसतात. ते त्यांच्या आत...

आयुष्यात पैसा कमवा पण…..!

इमेज
आयुष्यात पैसा कमवा पण…..! आयुष्यात पैसा कमवणं आवश्यक आहे. कारण पैसा म्हणजे फक्त सुखसोयी नाहीत, तर आत्मसन्मान, स्वप्नांना बळ आणि जबाबदाऱ्यांची खात्री असते. पण तो कुठून येतो, किती येतो, कसा येतो.हे सगळं प्रत्येकाला सांगत फिरणं शहाणपणाचं नसतं. कारण पैशाबरोबर माणसांच्या नजरा बदलतात, आणि त्या बदललेल्या नजरांमध्ये माणूस हरवू लागतो. आज तुमचे कष्ट लोकांना दिसतात. तुमचा संघर्ष, तुमची धडपड, तुमचं न थकणं सगळं कौतुकास्पद वाटतं. पण उद्या जेव्हा यश तुमच्या दाराशी येतं, तेव्हा तेच कष्ट संशयास्पद वाटू लागतात. “इतकं कसं?” “एवढ्या लवकर कसं?” असे प्रश्न मनात जन्म घेतात. यश दिसू लागतं, पण त्या मागचा संघर्ष अदृश्य होतो. कमाईची माहिती झाली की आपुलकी हळूहळू कमी होते आणि सल्ले वाढू लागतात. कोण कसा खर्च करावा, कुणाला मदत करावी, कुठे गुंतवणूक करावी.हे सगळं सांगणारे अचानक वाढतात. पण या सल्ल्यांमागे काळजीपेक्षा तुलना जास्त असते. काही जण खरोखर प्रेरणा घेतात, पण बरेच जण स्पर्धा आणि हेवा मनात साठवून ठेवतात. तुमचं यश त्यांच्या अस्वस्थतेचं कारण ठरतं. पैशाची गोष्ट उघड झाली की नात्यांत हिशेब शिरतो. मदत मागणं...

नात्याची खरी किंमत...!

इमेज
नात्याची खरी किंमत...! नात्यांची खरी ओळख शब्दांत नाही, तर कृतीत असते. ज्याला खरंच तुमची गरज असते, तो मोठमोठ्या वचनांआधी स्वतःत बदल घडवतो. त्याला सांगावं लागत नाही, समजावं लागत नाही. तुमचं मौन, तुमच्या डोळ्यातली थकवा, मनातली जखम हे सगळं तो शब्दांआधीच ओळखतो. कारण नात्याची किंमत त्याला मनापासून माहीत असते. त्याच्यासाठी नातं म्हणजे फक्त सोबत नसते, तर जबाबदारी असते. पण ज्याला तुमची गरजच नसते, तो कितीही समजावलं तरी बदलत नाही. तुम्ही तुमचं मन उघडं ठेवलं, भावना मांडल्या, स्वतःला कमी केलं तरी त्याच्याकडून बदल मिळत नाही. उलट प्रत्येक वेळी नवी कारणं, नवी सबब आणि नवे आरोप पुढे येतात. अशा माणसाला बदलायचंच नसतं; त्याला फक्त वेळ काढायचा असतो. तो तुमच्या संयमावर जगतो, तुमच्या आशांवर खेळतो. आणि आपण? आपण मात्र विश्वास ठेवत राहतो. “कदाचित आता समजेल” या आशेवर भावना, वेळ आणि स्वतःची शांतता सगळं पणाला लावतो. हळूहळू आपण थकतो. आतून तुटतो. स्वतःलाच दोष देऊ लागतो. आपली किंमत आपल्यालाच कमी वाटू लागते. हे सगळं घडत असताना समोरच्या व्यक्तीला मात्र याची साधी जाणीवही नसते. कारण ज्याला फरक पडतो, तोच बदलतो;...

स्वतःची किंमत.....!

इमेज
स्वतःची किंमत.....! माणूस बोलतो कारण त्याला समजून घ्यायचं असतं, आपलं मन मोकळं करायचं असतं. पण जेव्हा बोलणं सतत स्वतःला सिद्ध करण्यासाठी करावं लागतं, तेव्हा ते संवाद राहत नाही.ती स्वतःच्या अस्तित्वाची धावपळ बनते. अतिसंवाद हा शब्दांचा प्रश्न नसतो, तो आत्मसन्मानाच्या झिजेचा प्रवास असतो. हळूहळू आपण नकळत विनवणीच्या टप्प्यावर पोहोचतो. “माझं ऐक,” “माझं समजून घे,” असं सांगत सांगत मन थकत जातं. पुन्हा पुन्हा आपली बाजू मांडणं, प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरणं,आणि तरीही समोरून येणाऱ्या शांततेकडे उत्तराच्या आशेने पाहत राहणं.ही प्रतीक्षा संवादाची नसते, ती आत्मसन्मानाला लागलेली भेग असते. खरं तर ज्याला समजायचं असतं, त्याला दोन शब्द पुरेसे असतात. आणि ज्याला समजायचंच नसतं, त्याच्यासाठी हजार शब्दही अपुरे ठरतात. कारण ऐकायची तयारी नसलेल्या माणसापर्यंत शब्द पोहोचतच नाहीत. तिथे शब्द वाढवणं म्हणजे स्वतःलाच अधिक थकवणं असतं. अनेकदा आपण गोंधळतो.जास्त बोललो तर नातं टिकेल, अधिक समजावून सांगितलं तर समोरचा बदलेल. पण नातं शब्दांवर नाही, तर कदर करण्यावर उभं असतं. जिथे आपले शब्द ऐकले जात नाहीत, तिथे शांत रा...

नातं जपताना स्वतःला हरवू नका....!

इमेज
नातं जपताना स्वतःला हरवू नका....! आपण ज्या माणसांना मनापासून जपतो, त्यांच्याशी आपलं नातं फार नाजूक असतं. कारण त्या नात्यात अपेक्षा कमी आणि समर्पण जास्त असतं. आयुष्य हळूहळू शिकवतं की सर्वात खोल वेदना बाहेरून नाही, तर आतून आपल्या जवळच्यांकडूनच मिळतात. आपण जितकं जपतो, तितकंच आपलं मन उघडं पडतं; आणि जिथे मन उघडं असतं, तिथे दुखणंही खोलवर जातं. जास्त मान दिला की समोरच्याला आपली किंमत कमी वाटू लागते, हे सत्य उशिरा कळतं. आपण आदर देतो, वेळ देतो, समजून घेतो.पण कधी कधी त्याची किंमत समोरच्याला सवय वाटू लागते. नातं टिकवण्यासाठी आपण स्वतःला झिजवत राहतो; आपली मते, आपली स्वप्नं, आपली शांतता हळूहळू बाजूला ठेवतो. पण ही झीज समोरच्याला जाणवत नाही, कारण त्याला आपल्या सहनशीलतेची सवय झालेली असते. जपणं म्हणजे स्वतःला विसरणं नव्हे, हे समजायला अनुभव लागतो. आपण जितकं झुकतो, तितकं आपल्यावर चालणं लोकांना सोपं वाटतं. प्रेम करताना मर्यादा ठेवल्या नाहीत, तर अपेक्षा वाढतात.आणि अपेक्षा वाढल्या की निराशा अटळ होते. स्वतःचा आदर हरवून मिळवलेली माणसं कायमची राहत नाहीत; कारण जिथे आत्मसन्मान नसतो, तिथे नात्यालाही प...

राहून गेलेल्या क्षणांची खंत.....!

इमेज
राहून गेलेल्या क्षणांची खंत.....! खंत मनाला बोचते, कारण ती हरवलेल्या क्षणांची आठवण करून देते. आयुष्यात काही वेळा आपण सगळं असूनही थांबतो.भीतीपोटी, अहंकारापोटी किंवा “आत्ता नको” या निष्काळजी विचारापोटी. त्या क्षणी वेळ आपल्या बाजूने उभा असतो, माणसं जवळ असतात, भावना जिवंत असतात. पण आपण दुर्लक्ष करतो. आणि जेव्हा वेळ निघून जातो, तेव्हा हातात उरते ती फक्त खंत. वेळ गेल्यावर शब्द निष्प्रभ होतात. माफी उशिरा सुचते, प्रयत्न अपुरे वाटतात. जे बोलायला हवं होतं ते मनातच राहून जातं, आणि जे करायला हवं होतं त्याची केवळ आठवण उरते. मन त्या “राहून गेलेल्या” गोष्टीभोवतीच फिरत राहतं. रात्री शांततेत, एकांतात ती खंत अधिकच बोचते. त्या क्षणी केलेली एक छोटी चूक, एक दुर्लक्ष, आयुष्यभराची सल बनून राहते. पण खंत ही केवळ वेदना नाही. ती मनाला हादरवते, अंतर्मुख करते. स्वतःच्या चुकीची जाणीव झाल्यावर माणूस अधिक संवेदनशील होतो. दुसऱ्याच्या डोळ्यातली न बोललेली भावना ओळखायला शिकतो. शब्द बोलण्याआधी त्यांचा परिणाम विचारात घेतो. कुणाला दुखावण्याआधी दोनदा थांबतो. कारण त्याला ठाऊक असतं.वेदना शब्दांतून नाही, तर दुर्लक्ष...

स्वतःला हरवून जपलेली नाती...!

इमेज
स्वतःला हरवून जपलेली नाती...! ज्याला खरंच तुमची गरज असते, तो तुमच्यासाठी मोठमोठी वाक्यं बोलत नाही. तो तुमच्यासमोर स्वतःत बदल घडवतो. कारण त्याला नातं टिकवायचं असतं, जिंकायचं नसतं. त्याला सांगावं लागत नाही, समजावं लागत नाही… तुमच्या वेदना त्याला ऐकू येतात, तुमचं शांत राहणंही त्याला बोचतं. कारण जिथे प्रेम असतं तिथे संवेदना आपोआप जन्म घेतात. पण ज्याला तुमची गरजच नसते, तो मात्र कायम शब्दांच्या आड लपलेला असतो. प्रत्येक वेळी नवं कारण, नवी सबब, नवे आरोप. तुमच्या प्रत्येक प्रश्नावर तो उत्तर देत नाही, उलट तुम्हालाच दोषी ठरवतो.त्याला बदलायचं नसतं, कारण बदलण्याइतकी किंमत तुमची त्याच्या आयुष्यात नसते. त्याला फक्त वेळ काढायचा असतो… जो वेळ तुमचा असतो, तुमच्या आयुष्याचा असतो. आपण मात्र आशेच्या दोरीला धरून बसतो. “कदाचित बदलेल”, “कदाचित समजेल” या कदाचितच्या भरोशावर आपला विश्वास, भावना आणि अमूल्य वेळ हळूहळू खर्च होत जातो. आपण थकतो, तुटतो, स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. आपलीच किंमत कमी वाटू लागते. आणि समोरची व्यक्ती? तिला याची साधी जाणीव ही नसते. कारण ज्याला फरक पडतो, तोच बदलतो. बाकीचे फक्त बोलत...

विचार इतकाच करावा की ज्याने…..!

इमेज
विचार इतकाच करावा की ज्याने…..! विचार इतकाच करावा की ज्याने मार्ग सापडेल, इतका नाही की आयुष्याचाच वेग हरवेल. कारण विचार हा आयुष्याचा सोबती आहे, मालक नाही. तो हातात हात घालून चालायला हवा, पायात बेड्या घालण्यासाठी नाही. विचारांनी दिशा मिळते, पण अति विचारांनी दिशाच हरवते. विचार माणसाला सजग करतो, शहाणा बनवतो. पण तोच विचार जेव्हा मनात घर करून बसतो, तेव्हा तो भीतीचं रूप घेतो. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण हवी, प्रत्येक निर्णय चुकू नये, प्रत्येक पाऊल सुरक्षित असावं.या अपेक्षांमध्ये माणूस इतका अडकतो की पुढे जायची हिंमतच हरवून बसतो. मग मन प्रश्नांनी भरतं, पण उत्तरं मात्र दूरच राहतात. प्रत्येक गोष्टीचा खोल विचार करत बसलो तर पाऊल उचलण्याआधीच आयुष्य पुढे निघून जातं. काही निर्णय डोक्याने नाही तर वेळेने घ्यावे लागतात. कारण आयुष्य हे गणित नाही की प्रत्येक उदाहरण आधीच सोडवून ठेवता येईल. इथे अनेकदा उत्तर शोधायचं नसतं, तर उत्तर अनुभवत घडवायचं असतं. चालता चालता चुका होतात, कधी वाट चुकते, कधी मन दुखतं. पण त्या प्रत्येक चुकांमधून अनुभव जन्माला येतो. जो अनुभव पुस्तकांत नाही, तो आयुष्य शिकवतं. अति विचा...

इतका गर्व कशासाठी…..!

इमेज
इतका गर्व कशासाठी…..! माणूस जन्मतो तेव्हा त्याच्याकडे काहीच नसतं. संपत्ती नाही, पद नाही, प्रतिष्ठा नाही. आणि मरणानंतर ही काहीही घेऊन जात नाही. तरीही आपण अनेकदा आपल्या छोट्या-मोठ्या यशांवर गर्व करतो, आपल्या संपत्तीवर, आपल्या नावावर, आपल्या समाजातील स्थानावर. पण हे सारे तात्पुरते आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा येतात आणि जातात, पण त्यातून निर्माण होणारा अहंकार कायम राहतो आणि आतून आपल्याला खाल्ला जातो. मनात द्वेषभावना साठवणे म्हणजे स्वतःच्या जीवनावर जड ओझं टाकणे. आपण आपल्याच मनावर तुरूंग बांधतो. मीपणा वाढतो, नातं कमी होतात, माणूस एकटाच राहतो. आपल्यापेक्षा कोणी मोठं झालं की जळणं, आणि कोणी पडताना दिसलं की आनंद मानणं  ही मानसिक गरीबी आहे. अशी भावना फक्त आपल्याच हृदयाला जळवते आणि आयुष्याचे सौंदर्य हरवते. आयुष्य खूपच थोडं आहे. काही क्षण, काही आठवणी, काही नाती. पण आपण त्यातला जास्त वेळ द्वेष, नाखुशी आणि अहंकारात घालवतो. दुसऱ्यांच्या यशावर डोके वाकवणे किंवा दुसऱ्यांच्या अपयशात आनंद मानणे  या सगळ्या गोष्टी माणूस म्हणून आपल्याला लहान करतात. उलट, ज्या माणसाने नम्रता ठेवली, त्याने दिले...

अहंकाराच्या सावलीत तुटत जाणारी नाती....!

इमेज
अहंकाराच्या सावलीत तुटत जाणारी नाती....! असतात काही अशी माणसं जी स्वतःच्या धुंदीत इतकी हरवलेली असतात की त्यांच्या वागण्याने समोरच्याच्या मनात काय वादळ उठलं आहे, याची त्यांना साधी जाणीवही नसते. त्यांना वाटतं की त्यांनी बोललेले शब्द हे फक्त शब्दच असतात; पण समोरच्यासाठी ते शब्द आयुष्यभर न भरून येणाऱ्या जखमा ठरतात. काही जखमा रक्त न सांडता खोलवर रुजतात, आणि अशाच जखमा या माणसांकडून नकळत दिल्या जातात. अशी माणसं स्वतःला नेहमीच बरोबर समजतात. चूक झाली तरी ती आपली असू शकते, हा विचार त्यांच्या मनाला शिवत नाही. माफी मागणं त्यांना कमीपणाचं वाटतं, आणि जबाबदारी स्वीकारणं म्हणजे अहंकारावर घाव बसणं. त्यामुळे ते सहजपणे दोष दुसऱ्याच्या खांद्यावर टाकून मोकळे होतात. आपण समोरच्याला दुखावलं, अपमानित केलं, असं मान्य करणं त्यांना जमतच नाही. नात्यांमध्ये संवादापेक्षा समजून घेणं अधिक महत्त्वाचं असतं. पण अशा लोकांसाठी नातं हे जपण्यासारखं नसून जिंकण्याचं मैदान असतं. कोण बरोबर, कोण चूक याच गणितात ते अडकलेले असतात. समोरच्याच्या भावनांना किंमत न देता ते स्वतःच्या अहंकाराभोवती भिंती उभ्या करतात. त्या भिंती ...

नम्रतेमधल मोठेपण....!

इमेज
नम्रतेमधल मोठेपण....! आदराणे दिलेला एक नमस्कार हा केवळ शिष्टाचार नाही, तर तो माणसाच्या अंतर्मनातून उमटलेला संस्कारांचा स्वर असतो. दोन हात जोडताना फक्त बोटं एकत्र येत नाहीत, तर त्यामागे असलेली नम्रता, आदर आणि माणुसकीही एकत्र येते. शब्द न उच्चारता दिलेला हा नमस्कार समोरच्याच्या मनात थेट पोहोचतो आणि क्षणात नात्याला एक उबदार स्पर्श देऊन जातो. नमस्कार करताना माणूस थोडा वाकतो, पण त्यात कुठे ही कमीपणा नसतो. उलट, त्या वाकण्यात अहंकार आपोआप झुकतो आणि माणुसकी ताठ उभी राहते. “मी”पण विरघळून “आपण”पण जन्माला येतो. मोठेपणा हा पदात, पैशात किंवा अधिकारात नसून तो नम्रतेत असतो, हे एक साधा नमस्कार नकळत शिकवून जातो. आदराने वाकलेलं मस्तक कधीच लहान ठरत नाही. तेच मस्तक समोरच्याच्या मनात सन्मानाचं स्थान मिळवतं. नमस्कार देणारा माणूस स्वतःची ओळख शब्दांत सांगत नाही, पण त्याचे संस्कार, त्याची जडणघडण आणि त्याची संस्कृती त्या एका कृतीतून स्पष्ट दिसून येते. म्हणूनच नमस्कार हा केवळ कृती नसून तो व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. समाजात नाती टिकवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते; कधी कधी एक छोटासा नमस्कार पुरेसा ...